लोकगीत - गीत एकोणीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
खुळखुळ येळूंबाची जाळी । कृष्ण खेळ चेंडुफळी ।
तेथून चेंडू झुगारीला । कळंबखांदी अडकीला ।
कळंबखांदी कडाडली । बात देवईला गेली ।
कान्हा तुला झाला नाहीं । राजविधी केला नाहीं ।
राजविधी पवळयाचा आम्ही सुना गवळ्याच्या ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP