लोकगीत - गीत चाळीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
सासरच्या वाट गुजुगुजु काट । ऊंऽहुं ।
कोण पावणा आला ग बाय । ऊंऽहूं ।
सासरा पावणा आला ग बाय ।ऊंऽहूं ।
काय घेऊन आला ग बाय । ऊंऽहूं ।
तोडं घेऊन आला ग बाय । ऊं ऽहूं ।
त्याचं मी तोडं लेयाची नाय ।ऊंऽ हूं ।
त्याच्या मी मागं जायाची नाय । ऊंऽहूं ।
चारी दरवाजे लावा ग बाय । ऊंऽहूं ।
झामरा कुतरा सोडा ग बाय । ऊंऽहुं ।
सासरच्या वाट ................
नवरा पावणा आला ग बाय ।ऊंऽहूं ।
काय घेऊन आला ग बाय ।ऊं ऽहूं ।
भाकरी घेऊन आला ग बाय । ऊं ऽहुं ।
चारी दरवाजे उघडा ग बाय । ऊं ऽहूं ।
झामरा कुतरा धरा ग बाय । ऊंऽहूं ।
त्याच्या मी मागं जायाची बाय । ऊं ऽहूं ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP