मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३३-३

वेदस्तुति - श्लोक ३३-३

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥श्लोकसंमति: ॥
संस्कॄतै: प्राकृतैश्चैव गद्यपद्याक्षरैस्तथा ॥
देशभाषादिभि: शिष्यं बोधयेत्सद्‌गुरु: स्मृत: ॥३॥

॥ टीका ॥
नौके अहंतेच्या खडकीं ॥
सवेग बैसों पाहे धडकी ॥
तेथ प्राकॄत वाक्यविवेकीं ॥
अवलीं झडकी जळलोटा ॥५७॥
सवेग वळूनि मागिलीकडे ॥
पूर्वप्रवाहें चालवी कोढें ॥
ज्ञान अहंतेचे कठोर कडे ॥
चुकवूनि पुढें नौका ने ॥५८॥
असंभावनासंशयावर्तीं ॥
नौका बुडों पाहे अवचिती ॥
तेथ संस्कृता उपनिषदुक्ति ॥
सभ्दावभक्ति तागादी ॥५९॥
मुक्ततायथेष्टचारखळाळी ॥
पडतां शास्त्रोक्ति गुणीं बहळीं ॥
गद्यपद्याक्षरीं बळी ॥
अचंचळजळीं नियमाच्या ॥६०॥
रसास्वाद नवावधानीं ॥
ऋध्दिसिध्दिहेलावनीं ॥
नौका उलथतां लंगरे करुनी ॥
भाषावचनीं स्थिरावी ॥६१॥
ऎसा सद्‍गुरु कर्णधार ॥
नॄदेहनौकातारक चतुर ॥
तत्सेवनें साधक सधर ॥
मनस्तुषार आकळिती ॥६२॥
मानसवेग म्हणनी मोठा ॥
क्षणार्घें फ़िरे ब्रह्यांडमठा ॥
साधकांच्या भंगी निष्ठा ॥
यास्तव काष्ठा असाध्य ॥६३॥
काशी रामेश्वरीं ॥
क्षणार्धें सहस्त्र वेरझारी ॥
जगन्नाथीं द्वारकापुरीं ॥
करितां फ़ेरी पळ न लगे ॥६४॥
यथार्थ मन जरी जात असतें ॥
तरी यात्रेची वार्ता यातें ॥
पुसतां सविस्तर सांगतें ॥
तैं अनावर होतें मग सत्य ॥६५॥
मना जावया कैंचे पाय ॥
स्मृतिचात्र्चल्यें पवनप्राय ॥
वेगवत्तर भासताहे ॥
जें अभक्तां होय अनावर ॥६६॥
लाहूनि गुरुकॄपेचें बळ ॥
भजनीं नियोजिती प्रेमळ ॥
भावें भजतां श्रीपदकमळ ॥
तैं होय निश्चळ अनायासें ॥६७॥
भगवभ्दजनसुखानुभवें ॥
संकल्पत्यागें मानस निवे ॥
गुरुकॄपेवीण निश्चळ नह्ने ॥
उपाय आघवे करितां ही ॥६८॥
मनश्चात्र्चल्य कुनर पिसे ॥
यास्तव व्यसन शताकुळ ऎसे ॥
बोलिले ते ज्या व्यसनसोयें ॥
भवीं बुडती तें ऎका ॥६९॥
आणि सद्‍गुरु कर्णधार ॥
तव पदभजनें भवसागर ॥
तारी ऎसा कॄतनिर्धार ॥
तो सविस्तर कथिला कीं ॥७०॥
तुझिया चरणभजकांप्रति ॥
सद्‍गुरुकॄपें ज्ञानप्राप्ति ॥
तेगें भक्तसुखीं होय विरक्ति ॥
व्यसनाची गुंती त्यां नाहीं ॥७१॥
सद्‍गुरु बोधी तव पदभजम ॥
तेणें न निग्रहिता निग्रहे मन ॥
व्यसनशतका अस्तमान ॥
निर्मुक्तपणें सहजेंची ॥७२॥
अनुभवूनि लोक समस्त ॥
कोठें न चुकें दु:खावर्त ॥
ऎसा जाणोनियां सिध्दान्त ॥
होय विरक्त ब्रह्यनिष्ठ ॥७३॥
कर्मरचित सर्व लोक ॥
स्थावरान्त ब्रह्यादिक ॥
जाणोनि करी मग विवेक ॥
म्हणे भवसुख दु:खमय ॥७४॥
कूपीं देखूनि स्वप्रतिबिंबा ॥
सिंह आवेशें चढे क्षोभा ॥
कोण्ही न मरितां क्रौर्यवालभा ॥
स्तव तो उभा बुडे दु:खीं ॥७५॥
तेंवि धरुनि विषयीं प्रेम ॥
तत्प्राप्त्यर्थ करुनि कर्म ॥
लोक लोकान्तरें समविषम ॥
स्वेच्छा अधम अनुभविती ॥७६॥
येथ कोणाचा बलात्कार ॥
नसतां सकामकर्मादर ॥
करिती तेणें भवसागर ॥
स्वकॄत घोर अनुभविती ॥७७॥
इष्टकर्माच्या साधनें ॥
ब्रह्यलोकापर्यत जाणें ॥
पुढती तवभजनाविणें ॥
क्षीणपुण्यें अध:पतन ॥७८॥
तैसेंचि करितां अनिष्ट कर्म ॥
पाविजे अंधतम दुर्गम ॥
मिश्रकर्में नृपोत्तम ॥
धनसुतसंभ्रमकर होय ॥७९॥
अकृत म्हणिजे मोक्षावाप्ति ॥
कर्में न पविजे कल्पान्तीं ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP