स्फ़ुट पदें व अभंग - ३१ ते ३५
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
३१ श्लोक (स्वागता)
नाथ गात जरि मानव वाचे ॥
तो वरी वर हेरिविभवाचे ॥
धन्य तो सुत जनीं जननीचा । याचिती कुजन ते जन नीचां । जो जपे सकळ कोप शमाया । तो न लेखित जगा विषमा या । देखतो प्रबळ हेत जनाचा । तो रची पथ तसा भजनाचा । अंतरी विविध जाणत रंगा । जेविं सागर धरीत तरंगा । नेणतेपण जगीं मिरवीतो । ज्ञानसिंधु-महिमा जिरवी तो । भू धरीत उदरीं सुरभाग्यां । कीं न तें प्रगटवी हतभाग्यां । तेविं जो स्वसुखसार-विचारा । दाखवी न सहसा अविचारा । देखतां सकळ दंभ पसारा । लोक पसरे मग सारा । फ़ावलें स्वसुख-सार जयाला । लौकिकीं कवण लाभ तयाला । सापडे कनककुंभ जयातें । तो कदापि न वदे दुजयातें । रंगला ह्नदयिंच्या सुखसारा । तो कसा करिल दंभ-पसारा । जो आनंद भगलिंग उपाधी । ते जनीं प्रगटतां जन बाधी । कोटिमन्मथ-आनंद जनासी । केविं दावुनि थितें निज नासी । जो गजावरि आरोहण होये । तो अजाश्रय अपेक्षिल काये । तेविं ज्या स्वसुख सांपडलें हो । काय त्या जनविना पडलें हो । सोंकला भ्रमर पंकजपाना । होय तो निरत केविं अपाना ॥
तेविं कॄष्णसदयार्णव जाला । तो न सेवित पुन्हा भवजाला ।
३२ श्लोक (वसंततिलका)
पाताळ भूतळ सुरालय सत्यलोकीं । कीर्तिप्रकाश अवघा भरला त्रिलोकीं ॥
ते ऐकती करिति कीर्तन गद्यघोषा । नारायण स्तवि दयार्णंव निर्विशेषा ॥१॥
चिन्मात्र तोचि अवघें जगरुप जाला । त्याच्याच पादभजनें भवघी बुजाला ॥
दावूनि लोपवित मायिक नाट्यवेषा । नारायण०॥२॥
ब्रह्यादिदेव चरणांबुज चिंतिताती । वेदश्रुती सगुण निर्गुण रुप गाती ॥
अद्यापि भक्त भजती त्यजिती भवाशा । नारायण०॥३॥
काळानळ प्रगट सांठविला स्वनेत्रीं । काळोपमा भुजग भूषणभूत गात्रीं ॥
काळत्रया अकळ तूं अखिलांड[अ]धीशा । नारायण०॥४॥
श्रीनारसिंहनगरीहुनि जो दयाब्धी । याम्यसि नांदत असे स्वसुखोपलब्धी ॥
भक्तां अभिष्ट वर दे करितां प्रदोषा । नारायण०॥५॥
कॄष्णवेणाककुद्मत्या:* संगमेऽनंगजिच्छिव: । नमस्तस्मै नमस्तस्मै०॥
३३ श्लोक (वंसततिलका)
मर्दनियां कुवलयाव्हयपीड हस्ती । उत्पाटिलें इभरदासि तदा स्वहस्तीं ॥
घेऊनि रंगगत साग्रज भाविलासे । मल्लारि कॄष्णसदयार्णवभा विलासे ॥१॥
चाणूरमुष्टिकवरिष्ठ समस्त मल्लां । देखून्या हतपराक्रम सौविदल्लां ॥
आब्जेक्ष लक्षुनि निजाक्रम दाविलासे । मल्लारि०॥२॥
मल्लार्दनाप्रति जनार्दन सज्ज जाला । मर्दूनि भू पिटित वित्र्कमयुग्भुजाला ॥
ताऊनिया भॄकुटि ओष्ठहि चाविलासे । मल्लारि०॥३॥
वज्राकृती कठिण मल्लगणांसि वाटे । शास्ता खळां विचरतां गमतो कुवाटे ॥
कारुण्यवेध स्वजना प्रति लाविलासे ॥
मल्लारि०॥४॥
बाळाकृति गमतसे पितरां मनीं हो ॥
कंदर्परुप बदती शुभकामिनी हो ॥
क्रोधें कॄतांतनिभ कंस दटाविलासे ॥
मल्लारि०॥५॥
ऐसा यथोचित समस्त मनांसं भासे ॥
अंधां गजाकॄति जशी पहातां अभासे ॥
तैसा समस्त ममता गमतो विकारी ॥
मल्लारि कॄष्ण्सदयार्णब निर्विकारी ॥६॥
३४ श्लोक (भुजंगप्रयात)
जगत्पावना पार्वतीशा दयाळा । नमस्ते जगत्कारणा विश्वपाळा ॥
गुणातीत विश्वंभरा श्रीपरेशा । कृपांभोनिघे पाहि मां पावकेशा ॥१॥
नमो चिद्विलासा नमो विश्वभासा । नमो शुध्द्वसन्मात्र कैलासवासा ॥
नमो कोटिकंदर्पलावण्यकोशा । कॄपांभोनिधे०॥२॥
भयातीतकैवल्यदानी शिवा र । सदा चिंततां विघ्नकोटी निवारे ॥
निराकार निर्मत्सरा पार्वतीशा । कॄपांभोनिधे०॥३॥
पदीं तिष्ठती अष्ट सिध्दी सदा रे । पदीं निष्ठ संतुष्ट त्यां सर्वदा रे ॥
पदा वर्णितां मौन संप्राप्त शेषा । कॄपांभोनिधे०॥४॥
नमो त्र्यंबका पंचवक्त्रा पुराणा । मिथ: संगमा शंभुवैकुंठराणा ॥
जगदोपना गोपती व्योमकेशा । कॄपांभोनिधे०॥५॥
नमो स्पष्ट काष्ठांबरा अष्टमूर्ती । नमोऽभीष्टदा दुष्टसंहारकीर्ति ॥
जपे नाम तो नातळे कष्टलेश । कॄपांभोनिधे०॥६॥
जगभ्दक्षका रक्षका अंतरंगा । निराधार आधार मायातरंगा ॥
अनिर्देश्य निर्द्वेषताअ नामघोषा ॥
कृपांभोनिधे०॥७॥
दयासागरा नागरा मारनाशा । पदा वंदितां नाश पावे दुराशा ॥
स्वभक्तांसि संतुष्ट होसी महेशा । कृपांभोनिधे०॥८॥
३५ श्लोक (वसंततिलका)
अंवा विराजत असे स्वलिळाविनोदें ॥
ब्रह्यांडकोटी रचितां खचितां आनंदें ॥
मानूनि विस्मय पुन्हा स्वरुपा निरीक्षी ॥
योगेश्वरी वर दयार्णव भक्त रक्षी ॥१॥
अबेसमीप वसतीस अमर्त्य आले ॥
तीर्थे व्रतें मख मुनीश्वर ही मिळाले ॥
नाना स्तुती करिति लक्षुनि सारसाक्षी ॥
योगेश्वरी वरदयार्णव भक्त रक्षी ॥२॥
अंबा शिवान्वित वसे सुखरुप जेथें ॥
अंबापुरी प्रति रची विधि शीघ्र तेथें ॥
जें क्षेत्र निर्मळ पवित्र जनाघ भक्षी ॥
योगेश्वरी वरदयार्णव भक्त रक्षी ॥३॥
गंधर्व किंन्नर सुरासुर सिध्द सारे ॥
अंबापुरीं सकळ जाउनियां बसा रे ॥
अंबा स्वयें विधि म्हणे कवणा नपेक्षी ॥
योगेश्वरी०॥४॥
गोपाळ गोपपरिवोष्टित तेथ आला ॥
देखोनि योगमहिमा ह्नदयीं निवाला ॥
गो-देवितीर्थ परिकल्पित अंबुजाक्षी ॥
योगेश्वरी० दयार्णव ॥५॥
गोपाळतीर्थ रचिलें कमळापतीनें ॥
त्यामाजिं नांदत असे सुखसंपतीनें ॥
अल्हादवी स्वजन जो करुणाकटाक्षीं ॥
योगेश्वरी० दयार्णव ॥६॥
पुण्याथिले विविध नांदति तीर्थवासी ॥
दे भुक्ति मुक्ति वर दे सकळां जिवांसी ॥
पापी अभाग्य नर पट्टण हें उपेक्षी ॥
योगेश्वरे०॥७॥
हे वैष्णवी प्रकॄति दानव संहरुनि ॥
योगस्थिती स्वकृतबाधकता हरुनी ॥
लावूनि लोचन *सदासद जे परीक्षी ॥
योगेश्वरीवर दयार्णव भक्त रक्षी ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP