मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३५ - ६ व ७

वेदस्तुति - श्लोक ३५ - ६ व ७

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


तंत्रवार्तिककॄत: ॥
सर्वत्रैव ही विज्ञानं संस्त्र्कारत्वेन गम्यते ॥
परांगं चात्मविज्ञानादन्यत्रेत्यवधार्यतामिति ॥६॥

॥ टीका ॥
कल्पादि सृष्टीपासून येथ ॥
जन्मजन्मान्तरें अध्यस्त ॥
संस्कार जडला आजिपर्यंत ॥
उद्‍बोधित तो विज्ञान ॥३५॥

 ॥श्र्लोकार्धसंमित: ॥
मोक्षे धीर्ज्ञानमन्यत्र विज्ञानं शिल्पशास्त्र्योरित्यमर: ॥७॥

॥ टीका ॥
तस्मात शिल्पशास्त्रमय विज्ञान ॥
स्फ़ुरे सर्वत्र संस्कारजन्य ॥
आत्मविज्ञानवांचून ॥
ऎसें वचन वार्तिकींचें ॥३६॥
स्त्रियेसी रजोदर्शन कुच ॥
कीं पुरुषासी श्मश्रु कूर्च ॥
यथावयें निघती साच ॥
तेंवि नडनाच सांस्कारी ॥३७॥
तैसें नोहे ब्रह्यज्ञान ॥
कीं संस्कारें होय उत्पन्न ॥
येथ साधनचतुष्टयसंपन्न ॥
लाभे पूर्ण गुरुकॄपया ॥३८॥
तयाच्या दॄढीकरणा मुनी ॥
प्रवर्तती श्रवणीं मननीं ॥
भूतळीं भ्रमती तीर्थसदनीं ॥
महंतां लागोनि आश्रयिती ॥३९॥
तेचि श्रवण मननरीती ॥
कैसी प्रतिपादिली महंतीं ॥
तें परिसिजे सावध श्रोतीं ॥
कुरुवरनृपतिसमसाम्यें ॥४०॥
मीमांसकीं प्रश्न केला ॥
यथाभ्नायें तो खंडिला ॥
यदर्थी संशय असे उरला ॥
तरी तो बोला विवरुनी ॥४१॥
द्वैत सत्यत्वें जरी असतें ॥
तरी मीमांसकांचेंही मत घडतें ॥
सत्यत्व नाहींच मुळीं द्वैतातें ॥
मन:कल्पितसें भासतसे ॥४२॥
इत्यादि प्रश्नोत्तरांच्या श्रवणें ॥
महंतापासूनि मनन करणें ॥
तत्वावधारणा कीजे येणें ॥
प्रकारें म्हणोनि वदे श्रुति ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP