गिरणीचें गाणें
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
१
गिरणीमधें गिरण कुरळ्याची । हवा येते सुपारी बागेची ।
नवरा विचारतो बायकोला । सर्व्या लोकाचा पगार झाला ।
माझी कामकरणी ग । पगार काय केला ।
रहाटाचा तुटला पटा । याची सय नाहीं झाली मला ।
त्या नायकिणीनं पगार बंद केला । अशी धावत पळत गेला ।
हे काय भवांडया गिरणींत । या वो हाक मारितो नायकीणबाईला ।
आहो आहो नायकीणबाई । सर्व्या लोकाचा पगार दिला ।
माझ्या बायकोला तुम्ही पगार नाहीं दिला ।
अरे अरे मेल्या भडव्या । तूं विचारतो कोणाला ।
तुझी बायको रे नाहीं आली कामाला ।
अशी धावत पळत आला दारी मोडिला येरंड ।
आवो आवो राजस्वामी तुम्ही मारताव कशाला ।
मी गिरणीमधें नाहीं गेलें कामाला ।
ती मोठी चतुर बाई निघूनशानी त्या कोरटाला ।
केस लिवला बाई आपल्या नवर्याला ।
कोरा कागद काळी शाई पत्र लिवी ।
घाई घाई काय बोलणं आहे बोला कीं ।
मनमोहनीं तिच आईबाप बोलल ।
लेक नाहीं धाडीत नांदायला तूं निघून जा रे आपल्या घराला ।
२
जटा धारी गे जोगी आला यश्वदामाई ।
करीत शिंकीणात बों बों आवडपतीर ।
वाही झुळझुळ खुळखुळ घुबड विशी रे ।
पांच वर्षाचं बाळ तान्हं खेळ अंगणांत ।
शिरीरंग माझा वेडा बाळ नाहीं दुसरा जोडा ।
त्याची संगत तुम्ही सोडा गोकुळच्या नारी ।
कोपीत ऊभ्या पोरी हाक मारी चक्रपाणी ।
पदराला धरुं नको सोडरे माझ्या बाळा ।
३
सखु सखु साखर लिंबु । तुझं तोंड कसं ग कोळीणवाणी
सखु गेली पाण्याला हिचा मैतर उभा वाटेला ।
पानाच्या पटीसाठीं हिनं मेहुण्याला नवरा केला ।
तुला करतो चांदीचे गोठ मग लावतो म्होतूर पाट ।
रुपये देतो तीनशे साठ ।
कोण चालली वाकडी तिकडी ।
तिला खायला देते बर्फी तिला खायला ।
कोण चालली तिरपी तिरपी ।
झपाट्यांत फुफाट्यांत तिचा पाय भरला
चिखलांत तिचा पाय भरला खाक्यात ॥
४
एक आणा घॆ दोन आणे घे तूं ग काकडी खायाला ।
एक आणा घे दोन आणे घे तूं ग पपयी खायाला ।
५
अशी कर नखरी नार ही धनसंपत्ता हिचं चित्त नाहीं धंद्यावरी ।
अशी तवा ठेविला चुलीवरी नी हिंडते शेजारीणीच्या दारीं ।
अशी देग शेजारणी दोन तीन तांबे तवा गेला जळुनी ।
अशा दोन तीन मिर्च्या लेवुनी घसरा दिला त्या पाट्यावरी ।
घेतली चुंबळ घॆतली घागर अशी नार गेली पाण्यावरी ।
अशी झटकन सरली पटकन पडली घागर उरावरी ।
अशी नवर्याजवळ सांगत आली नथ माझी मोडली गुलाबी चोळी सर्वी फाटली ॥
६
हिची बारीक टिकली बारीक टिकली ।
नातवासंगे कशी झुकली ।
हिचा बाप बोलला पायांत काटा हिच्या रुपला ।
हिचा भाऊ बोलला पायांत काटा हिच्या मोडला ।
हिची बहिण बोलली आरसा लावून काटा काढला ।
हिची आई बोलली टांग्यांत बसून आणा घरला ।
७
गोमू चल जाऊं ग चौपाटि बंदराला ।
तेथं उभा आहे ग यश्वदेवा कान्हा ।
त्यानं भुलविल्या गोकुळच्या गौळणी ।
कान्हा नको मारुं रे रंगाच्या पिचकार्या ।
तेंच्या भिजल्या ग रेशमी लाल साडया ।
८
गाडी गुलाबी ग गाडी गुलाबी ।
दादा सजणा र भाऊ सजणा ।
बहिणीच्या नथीसाठीं मोड खजिना ।
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP