लोकगीत - गीत आठवे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
सासू - सुनांचे गाणें - शावू बसली जेवाया
शावू - दोन गिरास वो सादील
सासू- सुनांचे भांडण तिसरा घास वो कडू लागला
सुनबाई बसली धुनसून "आवो आवो सासूबाई
सासू उठली दणकून तिसरा घांस वो कडू लागला "
ठाल्याठुल्याजी येविल्या "येडी झाली काय शावुबाई ?"
हिनें कांडील्या कुटील्या तुझ्या माहेराचा माळी आला
हिनें दळील्या मळील्या कडू मिरच्या देऊन गेला "
हिनें भाकरी रांधील्या चौथा घास कडू लागला
सासू सुनेला विष घालते "आवो आवो जी सासूजी
गेली लेकाच्या नांगरी चौथा घास कडू लागला
"लेका भाकरी कुठं ठेवूं " येडी झाली काय शावुबाई ?
तुझ्या माहेराचा तेली आला
ठिवाया आंब्याच्या वनीं " कडू तेल देऊंन गेला "
तिथं निघाला ढवळा नाग चौथ्या पांचव्या घासाला
तिनं मारीला मुरीला शावूला लटपट झाली
शेल्या पदरी बांधीला शावूला मूर्त येळ आली
" घ्या सूनबाई मासोळ्या सासू सुनेला पुरुन टाकते --
तिनं घेतील्या रांधील्या सासू गेली शेजारणीजवळीं
" या सासूजी जेवाया " "फडकुदळ देजा मला "
"माझं पोट वो दुखतं" " फडकुदळ काय काम ?"
शावू माझी बाळंतीण आमच्या शावूला दगा झाला ?"
फडकुदळ घेतलं नवरा -
शावू गाडून टाकीलं " येड्या झाल्या कां सासूबाई?
शावू नवर्याच्या स्वप्रांत जाते तुमच्या शावूला लेक झाला"
शावू सपनांत गेली आई नातवाच्या बाळंत -
"तुझ्या आईनं घात केला विड्याच्या तयारीला लागते -
नवरा आईला विचारतो - गेली सोनाराच्या घरीं
"साती उतरंडया उतरील्या आई -
साती मुख दिसल्या "अर अर सोनारदादा
एक मुख दिसत नाहीं " कडीतोडे देजा मला
आई - सोनार -
"गेली असेल म्हणली माहेरा" "कडीतोड्याचं काय काम ?"
नवरा शावूच्या माहेरीं जातो- आई
घोड्यावर्ती स्वार झाला
चालला सासूच्या गांवाला "शावू आमची बाळंतीण"
दुरुन ओळखीलं सासूनं
"माझा जावईबोवा आला
हाती घेतली पाण्याची झारी
तुमचं पाणी आमच्या शिरीं
आमची शावू तुमच्या घरीं
दिला पलंग टाकुनी
दाजी निजरागती झाला
शावू सपनांत आली
"उठ र मातानं घात केला
तुझ्या बयानं घात केला"
साती उतरंड्या उतरील्या
आई-
"खरं सांगा जावाईबोवा
कडीतोड मोडून गेलीं
आई -
खरं सांगा जावईबुवा
आमच्या शावूला दगा झाला ?"
नबरा -
"येडया झाल्या कां सासूबाई?
तुमच्या शावूला लेक झाला "
सासू तेथून निघाली
गेली शिप्याच्या आळीला
आई -
"अर अर शिंपीदादा
अंगड टोपडं देजा मला
हिरवं पातळ देजा मला "
हिरवं पातळ फाटून गेलं
"खरं सांगा जावईबोवा
आमच्या शावूला घात झाला"
नवरा-
"येडया झाल्या कां सासूबाई?
तुमच्या शावूला लेक झाला "
सासू तेथून निघाली
गेली साथी सजणापाशीं
आई-
"अर अर सातीसजणा
कुकुम चिठी देजा मला"
शिंपी
"कुंकुम चिठीचं काय काम? "
आई -
"आमची शावू बाळंतीण "
कुंकु मचिठी सांडून गेली
"खरं सांगा जावईबोवा
आमच्या शावूला दगा झाला?"
जावई -
"येडया झाल्या कां सासूबाई?
तुमच्या शावूला लेक झाला"
आई तेथून निघाली
गेली कासर्याच्या घरीं
"अर अर कासारदादा
हिरवा चुडा देजा मला"
कासार -
"हिरव्या चुड्याचं काय काम?"
आई --
"शावू आमची बाळतीण"
हिरवा चुडा फुटुन गेला
आई --
"खरं सांगा जावईबोवा
आमच्या शावूला दगा झाला ?"
नवरा -
"येडया झाल्या कां सासूबाई ?
तुमच्या शावूला लेक झाला
माता तेथून निघाली
गेली बुरुड आळीला
आई --
"अर अर बुरुडदादा
येळू कळक देजा मला"
बुरुड-
"येळू कळ्क काय काम?"
आई -
"शावू आमची बाळंतीण"
माझ्या शावूला दगा झाला?"
दाजी तेथून निघाला
गेला मरण पुवीला
स्मरण शावूचं रचीलं
शावू सरणांत घातली
खबर बयाला कळाली
बया धावत पळत
गेली सरणा वो जवळी
आई -
"आवो आवो जावईबोवा
स्मरण कुणाचं जळतं ?"
नवरा "स्मरण शावूचं जळतं"
पाच येढ वो घातील
आईनं उडी टाकीली
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP