मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ४५

वेदस्तुति - श्लोक ४५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥ श्रीशुक उवाच ॥
एवं स ऋषिणाऽऽदिष्टं गॄहित्वा श्रध्दयाऽऽत्मवान् ॥
पूर्ण: श्रुतधरो राजन्नाह वीरव्रतो मुनि: ॥४५॥

॥ टीका ॥
यावरी तो देवर्षि नारद ॥
जें नारायणें तत्त्व विशद ॥
उपदेशिले परम शुध्द ॥
केवळ अगाध सुखरुप ॥७७॥
तें सविश्वासें अंत:करणीं ॥
घेऊनियां अनुभवें मुनी ॥
आत्मसाक्षात्कारें ज्ञानी ॥
झाला पूर्णपणीं कॄतकृत्य ॥७८॥
कीं ऎकिला अर्थ सविवेक ॥
ह्नदयीं धरिला निष्टंक ॥
म्हणोनि जो श्रुतधर नैष्ठिक ॥
बोलता झाला सप्रेम ॥७९॥
तो नमनात्मक नारदोक्त ॥
नारायणस्तव निश्चित ॥
ऎके परिक्षिति द्‍त्तचित्त ॥
म्हणे महंत शुकमुनि ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP