कोंबडा गीत
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
खुड खुड मेल्याचा कोंबडा
खुड खुड मेल्याचा कोंबडा । घे घागर घे चुंबळ ।
पाटीखालीं मी डालिला । चल ग सईना पाण्याला ।
दीर बाई दाजीबा नटवा । माझा रावू तान्हेला ।
सोन्यारुप्याचा बटवा । एवढीच घागर आणुं दे। परसामागं ठेवूंदे ।
असा परास साट्याचा ।
बाजार भरला मोत्याचा ।
मोत्याला आल्या शेंगा ।
घाल ग पोरी पिंगा ।
एकीचा कां दोघींचा ।
माईणकरणी लेकीचा ।
कोंबडयाचें गाणें
खुड खुड मेल्याचा कोंबडा ।
पाटीखालीं मी डालीला ।
दीर बाई दाजीबा नटवा ।
सोन्यारुप्याचा बटवा ।
चंदाई कुरवीली कुरवीली ।
वरात मिरवली मिरवली ।
गेलाया नारिला सांगत ।
आज नाहीं मंजुरी लागत ।
मुकादमाला आगत ।
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP