झिम्मा - झटी मारी झटी कंपळ पटी । स...
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
झटी मारी झटी कंपळ पटी ।
सईच्या सरी बापाच्या घरीं ।
बाप नाहीं सोनार ग सोनार ग ।
नथ नाहीं घडवली । पाया नाही पडवली ।
पाया ढोल ग ढोल ग । सवती बोल ग बोल ग ।
सवत बोल ना बोल ना । मांडव हाल ना हाल ना ।
मांडव सोन्याचा सोन्याचा । मुलगा वाण्याचा वाण्याचा ।
हळद लावून पिवळा केला । मारुतीच्या देवळांत नेला ।
आमची नवरी पुंजिती पुंजिती । जायकळ्या मागती मागती ।
जायफळया दाव ग दाव ग । आमची नवरी पाव ग पाव ग ।
आमची नवरी नेटाची नेटाची । चोळी शिवा चिटाची चिटाची
चीट गेलं लष्करीं लष्करीं । दोन आंब कुस्करी कुस्करी ।
एक आंबा हिरवा हिरवा । खाईल माझा दीर वा दीर वा ।
दीर वा गेला ताकाला ताकाला । विंचूं चावला नाकाला नाकाला ।
नाक करतं फुणफुण फुणफुण । उडया मारतं टुणटुण ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP