मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक २५ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक २५ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक २५ Translation - भाषांतर जनिमसत: सतो मॄतिमुताऽऽत्मनि ये च भिदां विषनमृतं रमंत्युपदिशंतित आरुपितै: ॥त्रिगुणमय: पुमानिति भिदा यदबोधकॄता त्वयि न तत: परत्र स भवेदवबोधरसे ॥२५॥ (१२)॥ टीका ॥श्रुति म्हणती भो भो ईशा ॥याही एका हेतुविशेषा ॥पाहती तुझीया ज्ञानप्रकाशा ॥सुशक्य नोहे पावावया ॥११॥ज्ञानोपदेष्टे सांवत ॥भ्रम बाहुल्यास्तव झाले बहुत ॥आपुलालें ते बोधिती मत ॥म्हणति सिध्दान्त मुख्य हा ॥१२॥नाहीं त्याचा जन्म वदती ॥आहे त्यासी बोलती मृति ॥न घडे तेंचि घडतें म्हणती ॥भ्रमाक्तमति बहु वक्ते ॥१३॥वास्तव आत्मस्वरुप एक ॥भेदें कल्पिती अनेक ॥एक अमर नर तिर्यक ॥म्हणति सम्यक कर्मफ़ळ ॥१४॥अवबोधरस तो निरामय ॥त्या तुज म्हणति त्रिगुणमय ॥अबोधास्तव भेदाखि ठाय ॥करुनि अपाय दृढाविति ॥१५॥ऎसीं पृथक् अनेक मतें ॥आरोपित भ्रमभ्रान्तें ॥उपदेशिति तद्वाक्यांतें ॥विश्चासतां भ्रमवृध्दि ॥१६॥वैशेषिक जो मतवादी ॥नसत्या जगाची उत्पत्ति आदि ॥आरोपित भ्रमबोधें प्रतिपादी ॥श्रुतिविरोधी यास्तव तो ॥१७॥सदेव आदिमध्यान्तीं एक ॥ऎसा श्रुतींचा मुख्य विवेक ॥तेथ असज्जनांचा जननाड्क ॥कैं कोठून म्हणावा ॥१८॥पातंजलाचिया मतें ॥पूर्वीं जीवांसी ब्रह्यत्व नव्हतें ॥योगाभ्यासें साधिजे तें ॥पंचभूतें प्राशूनी ॥१९॥धातुवादाच्या साधनें ॥जेंवि लोहाचें कीजे सोनें ॥तेंवि जीवा ब्रह्य होणें ॥योगाभ्यासें करुनिया ॥२०॥ब्रह्यचि असोनि ब्रह्यप्राप्ति ॥ऎसा सिद्वान्त बोले श्रुति ॥अष्ट लोह ऎसिया उक्ति ॥केली निवृत्ती कनकत्वा ॥२१॥एकविंशति दु:खाअ नाश ॥तयाचें नांव नि:श्रेयस ॥ऎसा नैयायकांचा पक्ष ॥प्रबोधी दक्ष बहुतर्फ़े ॥२२॥अनीशया हें श्रुतींचें वचन ॥करी तयाचें मत खंडन ॥कैसें म्हणाल तरी व्याख्यान ॥सावधान अवधारा ॥२३॥अनीशा नामें जे अविद्या ॥तिनें उत्पन्न केलें भेदा ॥यास्तव अनेक दु:ख आपदा ॥भोगिता खेदा पावती ॥२४॥वास्तव अखंडैकरसीं ॥तेथ दु:खाची गोष्टी कायसी ॥भेद असतां दु:खनाशीं ॥केंवि मोक्षासी पावणें ॥२५॥सुषुप्तिगर्भीं सर्व दु:खा ॥नाश झाला असतां देखा ॥तथापि जीवां नोहे सुटिका ॥मोक्ष लटिका कीं ना तो ॥२६॥अविद्येमाजी विद्यमान ॥मानिती आपण बुध्दिमान ॥म्हणती वास्तवज्ञानसंपन्न ॥जघन्यमान असतांही ॥२७॥जघन्यमान म्हणिजे काई ॥तरी जरामरणादिदु:खप्रवाहीं ॥पडिलें असतां आपुले ठायीं ॥मानिती मूढ मुक्तत्व ॥२८॥अंधें अंध धरुनि हातीं ॥नेइजेत असतां दुर्घट पथीं ॥पतन पावती महागर्ती ॥तैसीच मति भेदज्ञा ॥२९॥तस्मात सांख्यभेदवादी ॥जीवत्मभेदातें प्रतिपादी ॥तया मता तें निषेधी ॥श्रुति इत्यादि वाक्यार्थे ॥३०॥इष्टानिष्ट मिश्रफ़ळ ॥कर्मजनित हें केवळ ॥सत्य मानिती कर्मशीळ ॥मीमांसक मतवादी ॥३१॥एकचि अद्वितीय ब्रह्य ॥तेथ लोक लोकान्तर हा भ्रम ॥तेथ कैचें फ़लद कर्म ॥वॄथा श्रम श्रुति म्हणती ॥३२॥स्वप्नामाजीं झाला राय ॥वृथा डोळे झांकूनि काय ॥शेखीं रंकत्व तों न जाय ॥तोचि हा न्याय याज्ञिकां ॥३३॥त्रिगुणमयत्व पुरुषासी येथे ॥निर्धारितां वास्तव असतें ॥तरी हें अवघेंचि घडों शकतें ॥परि तें येथें अघटित पैं ॥३४॥श्रुति म्हणती तुझ्या ठायीं ॥भो जगदीशा भेदचि नाहीं ॥अबोधास्तव कल्पिला पाहीं ॥भ्रान्तिप्रवाहीं भ्रमग्रस्तीं ॥३५॥त्रिगुणमय पुरुष येणें ॥हेतु वैशिष्टें उपलक्षणें ॥तुझ्या ठायीं भेदकल्पने ॥अविद्यावरणें आवृत्तीं ॥३६॥दृष्टीमाजील नीलिमा जेंवि ॥गगनीं आरोपिजे प्राकॄतीं जीवीं ॥त्वद्विषयिक हें अज्ञान तेंवी ॥भेदें उपजवी त्रैगुण्य ॥३७॥वस्तुता पाहतां तुझ्या ठायीं ॥अबोधासी ठावचि नाहीं ॥मां तो भेद कैंचा काई ॥त्रिगुणात्मक तुज माजीं ॥३८॥ज्ञानधन जो अवबोधरस ॥तेथ भेदासी कैंचा पैस ॥अध्यारोपें बहुधा भास ॥मिथ्या आरोप वितर्क जो ॥३९॥ननु ऎसी करुनि शंका ॥श्रुति म्हणति भो विश्वात्मका ॥असत्प्रपंच हा असिका ॥म्हणाल लटिका जरी तुम्ही ॥४०॥असत्यप्रपंच उपजत नाहीं ॥तैसाचि त्रिगुणमय पुरुषही ॥तरी याची प्रतीति नसावी कहीं ॥ब्रह्यीं अद्वयीं कीं ना हो ॥४१॥ऎसां वदतां जरी सिध्दान्त ॥तरी प्रत्यक्ष दोन्ही असतां तेथ ॥जग आणि जगन्नाथ ॥कां पां अस्त न पावती हे ॥४२॥इये शंकेच्या निरसना ॥श्रीशुक योगियांचा राणा ॥करी आर्ष श्रुति व्याख्याना ॥त्या सनंदनवचना अवधारा ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP