मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| ४६ ते ५० वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० स्फ़ुट पदें व अभंग - ४६ ते ५० ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव स्फ़ुट पदें व अभंग - ४६ ते ५० Translation - भाषांतर ४६ श्लोक (वंसततिलका)तंतू न होनि पट जेविं पटत्व दावी । तैसी जनस्थिति निरंजनिं हे वदावी ॥श्रुत्यर्थ नेति परिहारुनि मौनशेषा । वंदी दयार्णव निरंजन निर्विशेषा ॥१॥४७ ॥ अभंग १॥पंचीकॄत धर्म इंद्रियाचें कर्म ॥प्रारब्धाचें काम संपादिती ॥१॥त्रिगुणांच्या भरें ईश्वराची सत्ता ॥वायु नाचवितां मुख्य याचा ॥२॥माझे अहंतेची कोणे ठायीं वस्ती ॥नाहीं देहाप्रति धांडोळितां ॥३॥बोलतां चालतां मीचि देतां घेतां ॥मूर्खत्वें अहंता सत्य वाटे ॥४॥कोण्हाचेनि वागे वायु व्योमखांचे ॥कोण्हाचेनि नाचे विद्युलता ॥५॥पर्जन्याचें पाणी कोणाची बाहाणी ॥कोणाची काहणी वेद बोले ॥६॥लक्ष चोंर्यांशीचा झाडा घेतो कोण ॥कोणा पापपुण्य दृश्य होतें ॥७॥जयाचे सत्तेनें पॄथ्वी भूतें वाहे ॥तोचि वर्तताहे भूतमात्रीं ॥८॥मूर्खत्वें बोलतां चालता मी मानी ॥अहंता खंडणीं व्यर्थ होय ॥९॥आपुला विसर अविद्येनें केला ॥पाहिजे पूशिला ठावो तिचा ॥१०॥दयार्णवीं पूर्ण अविद्येच्या नाशें ॥गोविंद प्रकाशे सदोदित ॥११॥४८ ॥ अभंग २॥शुध्द परब्रह्य स्वयें सदोदित ॥अद्वैतीं दुश्चित *माया केलें ॥१॥मी ब्रह्य ऐसी जे उठली अहंता ॥तोचि जगन्माता योगनिद्रा ॥२॥संकल्पें तात्काळ सर्व सॄष्टि दावी ॥ईश्वर गोसावी सिध्द केला ॥३॥रजसत्त्व-तम-ब्रह्या-विष्णु-रुद्र ॥जन्मस्थितिमार धंदा योजी ॥४॥इच्छाज्ञानित्र्किया शक्ति जाली त्रिधा ॥संयोगेंचि शुध्दा बध्द केलें ॥५॥तमाचें अज्ञान जडमूढ कारण ॥जाहलें मंडण पंचभूतां ॥६॥आकाश पवन तेज तोये भूमि ॥यांचे समागमीं विषय पांच ॥७॥शब्दस्पर्शरुपरसगंध पांचा ॥जन्म जाला साचा तमोगुणीं ॥८॥सुषुप्ति अवस्था प्राज्ञ अभिमानी ॥भोग ह्नदय स्थानीं आनंदाचा ॥९॥सामवेद वाचा पश्यंती विस्तार ॥पडे अंधकार स्वरुपाचा ॥१०॥कॄष्णदयार्णव स्वयें साक्षी याचा ॥ठाव अहंतेचा आढळेना ॥११॥ज्ञानशक्तियोगें सत्त्वतमापोटीं । सूक्ष्माची सूष्टि कर्तृत्वा ये ॥१॥अंत:करणमनबुध्दिचित्त जाण । कर्तेभोक्तेपण अहंतेसी ॥२॥अज्ञानाचे पोटीं ज्ञानाचें स्फ़ुरण । तेंचि अंत:करण व्योमाकार ॥३॥संकल्पें विकल्पें चंचळत्वें तेंचि । दावी मन त्याची कामत्र्किया ॥४॥संकल्पीं विकल्पीं निश्चया प्रकाशी । सत्त्वरजें तीसि बुध्दिनाम ॥५॥निश्चियाचे ठायीं अनुसंधाम राखे । चित्त तें ओळखें रजतमाचें ॥६॥अनुसंधानीं पूर्व पडे अंधकार । तोचि अहंकार मोहतमे ॥७॥येकी वॄत्ती मुळीं चतुर्धा भागली । कर्तॄत्वासि आली पंचविध ॥८॥तमापोटीं सत्त्व तेंचि लिंगदेह । स्वप्नावस्था होय तैजसाची ॥९॥प्रविविक्त भोग कंठस्थानीं घडे । यजुर्वेद पढे मध्यमाते ॥१०॥कल्पनेच्या मागे देखें नानाकार । संकल्पें संसार अंकुरला ॥११॥कॄष्णदयार्णव प्रबोधें निरास । करितां गर्भवास पारुषतो ॥१२॥४९ ॥ अभंग ३॥क्रियाशक्ति-योगें रजाची उत्पत्ति । पंचप्राण होती दशेन्द्रियें ॥१॥आपादमस्तक सर्वगत व्यान । नांदतो समान नामिदेशीं ॥२॥कंठस्थ उदान ह्नदयीं वसे प्राण । विचरतो अपान अधोद्वारीं ॥३॥नागकूर्मकॄल आणि देवदत्त । धनंजय गुप्त पंचवायु ॥४॥अंगमोडा सिंक उचकी ढेकर । जांभई प्रकार कर्में यांचीं ॥५॥श्रोत्रत्वचाचक्षुजिव्हा आणि घ्राण । ज्ञानेंद्रियें जाण पांच ऐसीं ॥६॥वाचा पाणि पाद शिश्न आणि गुद । पांच हीं प्रसिध्द कर्मेन्द्रियें ॥७॥त्रिगुणांचीं तत्त्वें कालवूनि येक । कर्दमाचा देख स्थूळ देह ॥८॥जागृति अवस्था वर्ते नेत्रस्थनीं । विश्व अभिमानी स्थूळ भोक्ता ॥९॥वाचा ते वैखरी ऋग्वेद उच्चारी । मातॄका अकार आद्य चरण ॥१०॥विजातीयपणें निरास करावा । कृष्णदयार्णवा वोळखूनि ॥११॥५० ॥ अभंग ४॥पृथ्वीचें काठिण्य द्रवत्वें जीवन ॥तेजाचें शोषण दाहकत्व ॥१॥चांचल्यें पवन व्योमाचें मोहन ॥पंचवीस गुण स्थूळ देहीं ॥२॥चारी देह येकवटूनियां स्थूळ ॥होये अनुकूळ त्याग भागा ॥३॥तुरीय तो ज्ञाता कारणीं आंधळा ॥लिंगें घे सोहळा स्थूळ गात्रीं ॥४॥ज्ञाता साक्षीपणें अथ नेणें म्हणे ॥वेंचे अंत:करणें व्यानावरी ॥५॥श्रवणाच्या द्वारें वाचच्या आचारें ॥शब्दाच्या विचारें व्योमीं रिघे ॥६॥स्तुतीचा सोहळा याचि पंथें भोगी । निंदा भय त्यागी याचि मार्गें ॥७॥त्याग भोग क्रिया स्थूळ देहिं भासे । परि चहूंविण नसे क्रियाजात ॥८॥चहूंदेहातीत आत्मा सदोदित । तयासीं सतत ऐक्य कीजे ॥९॥अनेक साधनें व्रतें अनुष्ठानें । योगयागदानें त्याचि साठीं ॥१०॥तोचि दयार्णव सेवावा अनन्य । तरिच धन्य धन्य जन्मा येणें ॥११॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP