मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३३-१

वेदस्तुति - श्लोक ३३-१

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


संमति:-नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ॥
मयानुकूलेन नभखतेरितं पुमान्भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥१॥

॥ टीका ॥
नरदेह आद्य सर्वा प्रति ॥
काय म्हणोनि पुसतां श्रोतीं ॥
ऎसी येथींची ब्युपत्ती ॥
प्रवृत्तिनिवृत्तिप्रद हाची ॥६१॥
नरदेहींच्या कर्माचरणें ॥
स्वर्गीं देवतादेह धरणें ॥
किंवा तिर्यग्योनि फ़िरणें ॥
कर्माचरणें जेथींचिया ॥६२॥
निष्कामसत्कर्मानुष्ठानें ॥
सुप्रसन्न ईश्वरा करणें ॥
तत्प्रसादें मग साधनें ॥
वैराग्यादि प्रकटती ॥६३॥
साधनसंपन्न मुमुक्षु शुध्द ॥
सदगुरु आश्रयी प्रबुध्द ॥
तत्प्रसादें निर्विवाद ॥
कैवल्यपद मग लाहे ॥६४॥
तिर्यक् इहामुत्रनिर्वाण ॥
प्रापक नरदेह मुख्य जाण ॥
यालागीं तो आद्य म्हणोन ।
श्रीशुक सज्ञान बोलिला ॥६५॥
तो नरदेह जयाप्रति ॥
प्राप्त झाला मर्त्यक्षिती ॥
त्यांसीसुलभ हे भरती ॥
योगीन्द्राची वाखाणी ॥६६॥
एर्‍हवीं दुर्लभ बहुतां यत्नें ॥
न मिळे घेतां बहुधा धनें ॥
अथवा दुर्घट तप:साधनें ॥
लाहों न शके कोणी ही ॥६७॥
पुण्याधिक्यें स्वर्गभुवनीं ॥
पायाधिक्यें तिर्यग्योनी ॥
समान तुलना पापपुण्यीं ॥
होतां मिळणी नरदेहा ॥६८॥
त्यामाजी ही कर्मव्यत्यासें ॥
शुष्कें सांसर्गिकें दोषें ॥
कर्मफ़ळाच्या भोगा ऎसे ॥
व्यंग विकळ जडमूढ ॥६९॥
असो सुलभ नरदेह जयां ॥
अवयव पटुतर लाधलिया ॥
सुदृढ नौका जोडली तयां ॥
भवसागरीं निस्तरण्या ॥७०॥
सदय सद्‍गुरु कर्णंधार ॥
दुस्तरीं तारक परमचतुर ॥
विशेष प्रेरक मी ईश्वर ॥
शास्ता समीर अनुकूल ॥७१॥
ऎसी तरणोपायसमृध्दि ॥
लाहोनि न तरेचि जो भवाब्धि ॥
तो नर अधम मंदबुध्दि ॥
लाहे न कधीं सुटिकेतें ॥७२॥
सद्‍गुरुसी न रिघोनी शरण ॥
ईश्वरप्रेरणा शास्त्र लंघन ॥
अंहबुद्धि यथेष्टाचरण ॥
करिती आत्मघ्न नरदेहीं ॥७३॥
ईश्वरानुग्रहावीण गुरु ॥
तो न तारी भवसागरु ॥
विशेष रुचवी इहामुत्र ॥
कर्मपरतंत्र करुनियां ॥७४॥
सद्‍गुरु म्हणनि असद्‍गुरु ॥
सेवितां न तारी भवसागरु ॥
वामी कौळिक दाम्मिक त्र्कूर ॥
जेंबि सबंचोर पथसंगी ॥७५॥
अनॄताहूनि पातक थोर ॥
नाहीं म्हणोनि स्मृतीचा निकर ॥
प्रतिपादी ते अनतचि फ़ार ॥
यास्तव दुस्तर ते मार्ग ॥७६॥
प्लव म्हणिजे नौकेप्रति ॥
सुकल्प म्हणिजे सुष्टुसुमति ॥
तारकाश्रयें भवावर्तीं ॥
सुवातें तरती मुमुक्षु ॥७७॥
भवावर्तीं बुडती कोणा ॥
दाटूनि आवडे विचक्षणा ॥
तरी कां बुडती दुष्टाचरणा ॥
वश होऊनि अविरक्त ॥७८॥
यद्रर्थी पूर्वश्रुती माझारीं ॥
त्रिनेमिकाळचत्र्काची भंवरी ॥
कथिली त्यांत युगें चारी ॥
पाडिती फ़ेरी शुभाशुभां ॥७९॥
यास्तव कळिकाळ कनिष्ट ॥
तोचि प्रवर्तला असतां स्पष्ट ॥
यथेष्टाचरण वाटे श्रेष्ठ ॥
कर्मभ्रष्ट मति होती ॥८०॥
द्युमणि अस्त सायंकाळीं ॥
निबिड ध्वान्त दिग्मंडळीं ॥
भूतीं प्रेतीं पिशाचमेळीं ॥
तिये वेळीं प्रकटावें ॥८१॥
जार चोर दुष्पथाचार ॥
तत्प्रबृत्ति होय फ़ार ॥
कलीमाजीं अनाचार ॥
तैसा न कुनर आदरिती ॥८२॥
बोलती एक करिती एक ॥
वेषधारी शठ हरदास ॥
हरिचरणीं त्या दृढ विश्वास ॥
असतां देश कां फ़िरती ॥८४॥
एक शंसिती योगमार्ग ॥
कीर्तनमिषें रागरंग ॥
योनि रहित वेश्या साड्ग ॥
मोडिती आंग नटनाटयें ॥८५॥
योगमार्गे आनन्दप्राप्ति ॥
लाहोनि पावता जरी विश्रान्ति ॥
तरी तो किमर्थ धनिकांप्रति ॥
नृत्यगीतीं रंजविता ॥८६॥
वेदान्त वैराग्य वदती तोंडें ॥
वसनीं भूषणीं भूषिती मडें ॥
त्यांसी भाळोगि जनही वेडें ॥
गुरुत्वें कोडें सेवितसे ॥८७॥
वेषधारियांच्या ऎशा झुंडा ॥
शिष्य करिती पोरें रांडा ॥
संप्रदावें पाखंडबंडा ॥
भंड उभंडा रुढविती ॥८८॥
अष्टादशयाति शिष्य ॥
करुनि पोषिती कुटुम्बास ॥
हाचि व्यवसाय सावकाश ॥
करिती हव्यास वाढवूनी ॥८९॥
शिष्याचिये सभेपुढें ॥
तोंड करुनि वेडें वांकुडें ॥
गुरु नाचे जठरचाडे ॥
वैराग्य रडे निरुपणीं ॥९०॥
कोणीं तेथें विचक्षण ॥
सहसा न करी परीक्षण ॥
कीं यास असतें वास्तवज्ञान ॥
तरी हा वणवण कां फ़िरता ॥९१॥
योगमार्गे अमृतावाप्ति ॥
लाधल्या किमर्थ विषयासक्ति ॥
ऎसें न म्हणोनि मंदमति ॥
शिष्य होती कळिकाळीं ॥९२॥
वसनाभरणें रागरंग ॥
देखोनि सन्मानी ज्या जग ॥
त्याचा वरिष्ठ मानूनि मार्ग ॥
तेथ सवेग अनुसरती ॥९३॥
प्रथमाश्रमे त्या वेदाभ्यास ॥
द्वितीराश्रमें षट्कर्मास ॥
तृतीयाश्रमें तपसायास ॥
तुरीय प्रणवास नुपलविती ॥९४॥
नोहती शैव ना भागवत ॥
नाचरती श्रौतस्मार्त ॥
रुढ करुनि पाखंड्द मत ॥
वदती परमार्थ आवडता ॥९५॥
कोण संप्रदाय तयांचा ॥
श्रुति स्मॄति न वदती वाचा ॥
धुमाड माजविती विषयांचा ॥
मोक्ष कैंचा मग तेथें ॥९६॥
शिष्य प्रलोभावया पुरते ॥
आगम विवरुनि घेती निरुते ॥
कौळ मार्गे चहूं वर्णातें ॥
एकत्र करिती दुरात्मे ॥९७॥
कादिहादि ऊर्ध्वान्नाय ॥
नाथ नित्या अहर्गण काय ॥
श्री विद्येची नेणोनि सोय ॥
शिष्य-समुदाय मेळविती ॥९८॥
ऎसे कळिकाळींचे भोंदु ॥
गुरुत्व मिरविती होऊनि साधु ॥
त्यांसी शरण बुध्दिमंदु ॥
होती आनंदु इच्छूनि ॥९९॥
मृग तॄष्णिका मानूनि तोय ॥
तषार्त आस्था धरुनि जाय ॥
श्रम मात्रचि तो फ़ळ लाहे ॥
ते गति होय तच्छिष्यां ॥८००॥
साधनसंपन्न मुमुक्षु शिष्य ॥
होऊनि करुं लागे दास्य ॥
कुळाचार बोधिती त्यास ॥
म्हणती विशेष श्रीअर्चा ॥१॥
पंचोपचारें श्री पूजितां ॥
साधक पावती अभिवात्र्छिता ॥
कंटक सहसा नुधवी माथा ॥
अभेदपथा अनुसरिजे ॥२॥
तवं तो म्हणे अहो स्वामी ॥
मुमुक्षु केवळ कैवल्यकामी ॥
त्यांसी प्रयोजन काय वामीं ॥
इन्द्रियग्रामीं कां रमि जे ॥३॥
तीर्थ म्हणोनि आसव घेतां ॥
विलंब न घडे उन्मत्त होतां ॥
पातीत्य दोष लागे माथां ॥
लाभ कोणता यामाजी ॥४॥
शुध्दि सेवनें रसना तोषे ॥
शफ़रास्वादनें पिण्ड पोषे ॥
मुद्रा चर्वणें विविधा रसें ॥
वीर्य उल्लासें वाढतसे ॥५॥
बहुधा वीर्यवृध्दीच्या कोडें ॥
पंचमीपरिष्वंग आवडे ॥
व वैराग्य पालथें पडे ॥
मोक्ष आतुडे मग कैंचा ॥६॥
हें ऎकोनि म्हणती गुरु ॥
केवळ विरक्त नर पामरु ॥
शुष्क साधनीं श्रमतां फ़ारु ॥
न पवें परपारु भवाचा ॥७॥
गुप्तो मुक्त: प्रकटो भ्रष्ट: ॥
हें वर्म विदित असे श्रेष्ठां ॥
न कळे कंटकां कर्मठां ॥
वृथापुष्टां शुष्कांतें ॥८॥
येरु म्हणे गुप्तगति ॥
विषभक्षणें अमर होती ॥
प्रकट केलिया प्राणी मरती ॥
हें कैं वदंती नायकिली ॥९॥
ऎसा बोधितां परोपरी ॥
युक्तीप्रयुक्तीं प्रत्युत्तरीं ॥
श्रुतिसंमतें निरुत्तर करी ॥
अनधिकारी त्या म्हणती ॥१०॥
ऎसें कळिकाळींचे गुरु ॥
यथेष्टा चरणीं विषयपरु ॥
त्यांच्या बोधें नरपामरु ॥
भवसागरु केंवि तरती ॥११॥
ऎसे कळिकाळीं कर्मभ्रष्ट ॥
आपणां म्हणविती ब्रह्यनिष्ठ ॥
विषयसेवनीं यथेष्ट ॥
सहसा दुष्ट न लसती ॥१२॥
त्यागें एकें अमृतावाप्ति ॥
ऎसा निश्चय केला श्रुति ॥
इतर साधनां संसॄति ॥
न चुके कल्पान्तीं अविरक्तां ॥१३॥
तत्मात कळिकाळीं यथेष्टाचारु ॥
बोधिती ते ची श्रेष्ट गुरु ॥
मानूनि तेथ विषयीं नर ॥
होती सादर कळतां ही ॥१४॥
लोकीं म्हणविती हरिदास ॥
धनार्जनाचा हव्यास ॥
त्यांसी उबगला जगदीश ॥
धन लोभास प्रेरुनिया ॥१५॥
योगाभ्यास बोलती तोंर्डे ॥
कुले मुरडूनि धनिकांपुढें ॥
नाचती धनमानाचे चाडे ॥
कपटी कुडे कीं ना ते ॥१६॥
योगाभ्यासें ब्रह्यानंद ॥
जरी ते पावले असते विशद ॥
तरी मग ऎसें कर्मविरुध्द ॥
कां मतिमंद आचरते ॥१७॥
जो गजासनीं मिरवला ॥
तो न इच्छी अजयानाला ॥
ब्रह्यानंदें तॄप्त झाला ॥
जनमानाला तो न भूले ॥१८॥
भ्रमर वेधला पंकजपाना ॥
तो काय अपेक्षी अपाना ॥
सहस्त्रदळीं  फ़ावल्या पान्हा ॥
स्वाधिष्ठाना केंवि भुले ॥१९॥
तस्मात् शाब्दिक ब्रह्यज्ञान ॥
विषयासक्ति धनसन्मान ॥
उभय भ्रष्ट ते श्वपचाहून ॥
मानिती हीन श्रुतिवक्ते ॥२०॥
हिजडीं डफ़डीं डौरकार ॥
पोत भळंदी बाजीगार ॥
धनार्थ फ़िरती दारोदार ॥
चमत्कार दाखवूनी ॥२१॥
भुते वाघे बहुरुपी नट ॥
जंगम दासरीं दांगट ॥
तेंवि गुरुत्वें कर्मभ्रष्ट ॥
भरिती पोट धीटपणें ॥२२॥
वेदाध्ययनें पडलीं ओसें ॥
शास्त्राध्ययना कोणी न पुसे ॥
युक्तिप्रयुक्ति घालनि फ़ासें ॥
गुरत्व ऎसें लढविती ॥२३॥
असो ऎसी कळिकाळीन ॥
नरदेह नौका ही पावोन ॥
दुप्पथ दुरावर्ती मग्न ॥
होती व्याख्यान तें केलें ॥२४॥
ईश्र्वरानुग्रहा-वाचूनि कांहीं ॥
सद्‍गुरु प्राप्त होणार नाहीं ॥
शुकाचार्याचा पूर्वज पाही ॥
वशिष्ठ निश्चयीं हें वदला ॥२५॥
ईश्वराज्ञा दॄढविश्वासें ॥
निष्काम कर्माचरण वशें ॥
प्रेमळ देखोनि ईश्वर तोषे ॥
करी अनायासें चित्तशुध्दि ॥२६॥
तैं मग ईहामुत्रीं विरक्त ॥
नित्यानिस्य विवेकवंत ॥
सद्‍गुरु लाहे अकस्मात ॥
मग रंगे निश्चित तद्वास्या ॥२७॥
चारी आश्रम समान असतां ॥
सद्‍गुरुपदवी केंवि गॄहस्था ॥
श्रोत्रिय आणि ब्रह्य निष्ठता ॥
केंवि शंसितां ते ठायीं ॥२८॥
तरी ब्रती तो वेदाभ्यासी ॥
स्वयें रंगला गुरुदास्यासी ॥
तो न बोधी सच्छिष्यांसी ॥
ऎसें सर्वासी कळलें कीं ॥२९॥
तृतीयश्रमी तो वनस्थ ॥
तपस्वी राहे दॄढ नियमस्थ ॥
मनोनिग्रहीं अतंद्रित ॥
शिष्यसगंम न रुचे त्या ॥३०॥
ईषणात्यागें विरजाहोम ॥
सारुनि केला चतुर्थीश्रम ॥
प्रणव जपमात्राचा नियम ॥
शिष्यसंगम न रुचे त्या ॥३१॥
यांपासूनि दीक्षाग्रहण केलिया निष्फ़ळ होय जाण ॥
ऎसें बोलिला त्रिलोचन ॥
संमति वचन तें ऎका ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP