झिम्मा - खाल्ल्या पटींत । वरल्या प...
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
खाल्ल्या पटींत । वरल्या पटींत । पेरला राळा बाई पेरला राऽळा ।
कोण्या देशींचा आला कावळा बाई आला काऽवळा ।
एक लोंबट खुडून नेलं बाई खुडून नेऽलं ।
सईच्या अंगणी झोंकून दिलं बाई झोंकून दीऽलं ।
सईनं उचलोनि घरांत नेलं बाई घरांत नेऽलं ।
कांडून कुटून राळं केलं बाई राळं केऽलं ।
राळ करुनी विकाया नेलं बाई विकाया नेऽलं ।
विकून टिकूनी पैसा केला बाई पैसा केऽला ।
पैका करुनी बांगडया लेली बाई बांगडया ल्येऽली ।
बांगडया लेवूनी घरला आली बाई घरला आऽली ।
घेतली घागर घेतली चुंबळ गेली पाण्या बाई गेल बाई पाऽण्या ।
तिथं धाकला दीर उभा बाई दीर उऽभा ।
त्यानं चाबूक चमकाविला बाई चमकावीऽला ।
दुसरा चाबूक दूरच्या दूर बाई दूरच्या दूर ।
माझं माहेर पंढरपुर बाई पंढरपुऽर ।
पंढरपुरच्या बांगडया साज बाई बांगडया साऽज ।
येतां जातांना खळखळ बाज वाई खळखळ बाऽज।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP