मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३३-१ व २

वेदस्तुति - श्लोक ३३-१ व २

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


यतेदींक्षा पितुर्दीक्षा दीक्षां च वनवासिन: ॥
विविक्ता श्रमिणा दीक्षा न सा कल्याणदायिनी ॥१॥
पितुर्मत्रं न गह्‍णीयात्तथा मातामहस्य च ॥
सोदरस्य कनिष्ठस्य वैरिपक्षाश्रितस्य च ॥२॥
इत्यादि निषेधवचनादेभ्यो मंत्रं न गॄह्नीयात् ॥

॥ टीका ॥
आत्मा वै पुत्र नामासि ॥
आपुला मंत्र आपणासी ॥
अयोग्य म्हणूनि पितृमंत्रासी ॥
अनादरिलें स्मॄतिकारीं ॥३३॥
यतीनें करुनि विजाहोम ॥
होमिलें वेदक्तत्र्कियाकर्म ॥
त्यासि अयोग्य उपदेशत्र्कम ॥
आत्माराम स्वयें झाले ॥३४॥
वेद नुमलावे तिंहीं तोंड ॥
उपनिषत्प्रणवार्थ अंखड ॥
विवरुनी गूढ असावे ॥३५॥
विश्वाभास हा विवर्त ॥
चैतन्य आत्मा नित्य सत्य ॥
पृथक शिष्य कैंचा तेथ ॥
उपदेशार्थ उरलासे ॥३६॥
मातामह पितॄस्थानीं ॥
म्हणोनि निषेध दीक्षाग्रहणीं ॥
कनिष्ठ सोदर आपणाहूनी ॥
गुरुत्वा लागोनी अयोग्य तो ॥३७॥
तैसाचि वैरिपक्षाश्रित्त ॥
त्यापासूनि दीक्षा अनुचित ॥
म्हणोनि ब्रह्यनिष्ठ गृहस्थ ॥
श्रुतिसंमत सद्‌गुरु तो ॥३८॥
शास्त्रां परस्परें विरोध ॥
यालागीं तत्पक्ष निषिध्द ॥
भट्टाचार्यीं जेंवि उच्छेद ॥
कला प्रसिध्द चार्वाका ॥३९॥
कित्येक पाखंडी दुर्मति ॥
गृहींच्या देवताअ त्यागविति ॥
वर्णबाह्या ऎसियांप्रति ॥
शरण रिघती दुरात्मे ॥४०॥
एवं संमतवचनानुसार ॥
ज्यांतें गुरुत्वों अनधिकार ॥
स्थासी शरण न रिघती चतुर ॥
सेविती सधर सर्वज्ञ ॥४१॥
आश्रम-त्रयासी आधार ॥
गृहस्थाश्रमचि केला सधर ॥
यास्तव प्रवृत्तिनिवृत्तिपर ॥
षट्‍कर्मविचार नियोजिला ॥४२॥
यजनाध्ययनदानें निवॄत्ति ॥
मार्गे साधिजे कैवल्य-प्राप्ति ॥
प्रतिग्रहयाजनाध्यापनें प्रवृत्ति ॥
जीविकावृत्ति साधावी ॥४३॥
एवं आश्रमत्रयाचें ओझें ॥
गॄहस्था शिरीं घातलें सहजें ॥
यालागीं शिष्यांच्या समाजें ॥
ते निस्तारिजे परिचर्या ॥४४॥
जेथ परिचर्या विशेष पडे ॥
तेथ शिष्याचें स्वहित घडे ॥
इतराश्रमीं सहसा न घडे ॥
हें ही निवाडें जाणावें ॥४५॥
श्रोत्रिय आणि ब्रह्यनिष्ठ ॥
ऎसें बोलिलें असे स्पष्ट ॥
मुमुक्षुत्वीं जो उपविष्ट ॥
द्विविध कटकट किमर्थ त्या ॥४६॥
या प्रश्र्नाचें प्रत्युत्तर ॥
श्रोतीं परिसावें सादर ॥
तरी जीव जितुका नृदेहधर ॥
मोक्षीं अधिकार त्या सर्वा ॥४७॥
परंतु त्यांच्या द्विविध कोटी ॥
रागविरागपर राहटी ॥
त्या सर्वाची करुणा पोटीं ॥
लक्षूनि वाक्पुटीं श्रुति वदती ॥४८॥
एकां विषयासक्ति न सुटे ॥
त्यांसि बोधूनि कर्मनिष्ठे ॥
विषयविरक्ति आंगीं उमटे ॥
तंववरी हठें निरोवधी ॥४९॥
तारुण्याचा ओहटतां भर ॥
अंगीं जरेचा संचार ॥
तापत्रयें त्रासतां नर ॥
वैराग्यपर मग होय ॥५०॥
प्रियवस्तूचा होतां नाश ॥
शोकें आहळे मग विशेष ॥
स्त्रीपुत्रादिकी उदास ॥
तैं होय परवश अनुतापि ॥५१॥
तेव्हां बोधूनि ब्रह्यनिष्ठा ॥
निरसी जन्ममरणाच्या कष्टा ॥
आत्मानुभवें लावूनि काष्टा ॥
करी प्रतिष्ठा स्वानंदी ॥५२॥
तरीयाश्रमीं कर्मकाण्ड ॥
पठनीं सहसा नुमलिजे तोंड ॥
यालगीं श्रोत्रिय आणि अखंड ॥
ब्रह्यनिष्ठ स्वानुभवी ॥५३॥
तस्मात् नौका नरशरीर ॥
ऎसा सद्‍गुरु कर्णधार ॥
शास्त्रप्रेरक मी ईश्वर ॥
असतां समीर अनुकूळ ॥५४॥
भवाब्धि न तरे जो नर अधम ॥
तो मग भोगी अनेक जन्म ॥
आत्मघातक पापी परम ॥
त्यालागीं दुर्गम भवसिन्धु ॥५५॥
सद्‍गुरुसी कर्णधार ॥
म्हणूनि केला जो निर्धार ॥
या वाक्याचें अभ्यंतर ॥
ऎका साचार मुनिगदित ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP