लोकगीत - गीत एकेचाळीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
गावाखालती बारव । तिथं सया पाणी भरिती ।
गरगर घागर चक्री चुंबळ । हात वागिती पाणी भरिती ।
घागर बुडाली चुंबळ तरंगली । नगरमाशान दे माझी घागर ।
सासरा माझा वगर । ते मला मारल ।
सासर्याचा उंबरा । कधीं मला सुटल ।
बाप माझा विठ्ठल । कधीं मला भेटल ।
गांवा खालती बारव । तिथं सया पाणी भरिती ।
गरगर बुडाली चक्री चुंबळ । हात वारिती पाणी भरिती ।
घागर बुडाली चुंबळ तरंगली । नगरमाशान दे माझी घागर ।
सासू माझी वगर । ती मला मारल।
सासूचा उंबरा । कधी मला सुटल ।
आई माझी रुकमीण । कधीं मला भेटल ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP