लोकगीत - गीत पंचवीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
बाजार मोठा लौकर गाठा
बाजार मोठा लौकर गाठा । मथुरेच्या हाटा तुम्ही चला निघा ग ।
खाल्ल्या आळीच्या वरल्या आळीच्या । चंद्रावळीला तुम्ही हाका मारा ग ।
बाजार आला उशीर झाला । मथुरीच्या हाटा तुम्ही चला चला ग ।
बाजार भरला उशीर झाला । नवरा माझा कुंठ गेला?
आड्वं होईल बाई मुरलीवाला ग । बासरीवाला ।
दरव्या की काठीं बगळा बोलतो सारंगी ।
गवळीदादा बोलूं लागला घे गोधन कीं चल घरला ।
आडवा डोंगर सासुरवाशिणीला ।
चिंता पडली रामाला चिंता पडली राधूला ।
गवळीदादा बोलूं लागला घे गोधन कीं चल घरला ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP