मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
असे यौवनीं केस कां पाण्ढर...

गज्जलाञ्जलि - असे यौवनीं केस कां पाण्ढर...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


असे यौवनीं केस कां पाण्ढरे ?
हृदीं प्रीतिची वासना वावरे.

कुणाच्या मुळे लागती स्पष्ट हे
कपाळीं हृदींचे दिसाया घरे ?

जगीं चारुतेची करी दुर्दशा
अशी कोण ती क्रूर भामा बरें ?

अशी मोहिनी ऐक नाही कुणी.
म्हणूनीच सोत्कण्ठ ई बावरें.

मला व्यक्त मूर्तींत ऐका दिसे
पुन्हा हाय तों भास वाया ठरे !

लपण्डाव चाले असा सारखा,
पुढे काय दैवीं कळेना खरें.

वरी कोण या शुभ्र केसांस अन
क्षुधाक्रान्त या मन्द नेत्रांस रे ?

नसे भीति ती, यौवनान्तींहि कां
हृदीं प्रीतिची ही न वाञ्छा मरे ?

१ ऑगस्ट १९३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP