वेदस्तुति - श्लोक २०
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
स्वकॄतपुरेष्वमीष्वबहिरंतरसंवरणं तव पुरुषं वदंत्यखिलशक्तिधॄतोंऽशकृतम् ॥
इति नृगतिं विविच्य कवयो निगमावपनं भवत उपासतेंऽध्रिप्रभवं भुवि विश्वसिता: ॥२०॥
॥ टीका ॥
श्रुति म्हणति सनातन ॥
अचिंत्यैश्वयै तूं पूर्ण ॥
जीवासि न लगे जें लात्र्छन ॥
मां तुज कोठून तें स्पशें ॥४३॥
देहादि उपाधि बहुविध ॥
तिहीं जीवचि नोहे बध्द ॥
मां तूं केवळ परिपूर्णानंद ॥
कैवि संबंध तुज त्यांचा ॥४४॥
अविद्या कामकर्मं करुन ॥
जीवदशा चैतन्य ॥
अवलंबूनि विपरित ज्ञान ॥
मरणजनन पावतसे ॥४५॥
ऎसा संसृतिवरपडा ॥
जीव दिसतांहि बापुडा ॥
वास्तवबोधें पाहतां फ़ुडा ॥
भगवध्दाव श्रुति वदती ॥४६॥
जीवदशेचा निरसूनि दोष ॥
श्रुति म्हणती जो परेश ॥
आदित्यरुपें तेजोविशेष ॥
चिदाभास पैं तो हा ॥४७॥
पूर्गत्व श्रुति प्रतिपादिति ॥
तेचि ऎका लक्षणारीती ॥
भद्रीं देखिला जो कां नृपती ॥
तो हा म्हणती मृगयेंत ॥४८॥
तो तूं ऎसिया वाक्यविचारें ॥
जीवासि वास्तव पूर्णत्व खरें ॥
बोधिती द्वयोपाधिपरिहारें ॥
वस्तुनिर्धारें एकवें ॥४९॥
तेथील सांडूनि भद्रासन ॥
मृगयाचात्र्चल्य तुरगासन ॥
केवळ गात्र मात्र लक्षून ॥
नृपत्व पूर्ण अवगमिती ॥५०॥
तेंवि वाच्यांश शबलांश ॥
जीवेशांचे उपाधिविशेष ॥
निरसूनि घेति पूर्णत्वास ॥
शुध्दलक्ष्यांश एकत्वें ॥५१॥
जहदजहल्लक्षणद्वारां ॥
उपाधत्यागें जीवश्वरां ॥
अभंग एकत्व निर्धारा ॥
माजी आत्मत्व स्वत: सिध्द ॥५२॥
लक्ष योजनें भानु गगनीं ॥
जरी तो बिम्बला थिल्लर वनीं ॥
तरी तो निलेप स्वस्थानीं ॥
तद्दोशगुणीं नाकळतां ॥५३॥
तेंवि जीवेश्वरांच्या ठायीं ॥
बध्द मुक्तता मुळींच नाही ॥
उपाधिभेदें भासे कांही ॥
मोहप्रवाहीं भ्रमग्रस्तां ॥५४॥
तेथ म्हणती मीमांसक ॥
जीव कर्मपरिपाक ॥
भोगार्थ भ्रमे नाना लोक ॥
फ़ळकामुक होत्साता ॥५५॥
कर्में नाना देह घरी ॥
कर्में भ्रमे स्वर्गसंसारीं ॥
स्तावक मात्र त्या ईश्वरीं ॥
निगमोच्चारीं स्तविजेत ॥५६॥
परंतु नोहे तो ईश्वर ॥
जीव केवळ कर्मपर ॥
कर्मावांचूनि दुसरी थोर ॥
नाहीं संसार निरसावया ॥५७॥
कर्में नाना योनि बरी ॥
कर्में नाना देह घरी ॥
लक्ष चौर्यांशीमाझारी ॥
देता फ़ेरी न विसांवा ॥५८॥
ऎसें वदती जे याज्ञिक ॥
एकदेशी कर्मठ सूर्ख ॥
तत्वमस्यादि वाक्यविवेक ॥
अनोळख ज्यालागीं ॥५९॥
असो तयांचें बोलणें ॥
व्यर्थ किमर्थ विस्तारणें ॥
वेदान्तवाक्यश्रवणाविणें ॥
बहिर्मुखपणें वर्तणें ज्या ॥६०॥
यदर्थी मुख्य सनकादिक ॥
उपासनाकाण्ड विवेक ॥
बोलती तो श्रुति सम्यक ॥
प्रतिपादक अवधारा ॥६१॥
जीव पडिला भवभ्रमपुरीं ॥
कर्म-सरिताप्रवाहान्तरीं ॥
करणा भाकितां त्यातें तारी ॥
भाकितां त्यातें तारी ॥
कर्णधार गुरुवर्य ॥६२॥
पंचायतनोपासना ॥
रुपें केवळ पूर्ण चैतन्या ॥
उपदेशुनि तत्पादभजना ॥
भक्तिनौके बैसवी जो ॥६३॥
ऎसिया भजनोपनिष्ठां नरां ॥
माजीं निवडे भजनाधिकारा ॥
तोचि लंघूनि भवभ्रमपूरा ॥
पावे परपारा पूर्णत्वा ॥६४॥
येरां उपासकांची गोठी ॥
भवीं बुडती कोट्यनुकोटी ॥
ज्यांते अभेद हातवटीं ॥
भजनराहटीसाजि न फ़वे ॥६५॥
उपास्य देवतापर ज्या भक्ति ॥
तैसीच गुरुभजनीं अनुरक्ति ॥
अन्यत्र भवभोगीं विरक्ति ॥
ते लंघिती भवनदी ॥६६॥
अनन्यभावें औपास्यभजन ।
तो मी ऎसें अनुसंधान ॥
ऎक्यभावें सद्गुरुध्यान ॥
करितां ज्ञान त्यां होय ॥६७॥
उपासना चैतन्यघन
अभेदभावें भजतां पूर्ण ॥
तत्वमस्यादिवाक्यविवरण ॥
तयांचि लागूनि उपतिष्ठे ॥६८॥
येर भजति भेद भावें ॥
भवभ्रमसुखचि तिहीं मागावें ॥
इहामुत्रिक ज्यां नाहीं ठावें ॥
स्वबोधशिंवे न पबती ते ॥६९॥
भिषकापासून भेषजग्रहण ॥
करुनि होऊं इच्छिती अरुग्ण ॥
ते त्या भिषकालागीं शरण ॥
सहसा अनन्य नव्हती कीं ॥७०॥
तैसे गुरुपासूनि उपासना ॥
घेऊनि करिती भेदभजना ॥
भवभ्रम-सुखाची कामना ॥
फ़ळें नाना वांच्छिती ॥७१॥
दाराधनसुतस्वजनसदन ॥
तनु निरामय चातुर्यपूर्ण ॥
लोकीं सन्मान शत्रुनिधन ॥
भजनीं भेदज्ञ कामिती हें ॥७२॥
तयां कोठून भवनिवृत्ति ॥
ऎसें न वदोनि बदली श्रुति ॥
वसो यावरी पदपदार्थीं ॥
व्याख्यान श्रोतीं परिसावें ॥७३॥
स्वकर्मार्जित विविशपुरें ॥
नरतिर्यगादि जियें शरीरें ॥
भोगायतनें पृथगाकारें ॥
अविष्कारें धरी जीव ॥७४॥
श्रुति म्हणती भो ईश्वरा ॥
तोही पुरुष तवांश खरा ॥
अखिलशक्तिऎश्चर्यधरा ॥
पॄथगाकारें भासतसे ॥७५॥
जैसे घटमठादि गगनांश ॥
पृथक न होति गमत अशेष ॥
तैसेचि जीव हे तवांश ॥
चिदाभास म्हणिजती पैं ॥७६॥
येर्हवीं यथार्थ बोधें जीव ॥
तुजसीं अभिन्नचि वास्तव ॥
यदर्थीं शंकेसी नाहीं ठाव ॥
भवभ्रम वाव मृगजलवत् ॥७७॥
अंतर्बाह्यद्वयावरणीं ॥
जीव पडिला कर्मभ्रमणीं ॥
म्हणाल तरी तीं आवरणें दोन्ही ॥
मिथ्या म्हणोनि श्रुति बदल्या ॥७८॥
अंतरावरण तें कारण ॥
बाह्यवरण कार्य जाण ॥
माया अविद्या म्हणोन ॥
वदती सर्वज्ञ ज्यांलगीं ॥७९॥
दोन्ही आवरणें असतां जीवा ॥
ईश्वरीं अभिन्न केंवि म्हणावा ॥
सहसा संशय हा न धरावा ॥
श्रवण करावा विवेक हा ॥८०॥
पात्र्चभौतिक त्रिगुणात्मक ॥
नेति मुखें निरसितां देख ॥
पूर्ण चैतन्य उरलें एक ॥
जीव पॄथक मग कैंचा ॥८१॥
ऎसी वस्तुत्वें जीवगति ॥
विचारुनियां निश्र्चिती ॥
ज्ञानी तव चरणां उपासिती ॥
भवनिवॄत्ति कारणें ॥८२॥
तस्मात् मिथ्या उभयावरण ॥
अविद्या माया कार्यकारण ॥
ज्ञानी विवरुनि वेदान्तश्रवण ॥
तन्निरसनीं प्रवर्तती ॥८३॥
भवनिवर्तक तवाड्:घ्रि स्वतंत्र ॥
वेदोक्तकर्मबीजाचें क्षेत्र ॥
तेथ अर्पितां कर्ममात्र ॥
आवरणसूत्र तैं भंगे ॥८४॥
तवाड्:घ्रिक्षेत्रीं प्रेरिता कर्म ॥
सफ़ळ होय तें छेदून भ्रम ॥
हा दृढ विश्र्वासें नेम ॥
करुनि प्रेम धरिती ॥८५॥
विश्र्वासूनि तवाड्:घ्रिभजनीं ॥
नवविधप्रेमें रमती ज्ञानी ॥
अनन्य बोधें भ्रम निरसूनी ॥
कैवल्यभुवनीं विराजती ॥८६॥
तिथे भक्तिचें पिकतें श्रेत्र ॥
मर्त्य-भुवनीं नृदेह मात्र ॥
अन्य लोकीं विषयतंत्र ॥
कर्मानुसार फ़ळभोक्ते ॥८७॥
आत्मप्राप्तीसीए साधन ॥
भक्तीहूनी श्रेष्ट आन ॥
जें म्हणति ते अनुचित पूर्ण ॥
मुक्तीहून बर भक्ति ॥८८॥
कैसी म्हणाल तरी हे श्रुती ॥
वाखाणिजेल पदपदार्थी ॥
ईच्या श्रबण सभाग्य श्रोतीं ॥
अभेदभक्ति अनुसरिजे ॥८९॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP