मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
हें काय सृष्टिवैभव चौफेर ...

गज्जलाञ्जलि - हें काय सृष्टिवैभव चौफेर ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


हें काय सृष्टिवैभव चौफेर सारिखें !
हो द्दष्टि शान्त पाहुनि पाचूच की पिके.

रत्नें कितीहि धारण सम्राट करो शिरीं,
ऊश्वर्य शैल निर्दय तें यापुढे फिकें !

सृष्टी  कुटुम्बवत्सल केवी कृतज्ञ् ही !
कर्दा खपूनि कष्टुनि लागे परी भिके.

स्वातन्त्र्य - सौख्य - तेज न याच्या मुखीं दिसे,
ऊदी तथापि नागर ऊटींत हे निके.

सर्वत्र हाय कोन्दट माजे प्रशान्तता !
स्तोत्रें पढीक यद्यपि गाती शुकादिकें !

भू, फार भार होऊनि कोपूनि कम्पतां
होती अनर्थ, मानव अद्यापि ना शिके,

ऊल्लाससूर बाहिर रानींच ये ऊथे,
गावें सदैव राहुनि अव्यक्त का पिकें ?

ये, सृष्टिचेंच वैभव हें साठवूं हृदीं.
तू मी गरीब, रङगहि हा का सदा टिके ?

ऑगस्ट १९३०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP