मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
२१ ते २५

स्फ़ुट पदें व अभंग - २१ ते २५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


२१ श्लोक  ( वसंतिलका)
जिंकावया षडरिपुप्रमदोत्कटातें ॥
सोसावया त्रिविधिपावकसंकटातें ॥
पाधावया पद अचंचळ केशवाचें ॥
भिक्षाप्रदान मज कॄष्णदयार्णवाचें ॥
वैराग्ययक्त इहभोग तजावयातें ॥
स्वर्गादि भोग अवघे वरजावयातें ॥
चिंतावया हरिकथामृत नित्य वाचे ॥
मिक्षाप्रदान०॥
तॄष्णा समस्त भवमस्त्त शमावयाला ॥
सर्वेन्द्रियां निजविवेक दमावयाला ।
छेदावया त्रिविधबंधन या जिवाचें ॥
भिक्षाप्रदान०॥
प्रारब्ध संचित समग्र सरावयासी ॥
जन्मान्तरार्जित मना विसरावयासी ॥
भंगावया कठिण बीज पुरें भवाचें ॥
भिक्षाप्रदान०॥
चांचल्वचित्त गुरुराजपदीं रमाया ॥
खंडावया कठिण दांभिक घोर माया ॥
मिथ्या अभास जग साचपणें न वांचे ॥
भिक्षाप्रदान०॥
तोडावया सकळहीए ममता मनाची ॥
सोडावया सफ़ळ संगति कामनांची ॥
मोडावया कुशलता नटणें शवाचें ॥
भिक्षाप्रदान०॥
वृन्द त्रिसप्तक पुरातन पूर्वजांचें ॥
पावावया सदन तें गरुडध्वजाचें ॥
सांडावया सकळ पातक पालवाचें ॥
भिक्षाप्रदान०॥
जाणावया सकळ तॄप्त अखंड आत्मा ॥
तो मीच देह नसतां वसतो महात्मा ॥
नाहीं मला स्मरण आठवनाठवांचें ॥
भिक्षाप्रदान०॥
गोविंदराजे गुरुवर्यपदाराविंदा ॥
चिंतावया त्यजुनि मन्मथसंगधंदा ॥
पावावया सुह्नद भीष्मबळिध्रुवांचें ॥
भिक्षाप्रदान०॥

२२ श्लोक (द्रतविलंबित)
स्वसुख बोधितसे स्वमुखे श्रुती ॥
श्रुतिच दे भ्रमितांप्रति संसृति ॥
त्रिभुवनात्मक मानुनि काम रे ॥
मरमरों उपजे पुढती मरे ॥
कळतही कळणें न कळे कदा ॥
भ्रमभरें रमतो जन शोकदां ॥
करुनि कर्म मखादि सकाम रे ॥
मरमरों उपजे०॥
शतमखांस्तव शत्र्कपणा वरी ॥
म्हणुनि हांव कदापिहि नावरी ॥
*कर विराट पुरंदर जन्म रे ॥
मरमरों उपजे०॥
जरि वृथा सुरलोकफ़ळश्रुती ॥
तरि मॄषा अवघी मग संसॄती ॥
विधि न जाणुनि कामिक वाव रे ॥
मरमरों०॥
जरि दयार्णब-सेवन आकळे ॥
तरि वॄथा भवसंभ्रमता कळे ॥
तजिल जो सुखशाश्वत धाम रे ॥
मरमरों उपजे०॥

२३ श्लोक (वंसततिलका)
धाता रची जग जगत्पति सर्व पाळी ॥
पाळी हरी मग हरित तया कपाळी ॥
कर्ता समर्थ, तरि यत्न वृथा जनाचा ॥
दाता दयार्णब सदा जनभोजनाचा ॥१॥
जाता वना क्षुधित पांडव पांडवांची ॥
कांता मुखें हरिगुणांसि अखंड वाची ॥
बोधूनि सूर्य मग देत सवेग थाली ॥
भिक्षामॄतें मज दयार्णव तोचि पाळी ॥२॥
ज्याचें असेल पदरीं कृतपुण्य जैसें ॥
त्याला घडे मग पुढें सुखदु:ख तैसें ॥
जो भोगवी सकळ लेहुनियां कपाळीं ॥
भिक्षामृतें मज०॥३॥
मातेस तो द्विजकुमार पयान्न याची ॥
देवासि माग म्हणतां जननी तयाची ॥
केला सुनिष्ठ उपमन्यु पयाब्धिपाळी ॥
भिक्षामृतें०॥४॥
जंबूद्रुमातळवटीं मुनि जाबळातें ॥
मध्यान्हकाळ भरल्यावरि दे फ़ळातें ॥
ज्याच्या भयें मुनिजनां भजिजे नॄपाळीं ॥
भिक्षामॄतें०॥५॥
मातापिता रमति सौख्यविलासयोगें ॥
बिंदु स्त्रवोनि जठरीं पडिला प्रसंगें ॥
तैंहूनि दुग्ध रचिलें स्तनरक्तगोळीं ॥
भिक्षामृतें०॥६॥
पावे शिशूंस अवलोकुनि कासवीहो ॥
तैसा समर्थ अवघ्या त्रिजगासि वी हो । ज्या चूकतां शिणति दुर्जन सर्वकाळीं ॥
भिक्षामृतें०॥७॥
योनी समस्त रचिल्यावरि पाळिताहे । व्यापूनि विष्णु जग सर्वहि चाळिताहे । जो पूजिजे सुरपदादिकलोकपाळी ॥
भिक्षामॄतें०॥८॥
अंडांत एक जठरीं जिवनीं वनीं हो । पाषाणगर्भ जड अक्षम भावनीं हो । विश्वंभराविण तया दुसरा न पाळी ॥
भिक्षामॄतें०॥९॥
गोविंदगोमय जगत्त्रय जाणता हो ॥
पाळी जनांसहित निश्चय बाणतां हो ॥
होणार हो नरहरी भजना न टाळी ॥
भिक्षामॄतें मज दयार्णव०॥१०॥

२४ साक्या
अर्णवजाधकर्णसमुभ्दव कंजजभक्षणकाळीं ॥
अंबा पंकजसंभव केशव चेतवि निद्रेक्षणकाळीं ॥
जगदंबा विश्वकदंबा हो ॥धॄ०॥
संघटती मधुकैटभ दुर्घत तुष्टविती वैकुंठा ॥
धिट हटि उलटे वर देउनियां छेदविती निजकंठां ॥जगदं०॥
दुर्धर तो महिषासुर निर्जर जिंकुनि घालित बंदीं ॥
ते समयीं शिवशक्ररमाधव चिंतिति आद्य अनादि ॥जगदं०॥
क्रध्द विधी परमेश्वर्र निर्जर देखति सिध्द भवानी ॥
शस्त्रसमुच्चय अर्पुनि कर्पुरगौरविधि स्तुति वाणी ॥जगदं०॥
तोषभरें समरोध्दत गर्जुन तर्जित दुर्जन दर्पी ॥
शत्र्करिपू महिषासुर मर्दुनि मुक्तिपदासि समर्पी ॥जगदं०॥
शुंभ-निशुंभ सुरेश्वर जिंकूनि देवपदच्युतकारी ॥
अग्नि-कुबेर-निशाकर-भास्कर प्रार्थिती जेंवि भिकारी ॥जगदं०॥
चिंतिति ते उदयोस्तु मुखें सुर देखति दुर्धर माया ॥
शुंभनिशुंभ मदोन्मत मोहित इच्छिति बध्द रमाया ॥जगदं०॥
भुंड सचंड उदंड सुरद्विट् मर्दित्त दिव्यकुमारी ॥
रक्तसमुभ्दव शुंभनिशुंम अमूप-चमूसह मारी ॥जगदं०॥
अब्जज शर्व दयार्णव केशव अर्चित अब्जदलाक्षी ॥
सांकडिंचे घडि रोकडि येउनि दुष्ट भयंकर भक्षी ॥जगदं०॥

२५ गोपीगीत
एकत्रिंशी निराशा त्या पुढती पुलिना आल्या ॥
गोपिका कृष्ण गाती त्या प्रार्थिती ये म्हणोनियां ॥
नमुनि सद्ररु गोपिनायका । विरहिणी व्रजीं गाति बायका ॥
कथिन ते कथा प्राकॄतें खरी । जशिच श्रीशुकाचार्यवैखरी ॥
उपजणें तुझें प्राप्त गोकुळीं । वसत इंदिरा ऊर्जितागळीं ॥
प्रगट हो सख्या धुंडितो दिशा । असु विगुंतले जाहलों पिशा ॥
हरि दयार्णवा प्रेमगौरव । प्रगट हो सख्या तोष दी जिवा ॥धृ०॥
सरसिजें शरत्काळिंची तळां । विकसिते तयांतील चित्कळा ॥
हरुनि माखिल्या नेत्रमार्गणें । फ़ुकट किंकरी हें न मारणें ॥
हरि दयार्णवा०॥
विषजलें क्षया पावते क्षणीं । अघ अरिष्ट कां वातवर्षणीं ॥
मयसुतादिकांपासुनी आम्हां । जिवविणें तुझें व्यर्थ काय मां ॥
हरि दयार्णवा०॥
नव्हसि गोपिकातोषदायकू । ह्नदयसाक्ष तूं विश्वनायकू ॥
विनवितां विधी विश्वरक्षणीं । यदुकुळीं तुझें जन्म ते क्षणीं ॥
हरि दयार्णवा०॥
शरण संस्कॄतीभ्याड जे आले । अभय श्रीकरें त्यांस वोपिलें ॥
परिणिली हरि ज्या करें रमा । धरिं शिरीं तया पाणिसत्तमा ॥
हरि दयार्णवा०॥
व्रजविपत्ति तूं नाशिता हरी । स्वजनगर्व जो सुस्मितें हरी ॥
प्रगटवीं सख्या किंकरी आम्हां । कुमुदकानना वक्त्रचंद्रमा ॥
हरि दयार्णवा०॥
पशुपथीं वनीं जाति जीं पदें । जगदघांतकें इंदिरास्पदें ॥
फ़णिफ़णांवरी रम्य नर्तकें । कुचयुगीं धरीं कामकर्तकें ॥
हरि दयार्णवा०॥
मधुर उत्तरें पंडितप्रियें । कमललोचना बोलसी स्वयें ॥
अनुचरी तिहीं व्याकुळा हरी । अधर-अमॄतें प्राण मोहरीं ॥
हरि दयार्णवा०॥
तव कथासुधा तप्त वांचवी । अघहरा कवी वर्णिती चवी ॥
श्रवणमंगळा श्रीमदाकुळां (?) । कथक देति भू भूरि सोहळा ॥
हरि दयार्णवा०॥
हसित पाहणें प्रेम उत्सहें । विचरणें तुझें ध्यान भाग्य हें ॥
झुरतसों मनीं येकल्या घरीं । स्मर भरें मनें क्षोमवी शरीं ॥
हरि दयार्णवा०॥
पशु चरावया नेसि जैं वनीं । मॄदु पदें तुझीं पंकजाहुनी ॥
तिखट दर्भ हे रुतती झणीं । विकळता भरे आमुचें मनीं ॥
हरि दयार्णवा०॥
उतरतां दिना कुंतळीं घना-परिस गोरजीं व्याप्त आनना ॥
घडि घडी विभो दाउनि अम्हां । मनिं मनोज तूं देसि सत्तमा ॥
हरि दयार्णवा०॥
शरणतोषकें कंजजार्चितें । आपदि ध्येय जीं भूमिमण्डितें ॥
सुखतमें तुझीं रम्य पाउलें । स्तनिं धरीं आम्हां सर्व पावलें ॥
हरि दयार्णवा०॥
सुरत वाढवी शोक खंडुनी । स्वरित वेणुनें चुंबिते क्षणीं ॥
इतर आवडी सांडवी जना । अधरपान तें वोपिं चुंबना ॥
हरि दयार्णवा०॥
फ़िरसि तूं हरी काननें दिवा । त्रुटि युगापरी जाय तेधवां ॥
मुख निरीक्षितां शापितों विधी । करित पापण्या व्यर्थ मंदधी ॥
हरि दयार्णवा०॥
सुत-पती-कुळें-बंधु लंघुनि । तुज निमित्त रे पातलों वनीं ॥
गति अमिज्ञ तो गीतसंभ्रमीं । कपटि कां वधू टाकिता तमीं ॥
हरि दयार्णवा०॥
पिडित काम एकांतमंदिरीं । स्मितविलोकनें तॄप्त सुंदरी ॥
उरविशाळभा लक्षुनी मना । कवळिजे अशी होय वासना ॥
हरि दयार्णवा०॥
व्रजजनां तुझी मूर्ति सौख्यदा । सकळ संकटें भंगि आपदा ॥
कॄपणता तजीं दाविं मन्मथें । स्वरत जाळिलों भंग ते व्यथे ॥
हरि दयार्णवा०॥
तव पदांबुजें चूचुकां वरी । हळुच ठेवितां भीतसों हरी ॥
फ़िरसि काननें त्या पदीं कसा । क्षतमयें बहु जीव हा पिसा ॥
हरि दयार्णवा०॥
हरिगुणू अशा गाति सुंद्ररी । विलपते वनीं त्या परोपरीं ॥
रडति गोपिका सुस्वरें धिटा । हरिविलोकनालागि लंपटा ॥
हरि दयार्णवा०॥
प्रकट जाहला त्यांमधें हरि । हसित ईक्षल्या गोपसुंदरी ॥
वसन पीवळें माळ साजिरी । स्मरचि तो दयासिंधु वैखरी ॥
हरि दयार्णवा०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP