लोकगीत - गीत सतरावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
सासू सुनेवं भांडण । राईनीं सारवून सुरवून ।
राईनी धुणं गोळा केल । गेली यमुना नदीला ।
राईनी धुण जी धुतील । राईनी वाळत घातीलं ।
काढला अंगावरला अळींकार । राईनी आंघुळ जी केली ।
नेसली पिवळं पीतांबर । घातली मदमा काचोळी ।
राईनी धुणं गोळा केलं । राईनी गाठोडं बांधीलं ।
आली आपल्या घरला । राईनी धुणंजी ठेवीलं ।
घेतलं खुंटीचं आईन । तोंड न्याहाळाया लागलं ।
सर्व शीनगार आहे । गळ्यांतील हार नाहीं ।
राई धावत धावत । गेली यमुना नदीला ।
राई - " अग अग यम्नाबाई । इथं आलं होतं कोण?"
यमुना - " आला होता गोविंदादेवा । " राई धावत पळत । गेली गोविंदाजवळी ।
राई - अर अर गोविंदादेवा ।
हाराची हारकी काय ग देशी । देईन नाकांतील नथ ।
नाही नथजी लागत । राई तुमची आगत ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP