लोकगीत - गीत अडोतीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
दोन तीन बैलांच्या लागल्या झुंजा ग लागल्या झूंऽजा ।
तिथें सांडल्या माझ्या गुंजा ग माझ्या गूंऽजा ।
धाकल्या दिराला गवसल्या ग गवसऽल्या ।
धाकल्या दिरानें काय माझं केलं ग काय माझं केऽलं ।
सासुसासर्या सांगीत गेला ग सांगीत गेऽला ।
सासूसासर्यानं काय माझं केलं ग काय माझं केऽलं ।
दोन तीन चाबुक चमकाविलं ग चमकावीऽलं ।
दोन तीन चाबूक दुरच्या दुरीं ग दुरच्या दूऽरीं ।
माझं माह्यर पंढरपुरी ग पंढरपूऽरीं ।
पंढरपुराचें काय बाय साजे ग काय बाय साऽजे ।
येता जातांना खुळखुळ वाजे ग खुळखुळ वाऽजे ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP