लोकगीत - गीत वीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
मिळल साथीशी गोपाळ । डाव चेंडूफळीचा मांडिला ।
चेंडू बाळाचा उडाला । जमना बाईला बुडाला ।
हरी रडत फुंद्त । आला देवईजवळीं ।
देवकी - " कुणी र डोळ्यानं दापीलं ? त्याचा डोळा मी काढीन ।
कुणी र बोटानं दापीलं ? त्याचं बोट मी मोडीन ।
कुठला काटा र मोडला ? तिथली कुपाटी झॊडीन ।
कुठला खडा र टोचला ? तिथली विदाई झाडीन
अन काय मागशी मुरारी? देईन तुजला श्रीहरी"
कृष्ण - " इस्त्यावाचून पोळी देग बाई मजला भाजून "
देवकी - "अन काय मागशी मुरारी? देईन तुजला श्रीहरी।"
कृष्ण - " आगाशीचा चांद दे बाई मजला धरुनी ।"
देवकी - " अन काय मागशी मुरारी ? देईन तुजला श्रीहरी।"
कृष्ण - " रांजण फोडून पाणी दे बाई मजला काढूनी ।"
देवकी - " अन काय मागशी मुरारी? देईन तुजला श्रीहरी।"
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP