लोकगीत - गीत चवथे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
तिलोकीचा दाता कर्ता तो नारायण ।
समदं दिलस देवा कांही नाही उणं ।
पोटीं बाळ नाहीं तान्ह ।
दिलं देवानं अद्रेमान ।
हरण राहिली गरवार ।
हरणीचे नऊ महिने आलेत भरुन ।
झाली फुर्सत येळ ।
पोटीं बाळ जन्मलं तान्हं ।
कुण्या ग योगीं येऊन ।
पाहिलं फासे- पारध्यानं ।
दडत लपत येऊन ।
फास टाकला चौकुन ।
त्याग फाशामधी गुतली हरण मिरग ।
लावली गळ्यास दोरी ।
चालला पारधी घरास घेऊन ।
" दो दो रुपया राजा विकलय कारण "।
झाली राजाला खुशाली " घ्यावा बोलावून"।
स्वैपाकाचा वेळ झाला ।
बोलवा मुलाण्याला ।
हरिणी :-
"मुलाण्यादादा मुलाण्यादादा जरा होय जामीन ।
घरीं वो तान्हं बाळ दूध मी येतें पाजून"।
मुलाण्या: -
" तुम्ही जंगलचे जानवर काय तुमचं इमान ?
हरण आली तवरी नाहीं , तर कापाल मुलाण्याची मान"।
हरिणी: -
" पे पे बाळा मला जायाचं परतून"
पेया गेलं बाळ कडू लागलीं चारी थानं ! ।
पाडस: -
" कां ग माता कडू दूध ? सांग वर्तमान ।
हरिणी : -
" काय ग करुं बाई नेलं पारध्यानं धरुन "।
नाहीं प्यालं बाळ आली संग घेवून ।
पाडस: -
" माझं वो कोवळं मांस राजा कर तू भोजन "।
झाली राजाला खुशाली हरणी मिरग दिल्यात सोडून ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP