वेदस्तुति - श्लोक ३२
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
नृषु तव मायया भ्रमममीष्ववगत्य भृशं त्वयि सुधियो भवे दधति भाव मनुप्रभवम् ॥
कथमनुवर्ततां भवभयं तव यद्भ्रुकुटि: सृजति भुहुस्त्रिणेमिरभवच्छरणेषु भयम् ॥३२॥ (१९)
॥ टीका ॥
यया समस्त जीवांच्या ठायीं ॥
तुझिये मायेस्तव हें पाहीं ॥
भ्रमचत्र्क भ्रमतें सर्वदा ही ॥
जाणोनि ह्रदयीं धीमंतीं ॥३०॥
भवनिवर्तक जो तूं अभव ॥
त्या तुझ्या ठायीं दृढ सभ्दाव ॥
धरिती आणि मायाप्रभव ॥
मिथ्या माव निस्तरती ॥३१॥
नित्य नूतन जन्ममरण ॥
भ्रमचत्र्काच्या ठायीं जाण ॥
तयापासून तव पद शरण ॥
निर्भय पूर्ण निर्मुक्त ॥३२॥
तुझ्या ठायीं ज्यां अनुवृत्ति ॥
भयभय कैंचें तयां प्रति ॥
तरी तें कोणासि म्हणतां श्रुति ॥
प्रतिपादिती तें ऎका ॥३२॥
ज्यास्तव तुझें भ्रभंगरुप ॥
त्रिकाळ चत्र्कमय काळसर्प ॥
शीतोष्ण वर्षादि अभेदकल्प ॥
गणना अनल्प शब्दांची ॥३४॥
तव पद शरणा न वांछिती ॥
हें काळचक्र तयांप्रति ॥
जन्ममरणांच्या दु:खावर्ती ॥
भवभय प्राप्ति करीतसे ॥३५॥
अतएव ऎसें काळचत्र्क ॥
संसाररुपी महाक्रुर ॥
त्याचे निवृत्तीस्तव सुधीर ॥
होती दृढतर तव भजनीं ॥३६॥
सुधी म्हणिजे बुध्दिमंत ॥
तुझ्या ठायीं सभ्दावयुक्त ॥
होवोनि दुस्तर भवावर्त ॥
निस्तरती हें श्रुति बोधी ॥३७॥
तो चि भगवच्चरणीं भावो ॥
मनो नियमावांचूनि वावो ॥
मानसनियमें दृढसभ्दावो ॥
करी रोहो हरिभजनीं ॥३८॥
सद्गुरुसी न वचतां शरण ॥
सहसा नोहे मनोनिग्रहण ॥
यालागीं कीजे गुरुपसदन ॥
लाहिजे विज्ञान तत्कॄपया ॥३९॥
जो तापला तापत्रयें ॥
शत्रुषट्काच्या कुठारघायें ॥
त्रासला तेणें ह्रदयीं भय ॥
धरुनि अभय वांछितसे ॥४०॥
भवदु:खाच्या आहळणी ॥
आहळला म्हणे त्राता कोणी ॥
भेटोनि पुढती जन्ममरणीं ॥
पडों नेदी सर्वथा ॥४१॥
ऎसा सचिंत सर्व काळीं ॥
संसारभयाची काजळी ॥
नित्य जागवी ह्रदयकमळीं ॥
विषयमेळीं सुख न मनी ॥४२॥
एवं तापत्रयसंतप्त ॥
इहामुत्रीं पूर्ण विरक्त ॥
सद्गगुरुप्रति शरणागत ॥
रिघे त्वरित तो पुरुष ॥४३॥
समित्प्रसूनोपचारपाणी ॥
करुणास्वरें आर्तवाणी ॥
दृष्टि ठेवूनि सद्गुरु चरणीं ॥
नम्रमूर्ध्नि होत्साता ॥४४॥
सद्गुरु क्षोत्रिय श्रुतिसंपन्न ॥
तदुदित यथोक्त कर्माचरण ॥
ब्रह्यनिष्ठ प्रबोधनप्रवीण ॥
नित्य निमग्न स्वानंदी ॥४५॥
ऎसिया सद्गुरुप्रति तो शिष्य ॥
शरण रिघोनि करी दास्य ॥
अंवचकभावें निमिषोन्मेष ॥
कृपाकटाक्ष लक्षूनी ॥४६॥
येचि अर्थी अनेक श्रुति ॥
गुरुपसदन प्रतिपदिती । आचार्यवंतां पुरुषांप्रती ॥
ब्रह्यप्रतीति सुलभत्वें ॥४७॥
इत्यादि श्रुतिवाक्यांच्या ठायीं ॥
दृढ विश्चास धरुनि पाहीं ॥
गुरुभक्तिची बुध्दि कांहीं ॥
कुतर्कें चंचल न करावी ॥४८॥
सुष्ठुज्ञानसंपन्न पुरुष ॥
आचार्यमुखेंचि ब्रह्योपदेश ॥
प्रियतम मानूनि स्वानुभवास ॥
लाहे नि:शेष भेदलयें ॥४९॥
ऎशा अनेक बलिष्ठ श्रुती ॥
गुरुभजनातें प्रबोधिती ॥
शुक नृपातें येचि अर्थी ॥
बोले सुमति तें ऐका ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP