लोकगीत - गीत सहावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
भारजा - सासू -
"आली वर्षाची पंचम " वेडी झालीस भारजा
आत्या मी जातें वारुळाला मणभर गहूं दळायचें
पति वंजाया जायाचे" तेली तांबुळ्याच्या मुली
मणभर या गव्हाचा वारुळाला येता कुणी ?
याचा केला एक घाणा साळ्या कोष्टयाच्या मुली
भारजा - वारुळाला येता कुणी ?
"आली वर्षाची पंचम म्हार मराठयाच्या मुली ?
आत्या मी जातें वारुळाला" वारुळाला येता कुणी?
सासू - भारजा पूजा करते
"वेडी झालीस भारजा सार्या सया मिळवून आणल्या
मणभर साळी सडायाच्या आली आपल्या वाडयाला
पति वंजाया जायाचा" घेतल्या थाळीभर लाह्या
मणभर या साळीयाचा घेतलं लोटीभर दूध
याचा केला एक घाणा घॆतला हळदीचा ओंडा
भारजेचा शृंगार - घेतला कुंकवाचा करंडा
घेतलं नागाला पोवत
भारजा न्हायला बसली निघाली वाडयाच्या बाहेरी
भारजा आंघोळ करुन उठली खेळत गेल्या वारुळाजवळीं
नेसली चक्राचा पाट भारजानं वारुळ पूजिलं
त्याली मदमा काचोळी वाह्यल्या थाळीभर लाह्या
त्याली सर्व अळीकार वाहिलं लोटीभर दूध
त्याली नवरत्नाचा हार वाहिला हळदीचा ओंडा
गेली गांवामधीं वाहिला कुंकवाचा करंडाअ
भारजा - वाहिलं नागाला पोवतं
भारजानं फेरजी धरीला
"वाण्या बामणाच्या मुली एक फेरजी फिरल्या
वारुळाला येता कुणी? दोन फेरजी फिरल्या
तीनं फेरजी फिरल्या माहेरीं -
चवथ्या पांचव्या फेराला भारजा तेथून निघाली
भारजाचा हार तुटतो - वाटमारगीं लागली
तुटला गळ्यांतील हार आली वेशीच्या बाहेरी
भारजानं फेरजी सोडिला लागली वनाच्या वाटॆला
लागली मोती वेंचायाला एक वन वलांडिलीं
सया निघून गेल्या घरला दोन वन वलांडिलीं
मोती वेचता झाली रात्र तीन वनं वलांडिलीं
भारजानं मोतीजी वेचिले चौथ्या पांचव्या वनाला
वाटमारगीं लागली आलं भारजाचें माहेर
आली आपल्या वाडयाला गेली वेशीच्या आंत
हाका मारली सासूला गेली बापाच्या वाडयाला
भारजा - भारजा-
"आवो आवो सासूबाई "अर अर माझ्या बापा
मला घरामधीं घ्यावं माझा बापची होशील
सासू मला घरामधीं घेशील"
"आमची कवाडं सायाची बाप-
कुलपं निघना तांब्याचीं आमची कवाडं आंब्याची
एवढया रातचं काय ग काज ? कुलपं निघना तांब्याचीं
जा माहेरीं कर जा राज " येवढया रात्रीचं काय ग काज ?
अखेर आत्महत्या करण्यास निघते-
भारजा तेथून निघाली भारजा -
आली येशीच्या बाहेरी " अर अर खिलार्या दादा
लागली वनाच्या वाटला एवढा शिनगार देतें तुला
एक वन वलांडिलं अंजनडोह दाव मला
दोन वनं वलंडिलीं
तीन वनं वलांडिलीं शेळयांचा खिलारी -
चौथ्या पांचव्या वनाला "एवढा शिनगर देग बाई
भेटली हत्तीच खिल्लारं अंजनडोह ठाव आहे "
भारजा - काढला सारा शिनगर
"अर अर खिलार्यादादा त्याचं गाठोडं बांधीलं
येवढा शिनगार देतें तुला दिलं खिलार्यादादाला
अंजनडोह दाव मला " तूंच जन्माचा मायबाप "
हत्तीचा खिलारी - गेली डोहाच्या जवळी
"येवढा शिनगार नको बाई घातली आपली कास
अंजनडोह ठाव नाहीं" दंडी पदर सावरीला
बांधली केसाची जुडी
आधीं टाकिला खडा
मग टाकिली काडी
मग घातयीली उडी
नागरपंचमी भोवली भारजाला
परणाचा घात झाला
तिथनं म्होरच निघाली
भेटली शेळ्यांची खिलारं
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP