गज्जलाञ्जलि - पूरे पूर्वजांच्या जयांची ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
पूरे पूर्वजांच्या जयांची बढाऊ !
पहा आज ही भोवतीची लढाऊ.
नसे आसरा, आस निवृत्ति - कोनीं.
कुठे टाळुनी मृत्युला मर्त्य जाऊ ?
तुम्ही मेण्ढरें मूक होतां म्हणूनी
बने भ्याड हा काळ कट्टा कसाऊ !
धजे तो जगे, पात्र तो जीविताला;
ऊठा वीर हो, दाखवा हातघाऊ.
मरा आणि जा कीर्तिच्या दिव्यलोकीं,
जगा आणि भोगा जगीं पातशाऊ.
जगे मात्र जो बापुडा दीन दास्यें
न त्याचें कवी गौरवें गीत गाऊ.
नका अल्पसन्तुष्ट राहूं, प्रभू व्हा
भिकारी न व्हा, मात्र नावेंच सांऊ.
जया ध्येय चित्तीं, तसें तेज अङगीं
तयाच्या यशाला न कोठे मनाऊ.
नको काय विद्या, कला आकलाया
कवाऊत पाश्वात्य अन कारवाऊ ?
झटा स्वीय कार्यी, गुणोत्कर्ष साधा,
पुढे व्हाल सेनापती, व्हा शिपाऊ,
शिवाजी पहा थोर राजा मराठी.
करी राष्ट्रसंस्थापनीं कारवाऊ.
मनीं बाणुं द्या ती जिगीषा तयाची
पुढे व्हावयाला प्रतापी सवाऊ.
२१ नोव्हेम्बर १९२५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP