लोकगीत - गीत सदोतीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
गांवाखालती पांढर नांगरली डोंगरली ।
रोपं आंब्याचीं लावली ।
आंबा आलायाएक पान मंग आला दोन पानं ।
मग आला तीन पानं मग आला चार पानं ।
मग आला पांच पानं ।
चवथ्या पांचव्या आंब्याला फुटल्या फांद्या ।
मंग पाल्यानं भरला मंग मोहरानं दाटला ।
आंब्याला हो आंबे आले ।
असं आंब गोड बाई लोणचं जी घालावं ।
असं लोणचं गोड बाई दीराला वाढावं ।
असा दीर गोड बाई आड जी खंदील ।
असा आडा गोड बाई पाणीजी निघालं ।
असं पाणी गोड बाई चिखुल मळावा ।
अस चिखुल गोड बाई जातं जी टाकावें ।
अशी जाती गोड बाई गहू जी वलवावे ।
असे गहूं गोड बाई सोजी जी पाडवाव्या ।
अशा शेवया गोड बाई शेवाया वळाव्या ।
अशा दुरडया गोड बाई दुरड्या भराव्या ।
असे रुमाल गोड बाई गाडींत टाकावे ।
अशी गाडी गोड बाई माहेरा धाडावी ।
असं माहेर गोड बाई खेळाया धाडीतें ।
अस सासर दोड बाई कोंडून मारीतें ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP