लोकगीत - गीत अठ्ठेचाळीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
तिथं पडला थेंब तिथं उगवला दवणा उगवला दवणा ।
दवणा नव्ह बाई दवण्याची काडी । आमच्या सुकृबानं बांधिली माडी ।
त्या माडीवर काढीला मोर । त्या मोराचा गुंजारी डोळा ।
ढवळा पवळा जी नंदी । मोटा जुळील्या दोन्हीं ।
सोडा सोडा वो पानी । वरल्या बागच्या कोनीं ।
अशी माळीण नखर्याची ।ओटी शंकर शेल्याची ।
हिरव लिंबु तोडीते । पिकलं लिंबू वो झेलीते ।
सई सई गोविंदा येतो । मजवरी गुलाल फेकीतो ।
तुझ्या गुलालाचा मार । माझा भांग झाला लाल ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP