लोकगीत - गीत सातवे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
गेली मदम्या घरांत
जैता पंचमीच्या फेराला जाते - काढली मदमा काचोळी
आली वर्षाची पंचम दोन वर्षाचं लुगडं
चल ग जैता खेळाया तीन वर्षांची चोळी
ठिवलं घंगाळांत पाणी निघाली वाडयाच्या बाहेरी
गेली अष्टीच्या घरांत गेली नदीच्या नेहरीं
काढलं अष्टीचं पातळ लागली वनाच्या मारगीं
गेली मदम्या घरांत एक वन वलांडिलं
काढली मदमा काचोळी दोन वनं वलांडिलीं
घॆतला झरझरा रुमाल तीन वनं वलांडिलीं
हळदी कुंकवाच्या पुड्या चौथ्या पांचव्या वनाला
अबीर बुक्काईच्या पुड्या दिसलं जैताचं माहेर
निघाली वाड्याच्य़ा बाहेरी जैता माहेरीं दासी म्हणून
गेली नदीच्या नेहरी राहते --
सासू दटावते म्हणून जैता
रागावून निघून जाते - दिसलं जैताचं माहेर
तिला डोळ्यान दापिली गेली नदीच्या नेहरीं
रडत फुंदत वाड्यांत आली पाण्या आल्या होत्या दासी
गेली अष्टीच्या घरांत जैता -
फेडलं अष्टीचं पातळ " तुम्ही दासी कोणाच्या ?"
दासी - सून बोलते सासूला
"आम्ही बापू रतनाच्या" भावजय -
जैता- "वेड्या झाल्याजी आवोजी
"बापू रतनाला सांगा सात कोट उपर माडी
आली मुलुखावरली दासी तेथं नांद जैता लाडी
करील दळण मळण नख नदर पडना
खाईल कलनाची कोंडा मुख कुठलं पडाया ?"
तिला वाड्याला नेली जैता -
एक रातराजी गेली
दुसर्या रात्रीं दळण दिलं "दुसरी ग माझी ओवी
जैताच्या ओव्या - माता माझ्या मदमेला
"पहिली ग माझी ओवी
बापा माझ्या रतनाला "
माता रडे घळघळा
आई -
"माझ्या जैताचा गळा"
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP