मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| ५६ ते ६० वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० स्फ़ुट पदें व अभंग - ५६ ते ६० ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव स्फ़ुट पदें व अभंग - ५६ ते ६० Translation - भाषांतर ५६ ॥ अभंग ९॥गोविंदा तूं जळ मी तेथें कल्लोळ । असों सर्व काळ ऐक्य सुखें ॥१॥तूं बिंब मी तेज तूं हेतु मी काज । व्यापक तूं पूज्य पूजक मी ॥२॥*अणूचा वियोग नसे तुम्हां आम्हां । आजी मेघ:शामा सांडूं नको ॥३॥तूं रस मी गोडी तूं वॄक्ष मी वाढी । तूं शक्ति मी प्रौढी सामर्थ्याची ॥४॥दयार्णवस्वामी मी तुझा सेवक । वियोगाचें दु:ख साहों नेणें ॥५॥५९ ॥ अभंग १० ॥सोंवळें ओवळें जनामाजि दावी । कामत्र्कोध जीवीं वागवितो ॥१॥त्याचें शुध्दपण पिकलें वॄंदावन । जैसे भले गुण शिंदळीचे ॥२॥व्रतें उपवास करी बारा मास । आल्या अतीतास पाठी लागे ॥३॥प्रदक्षिणा फ़ार घाली नमस्कार । जनासी निष्ठुर यमाहुनि ॥४॥पुराणश्रवण आपण नाठवी । लोकां बोला ठेवी अधर्माचा ॥५॥दयार्णवीं ऐसे न तरे पाषाण । अपानशोधन आचरती ॥६॥६० ॥ हनुमानस्तुति ॥जयजय मारुतऔरस भो जय । दाशरथेप्रिय भक्तविभो ॥धृ०॥सीताशोधन-शील खलारे । कौणपपुरपति-मत्तबलारे ॥१॥सौमित्रा-सुत-जीवन हेतो । राम-विजय-सुख्क-वर्धन-केतो ॥२॥विघ्न-समूह-विनाशकॄशानु । राम दयार्णव पंकजमानु ॥३॥६१ ॥ आरती परब्रह्याची ॥पहुडावें पहुडावें देवा ब्रह्यांदशेजे । ज्ञानाज्ञानसहित जाणिव जें ठायीं लाजे ॥धॄ०॥पिंडीं सकळहि इंद्रियवृंद शोभला मेळा । ब्रह्यरंध्रीं सुखें निद्रा करा गोपाळा ॥१॥त्रिकुट-श्रीहाट गोल्हाटादि सांडुनियां कोठें ॥औटपीठ लंघुनी ब्रह्यगिरी चोहटे ॥२॥भ्रमर गुफ़ां टाकुनि पुनरपि चला सदनासी । जे ठायीं विश्रांति होत पूर्ण मदनासी ॥३॥दयार्णवस्वामी ऐसे सदनीं पहुडावें । स्वसुखाच्या डोहीं पुनरपि येणें बुडवावें ॥४॥६२ ॥ पद ॥हरि हा आपणचि जग झाल । आपणचि जग झाला ॥धॄ०॥अपणाचि देव भक्तहि होऊनि । पूजित अपणाला ॥१॥उत्तम अधम योनी जितक्या । जीवरुपें भरला ॥२॥सर्वं खलु इति कॄष्णदयार्णव । श्रुति वदती त्याला ॥३॥६३ श्रीकॄष्णस्तवनगोवर्ध्दनसम साधन गिरिवर उद्धरिला । नीर्जरवरपदगर्व सर्वहि परिहरिला । मदमच्छररजनीचर आन्वय संहरिला । देहत्रय अभिमान कंसासुर हरिला ॥१॥जय जय घोषें मंगळ करिती व्रजबाळा । कॄष्णलीला स्तविती निगमागमाळ ॥धॄ०॥नीर्मळ धर्म स्थापुनि भूमंडळ केलें । लीला जलधी जठरें निज नगरा नेले । भेद-मागध वधिला भवभय मग गेलें । अभेद संपतिनायक सज्जन हरिखेले ॥२॥विकल्प दंडुनि वरिली रुक्मिणि निजशांती । लीलाचरणें केली विबुधा विश्रांती । पामरजन उद्धरती जपतां पद अंतीं । कॄष्णदयार्णव वरदे निरसी भवभ्रांती ॥३॥जय०॥श्रीहरि ॥६४ एकनाथांची आरतीनिर्गुण प्रतिष्ठाणीं आद्वय अवतारी । श्रुत्यर्थे जड बोधुनि भवसागर तारी । नीर्मळ शांती गोदातट उत्तरवारी । भाणुकुलोभ्दव भगवभ्दजनी व्यापारी । जयदेव० जय एकनाथा । तवसच्चित्सदयुगुलीं मम मानस माथा ॥धॄ०॥विश्वीं व्यापक विद्वद्वरविश्वामित्री । सत्कर्मास्तव स्थापुनि सर्वहि तव मित्री । द्विजभजनाचा महिमा प्रगटुनि सत्क्षत्रिं । जडजीव तरतीं तव ॥गुणनामामॄत-मंत्रीं ज०॥२॥लोकत्रय-चूडामणि हरि करि परिचर्या । तूं तो जगदोद्वारक अद्वय आचार्या । वर दे छेदुनि भेदासह मानसचर्या । कृष्णदयार्णव शवक व नर्णित आश्चर्या ॥३॥६५ सद्गुरुची आरतीव्यापक भुवना जीवना दहना पवनातें । व्यापक गगणा सघना व्यापक शून्यातें । व्यापक रजतम सत्त्वा आद्वय तत्त्वातें । अपरापर व्यापक तुआ नादीमाय ते ॥१॥जयदेव० जयजीए गुरुदेवा । अचळा अढळा अमळा निजगुज सुख-ठेवा ॥धॄ०॥माया श्रमली पावे जेथें विश्रांति । तो तूं चिदॄप शाश्वत चिन्मय सुखमूर्ती । तव रुप पहातां होती तन्मय निजवृत्ती । शाश्वत न गमे कांहीं तुजविण मग चिन्नीं । सर्वहि करण चाळक लाउनि रसधंदा । यास्तव नामें सगुणा भजती गोविंदा । उभ्दव संभव निरसुनि छेदुनि भवबंधा । कृष्णदयार्णव केलें नरहरि मतिमंदा ॥३॥॥श्रीकॄष्णदयार्णवकॄत सफ़ुट कविता समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP