मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते| डोहाळे व पाळणे घाटावरची लोकगीते गीत पहिले गीत दुसरे गीत तीसरे गीत चवथे गीत पाचवे गीत सहावे गीत सातवे गीत आठवे गीत नववे गीत दहावे गीत अकरावे गीत बारावे गीत तेरावे गीत चौदावे गीत पंधरावे गीत सोळावे गीत सतरावे गीत अठरावे गीत एकोणीसावे गीत वीसावे गीत एकवीसावे गीत बावीसावे गीत तेवीसावे गीत चोवीसावे गीत पंचवीसावे गीत सव्वीसावे गीत सत्तावीसावे गीत अठ्ठावीसावे गीत एकोणतीसावे गीत तीसावे गीत एकतीसावे गीत बत्तीसावे गीत तेहतीसावे गीत चौतीसावे गीत पस्तीसावे गीत छत्तीसावे गीत सदोतीसावे गीत अडोतीसावे गीत एकोणचाळीसावे गीत चाळीसावे गीत एकेचाळीसावे गीत बेचाळीसावे गीत त्रेचाळीसावे गीत चव्वेचाळीसावे गीत पंचेचाळीसावे गीत शेहेचाळीसावे गीत सत्तेचाळीसावे गीत अठ्ठेचाळीसावे खाल्ल्या पटींत । वरल्या प... झटी मारी झटी कंपळ पटी । स... सई सई गोविंदा येतो सई सई... हित बाई इंचु चावला ग बाय ... फुगडी गीते कोंबडा गीत घोड्याचा खेळ एक मुलगी ..... तुला काय प... एक मुलगी ..... तुला काय प... किकीचं पान बाई की की सौदर... दिंडा मोड ग पोरी । दिंडाच... शिमगा गिरणीचें गाणें नाना नानाच्या वरी आले फूल... डोहाळे व पाळणे कृष्णाचा पाळणा नाव घेण्याचे उखाणे सणाचे उखाणे बायांचीं गाणीं शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५३ रुखवत संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ डोहाळे व पाळणे लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात. Tags : geetlokgeetmarathiगीतडोहाळेपाळणामराठीलोकगीत डोहाळे व पाळणे Translation - भाषांतर १. नऊ महिन्यांचा पाळणा : पहिल्या माशीं आई पुशीती । लेकीबाईच डोहाळ कस? ।आमच डोहाळ पुरवीजी आई । ओल्या न्हाणीवर लावावी जाई । जु बाळा जु बाळा जुजुरे ।दुसर्या माशीं बाप पुशीतो । लेकीबाईच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी बापा । ओल्या न्हाणीवर लावावाचाफा । जु बाळा ...............तिसर्या मशीं बहिण पुसते । बहीण तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी बहिणी । सोडावा बुचडा घालावंपाणी । जु बाळा ............चवथ्या माशीं भाऊजी पुशी । बहिणी तुमच डोहाळ कस?आमच डोहाळ पुरबीजी भावा । बाजारीं जाऊन आणावाभेवा । जु बाळा ............पांचव्या माशीं सासरा पुशी । सून तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी सासर्या । मळयाला जाऊन आणाव्या उसर्या । जु बाळा........सहाव्या माशीं सासू पुशीते । सूनबाईच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी सासू । मळ्याला जाऊन आणावा उसू । जु बाळा ...........सातव्या माशीं नणंद पुशी । वहिनी तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी वइन्स । मळ्याला जाऊनी आणावींकणसं । जु बाळा ........आठव्या माशीं दीर पुशीतो । वहिनी तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीची दीरा । पाडाबी न्हाणी बांधावा चिरा । जु बाळा..........नवव्या माशीं कंथजी पुशी । राणी तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी कंथा । झालाया पुत्र हरली चिता । जु बाळा .........२. सासुजी पुशी सासुजी पुशी । सून तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी सासू । खंदावी न्हाणी बांधावा कुसु । जु जु रे जुजु ।सासरा पुशी सासरा पुशी । सून तुमचे डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी सासर्या । खंदावी न्हाणी बांधावी ओसरी । जु जु........दीर जी पुशी दीर जी पुशी । वहिनी तुमच डोहाळ कस?आमच डोहाळ पुरवीजी दीरा । खंदावी न्हाणी बांधावा तुरा । जु जु .........जाऊ जी पुशी जाऊ जी पुशी । बाई तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी जाऊ । सरा बिंदल्या घेउनी जाउं । जु जु .........भ्रतार पुस भ्रतार पुस । राणी तुमच डोहाळ कस ?आमच डोहाळ पुरवीजी भ्रतारा । खंदावी न्हाणी बांधवा वाफा । जु जु ......३. पहिल्या मासीं उभीं मी इंद्रवणीं । डाव्या कुशीला चक्रपाणी । जू जू जू जू ....दुसर्या मासीं उभीं अंगणांत ।डाव्या कुशीला रघुनाथ । जू जू जू जू जू ....तिसर्या मासीं वरणाचा येतो वास । माझ्या मैनाला गेला दिवस । जू जू जू जू जू ....चवथ्या मासीं हिच्या तोंडावर लाली । कुण्या महिन्यामधीं नहाली ? जू जू जू जू जू ....पांचव्या मासीं हिची नीरी दिसं उंच । हिचा भरतार एकांती पुस । जू जू जू जू जू ....सहाव्या मासीं सहादू चोळ्या लेऊं । अंजीरबागमधीं जाऊं । जू जू जू जू जू ....सातव्या मासीं मनसा झाली डाळिंबाची । चोळी शिवा रेशमाची । जू जू जू जू जू ....आठव्या मासीं हिच्या आईला मूळ कुणी धाडा । तिला मेण्यांत बसधुनी आणा । जू जू जू जू जू ....नवव्या मासीं सुईणीला धरा हातीं । मैना परसुत झाली रात्रीं । जू जू जू जू जू ....दहाव्या मासीं तिकडून आला वाणी । त्यांनी लुडिली बत्तीस गोणी । जू जू जू जू जू ....आकराव्या मासीं तिकडून आला कासार । तिच्या चुड्याला दिला इसार । जू जू जू जू जू ....बाराव्या मासीं तिकडून आला शिंपी । तिच्या मखराला जाळी गुफी । जू जू जू जू जू ....तेराव्या मासीं तिकडून आला माळी । हिच्या मखराला केळी । जू जू जू जू जू .... N/A References : N/A Last Updated : January 25, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP