लोकगीत - गीत अठरावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
काळ्या गाईचं दूध चांगलं । जेव तूं कृष्ण जेव तूं बाळ ।
कृष्ण गवळ्याची राई । देग कृष्णाची चेंडूफळी ।
चेंडुफळी झुगारली । जाऊन पडली कडम डहाळी ।
चेंडूफळी उचलली । गोविंदा धावत पळत ।
आला मातेच्या महालांत । दिली राईनें चेंडूफळी ।
गेला गोविंदा खेळाया । चेंडूफळी या घेउनी ।
डाव मांडिला खेळण्याचा । राई धावत पळत ।
राई - आम्हाला घ्या हो खेळांत । गोविंदा बाळ बोलत ।
" नाही घेत खेळांत ।" "मी नाहीं दियाची खेळूनी।"
आला बापाच्या महालाला । बापा धावत पळत ।
राई बोलती झाली या । सांगू लागली बापाला ।
बाप बोलाया लागला । "घेरे राईला खेळांत ।"
"नको आमुच्या खेळांत ।"
हातांतली अंगुठी । देत झाली गोविंदाला ।
"आतां येते मी खेळांत "। "ये ग अमुच्या खेळांत ।"
दोघे लागले खेळायला । दोघे निघाले खेळूनी ।
आले आपल्या वाडयाला । खेळ खल्लास झाला ।
हारतुरा आणुन दिला ।राईच्या हातांत ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP