मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक २ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक २ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक Translation - भाषांतर ॥श्रीशुक उवाच॥ बुध्दींद्रियमन: प्राणाज्जनानामसृजत्प्रभु: ॥मात्राऽर्थ च भवार्थं च आत्मनेऽकल्पनाय च ॥२॥॥टीका ॥ साद्यंत नृपाची ऐकोनि शंका ॥ कथनीं परमाहलाद शुका ॥ विवरुनि उत्तर वदला निका ॥ सदर ऐका तें आतां ॥६०॥महासर्वाप्ययाचें अंतीं ॥ भौतिकें भूतीं लीनें होती ॥भूतीं आश्रयितां प्रकृति ॥ गौणा प्रकृति साभ्या ये ॥६१॥तैं मग निर्गुण निराकार ॥ ब्रह्म केवळ निराकार ॥ तेथ शब्दांचा संचार ॥ न घडे साचार कुरुवर्या ॥६२॥एवं शंका अंगीकारणें ॥ मान देऊनि नृपाचे प्रज्ञे ॥ शंकापरिहार कोण्या गुणॆं ॥ करी तें श्रवणीं अवधारा ॥६३॥पुढती सृजनाचा अवसर ॥ होतां पूर्णत्वें ईश्वर ॥ शुध्द सत्वात्मक साचार ॥ प्रकृति पर स्वयें होय ॥६४॥तैं पकृत्यंत: पाती ॥ प्रसुप्त प्राचीन जीवपंक्ति ॥ तयां यथापूर्व संसृति ॥ प्रभु स्वशक्ति प्रवर्तवी ॥६५॥पूर्वसंस्कारवंत जीव ॥ प्रकृति माजी लीन सर्व ॥ तयां लिंगशरीर देऊनि देव ॥ करी सावयव संकल्पे ॥६६॥दशेंद्रियें पंचप्राण ॥ मनोबुध्दिसहीत जाण ॥ सत्रा कळांचें लिंगपूर्ण ॥ जीवां लागून सृजी प्रभु ॥६७॥लिंगशरीर लाहतां जीव ॥ विपरीत ज्ञानाचा संभव ॥ विषयात्मक जे दृश्य भाव ॥ कवळी वास्तव विसरुनि ॥६८॥पूर्वसंस्कारें संसृति ॥ ऐसी प्राप्त जीवां प्रति ॥ तेथ प्रभु करुणामूर्ति ॥ स्वयें निवृत्ति उव्दोधी ॥६९॥लक्षुनि जीवाचें कल्याण ॥ लिंगदेहाचें करी सृजन ॥ त्यामाजी चतुर्विध प्रयोजन ॥ योजी संपूर्ण बीजत्वें ॥७०॥लिंगदेह लाहतां जीव ॥ स्वयंभ विषयसेवनीं धांव ॥ तदर्थ स्थळ सावयव ॥ कवळी स्वयमेव आत्मत्वें ॥७१॥एवं विषयसेवनासाठीं ॥ पडिली लिंगदेहाशीं गाठी ॥ त्यामाजी सांसारिक रहाटी ॥ कर्मपरिपाठी प्रभु बोधीं ॥७२॥तया कर्मफलाचा भोक्ता ॥ लाहे लोकान्तरें तत्वता ॥ संपादूनी शुभ सुकृता ॥ हेही स्वसत्ता प्रभूची ॥७३॥एवं विषयार्थ भवार्थ आत्मार्थ । प्रभु लिंगें जीवां देत ॥ निष्कामभजनें तेथ निवृत्त ॥ अकल्पनार्थ त्यालागीं ॥७४॥कल्पनेचा अवमान होतां ॥ अपवर्ग स्वत: सिध्द आइता ॥ ऐसी जीवांची सर्व चिंता ॥ पूर्वीच तत्वता प्रभु वाहे ॥७५॥एवं धर्मार्थ- काम-मोक्ष ॥ जीव अनुभवील अशेष ॥ ऐसा प्रभूचा कटाक्ष ॥ कृपा विशेष लक्षुनी ॥७६॥तस्मात् जीवांचि कारणें ॥ सृष्टयादिकीं प्रवर्तणें ॥ घडे ईश्वरा सर्वज्ञपणॆं ॥ तेंचि श्रवणॆं अवधारीं ॥७७॥जीवांसी अविद्यात्मक आवरण । ह्मणॊनि पावती संसरण ॥ मायावरणातीत पूर्ण ॥ प्रभु म्हणोन नित्य मुक्त ॥७८॥प्रभु मायेचा नियंता ॥ अनंतगुणीं परिपूर्णता ॥ असोन न वचे गुणातीतता ॥ अमळ सत्ता संतत पैं ॥७९॥प्रभूतें आवरुं न शकती गुण ॥ यालागीं नित्य तो निर्गुण ॥ साक्षी स्वसंवेद्य सर्वज्ञ ॥ सर्व शक्तिमान् सर्वात्मा ॥८०॥सर्वोपास्य सर्वनियंता ॥ सर्व कर्मफलाचा दाता ॥ सर्व मंगलायतन तत्वता ॥ सच्चिदानंद भगवंत ॥८१॥इत्यादि विशेषणीं श्रुति ॥ प्रभुचें वैशिष्टय प्रतिपादिती ॥ तो श्रुतिसमुच्चय लिहितां ग्रंथीं ॥ अवर्ण पठती तैं बाध ॥८२॥अंत्य अवर्ण अनधिकारी ॥ केवळ श्रुतींच्या उच्चारमात्रीं ॥ पातित्य पावती तेचि अवसारीं ॥ पडती दुस्तरीं घोर नरकीं ॥८३॥यालागीं त्यांचिये करुणेस्तव ॥ विशेषणमात्रीं श्रुतींचा भाव ॥ सूचिला तो अभिप्राव ॥ महानुभाव जाणती पैं ॥८४॥प्रभू परमात्मा पूर्ण चैतन्य ॥ सर्वग समष्टिप्रपंचवान ॥ ब्रह्माण्डान्त: - पाती गहन ॥ केवळ सर्वज्ञ स्वसंवेद्य ॥८५॥जीव व्यष्टिप्रपंचमात्र ॥ परिमित सप्तवितस्तिगात्र ॥ किंचिज्ज्ञ सुखदु:खपात्र ॥ स्वकर्मतंत्र फळभोक्ता ॥८६॥ऐसियां जीवांसी तत्वता ॥ ईश्वरपदीं सामरस्यता ॥ श्रुति बोलती प्रभूच्या सत्ता ॥ तत्त्वंपदार्थ विवरणें ॥८७॥तत्त्वंपदार्थां उभयांप्रति ॥ सामानाधि- करण्यप्रीति ॥ सोपाधिकां समान म्हणती ॥ परि तें निश्चिती च घडे पैं ॥८८॥मीमांसकांचिया मतें ॥ वैश्वदेवी आमिक्षेते ॥ सामानाधिकरण्य निरुतें ॥ पदार्थबोधें तध्दितींच्या ॥८९॥विश्वदेव देवता पृथक ॥ आमिक्षा द्रव्य तदात्मक ॥ हा सामानाधिकरण्यविवेक ॥ सोपाधिक मैमांसी ॥९०॥खाज्यं यष्टयश्व म्हणते वेळे ॥ पदार्थी सामानाधिकरण्य मिळे ॥ तत्त्वंपदार्थी मोकळें ॥ तेंवि हें न विवळे साम्यत्व ॥९१॥तत्त्वंपदार्थ दोन्ही भिन्न ॥ यालागीं न घडे सामानाधिकरण्य ॥ तत्पद पूर्णत्वें सर्वज्ञ ॥ त्वंपद अल्पज्ञ कर्मभाक् ॥९२॥तैंसेचि सहज उत्पळनीळ ॥ द्रव्यगुणांचा स्वयंभ मेळ ॥ निरुढ अजहल्लक्षणा केवळ ॥ तत्त्वंपदमेळ तेंवि नव्हे ॥९३॥करकाद्रव्य श्वेतगुण ॥ सहज दोहीचें जननमरण ॥ तत्वंपदीं तैसें जाण ॥ सामानाधिकरण्य घडेना ॥९४॥तत्पदांचे विशेषण ॥ सहसा त्वंपद नसे जाण ॥ आणि सहजत्व उभयालागून ॥ न घडे म्हणून विरुध्दार्थे ॥९५॥त्वंपद अज्ञान कर्मतंत्र ॥ केवळ जन्ममरणाचें पात्र ॥ तत्पद नित्यमुक्त अज अजस्त्र ॥ विरुध्द प्रकार हा उभयां ॥९६॥तैसीच कुसुमितद्रुमा गंगा ॥ करितां जहल्लक्षणाप्रसंगा ॥ तत्त्वंपदीं न पवे योगा ॥ सामानाधिकरण्य हें ॥९७॥गंगातटीं कुसुमितद्रुम ॥ कुसुमितद्रुमा यास्तव नाम ॥ तत्त्वेंपदीं कोण तं धाम ॥ काय सांडून लक्षावें ॥९८॥यास्तव तत्त्वंपदीं उभय चैतन्य ॥ लक्षुनि सामानाधिकरण्य ॥ जहदजहल्लक्षना पूर्ण ॥ येथ घट्मान श्रुतिप्रणीत ॥९९॥जेंवि शत्रु भंगिले स्वहतीं ॥ तो हा येथ ध्यानस्थ नृपती ॥ जहदजल्लक्षणा निगुती ॥ ऐक्य साधिती उभयांतें ॥१००॥सन्नध्द बध्द स्थारुढ ॥ चतुरंगिणी सेना दृढ ॥ शत्रुमर्दनकर्म अवघड ॥ त्यागून रुढ उपाधि हो ॥१॥जहत् म्हणिजे या उपाधित्यागें ॥ अजहत् नृपमात्र घॆइजे आंगें ॥ ध्यानीचे विडंबन तें आवघें ॥ त्यजितां नृपाडें ऐक्य घडॆ ॥२॥तेंवि समष्टिप्रपंच मायोपाधि ॥ व्यष्टिप्रपंच अविद्योपाधि ॥ या जीवेश्वरांच्या उभयोपाधि ॥ निरसतां शुध्दि ऐक्यता ॥३॥उपाधि विरुध्दांशत्याग ॥ शुध्द लक्ष्यें चिदंशयोग ॥ घडे म्हणतां पूर्वीं वियोग ॥ कधींही होता सस्कुळा ॥४॥उपाधींचिया आवरणें ॥ भासलीं होतीं भिन्नप्रणें ॥ तीं निरसतां ऐक्य करणें ॥ लागे काय नूतन पैं ॥५॥तस्मात् उभय चैतन्या ऐक्य ॥ उपाधि निरासें घडे सम्यक् ॥ उपाधिनाशें उभयात्मक ॥ अभिन्न एक परब्रह्म ॥६॥एवं निर्गुणीं पर्यवसान ॥ । जहदजहल्लक्षणेंकरुन ॥ उभय चैतन्या घडे पूर्ण ॥ श्रुतिप्रमाण गुरुवचनीं ॥७॥अस्थूळादि श्रुतींचीं वचनें ॥ उपाधिनिषेधाकारणॆं ॥ लूता तंतुसृजनग्रसनें ॥ तेंवि क्रीडणें प्रभूतें ॥८॥जेथवरी शब्दाची प्रवृत्ति ॥ तेथवरी वदोजी नेति नेति ॥ मौनमुद्रा धरोनी अंतीं ॥ श्रुति बोधिती सन्मात्र ॥९॥वास्तव आत्मावगमें अंती ॥ अतन्निरसनें श्रुति फळती ॥ चपळा स्फुरोनि घनीं विरती ॥ तेंवि सांठवती परब्रह्मीं ॥१०॥उपासनादि श्रुतींचीं वाक्यें ॥ झणीं मानिसी परमार्थ विमुखें ॥ सृष्टयाद्यवलंबनें सम्यकें ॥ ज्ञानसाधनें सन्मय पैं ॥११॥तस्मात् ब्रह्मपर साद्यंत निगम ॥ ब्रह्मप्रापक सर्वां सुगम ॥ न बोधतां न वचे भ्रम ॥ यास्तव दुर्गम कर्मजडां ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : December 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP