शिमगा
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
१.
दरवा भरला काठोकाठीं पाणी चाललय ग गजरेला ।
दादरावरले राईबाई तुझ्या गजर्याचं मोल काय ।
सवा रुपया दोन आणे देऊं काय ।
गाडी आली भवर्याची ।
माझ्या बाबईबाईच्या नवर्याची
गाडी आली भवर्याची ।
माझ्या कस्तुरीच्या दिराची ।
गाडी आली भवर्याची ।
माझ्य़ा डाळुंबीबाईच्या सासर्याची ।
गाडी आली भवर्याची ।
माझ्या आबुबाईच्या सासूची ।
२ .
रामा हो रामा रामाच्या बागेमधीं हो मधीं ।
चवरा मोठा दोन्ही वो दोन्ही ।
आंब्याची सावली चींचेवरी ।
जाईला पाणी जातया झूळझुळवाणी ।
आंब्याची सावली चींचेवरी ।
रामाचं ध्यान गेलं सीतेवरी ।
रामा रामा हो रामाच्या बागेमधीं हो मधीं ।
चवरा मोठा दोन्ही वो दोन्ही ।
जाईला पाणी जातया झुळझुळ वाणी ।
बोराची सावळी पेरुवरी ।
रामाचं ध्यान गेलं सीतेवरी ।
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP