लोकगीत - गीत तीसरे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
गाईचा पाळणा
गाय भरुन गाईच्या मांड्या ग जशा पालखीच्या दांड्या
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचा शेपा ग जसा नागीण टाकी झेपा
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईच पोट ग जशी कापसाची मोट
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईची कास ग धार काढी रामदास
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचं दुधु ग आज जेवण झालं सुधु
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचं दही ग आज जेवण झालं लई
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचं ताक ग आज जेवण झालं पाक
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचं तुपु ग आज जेवण झालं खुपु
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईची पाठ ग जशी स्वर्गाची वाट
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचा डोळा ग जसा लोण्याचा गोळा
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचं नाक ग जसं कोल्हापूरचं माप
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचं तोंड ग महादेवाचीं कुंडं
गोकुळच्या नारी ।
गाय भरुन गाईचं कपाळ ग जस महादेवाचं गोपाळ
गोकुळच्या नारी ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP