मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ५०

वेदस्तुति - श्लोक ५०

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


योऽस्योत्प्रेक्षक आदिमध्यनिधने योऽव्यक्त जीवेश्वरो य: सृष्टवेदमनुप्रविश्य ऋषिणा चत्र्केपुर: शास्ति ता: ॥
यं संपद्य जहात्य जामनुशयो सुप्त: कुलायं यथा तं कैवल्यनिस्तयोनिमभयं ध्यायेदजस्त्रं हरिम् ॥५०॥

॥ टीका ॥
जो या विश्वाचा उत्प्रेक्षक ॥
म्हणिजे कल्याण पाहता सम्यक ॥
तो कैसा तरी विवच्य विवेक ॥
ऎका आशेख कथिजेला ॥१७॥
महाप्रळयीं संपूर्ण जग ॥
अव्यक्तीं लीन झालिया साड्‍ग ॥
पुन्हा प्रळयावसानीं सर्वग ॥
पाहे मोघ अनुशयी ॥१८॥
अनुशयी म्हणिजे अविद्येमाजीं ॥
निद्रित झाली जीवराजी ॥
त्या चतुर्विधपुरुषार्थसिध्दिकाजीं ॥
सॄष्टिस्थितिप्रळयादि पावविजे ॥१९॥
धर्म अर्थ काम मोक्ष ॥
चतुर्विध पुरुषार्थ अशेष ॥
सॄष्टिस्थितिप्रळय साक्षेप ॥
न होती प्रत्यक्ष यांवीण ॥२०॥
येथील स्पष्ट अभिप्राय ॥
कीं जीवांसि देऊनियां देह ॥
प्रतिपाळावि यथावय ॥
शेवटीं विलय करावा ॥२०॥
चतुर्विध पुरुषार्थीं अधिकार ॥
जन्म झालिया होय सधर्र ॥
त्रिवर्गस्थितिकाळीं सविस्तर ॥
साधे जोंवर स्थूळ तनु ॥२१॥
अंतीं मोक्ष ही यथाधिकार ॥
त्रिवर्गपरिपाकें स्वतंत्र ॥
प्राप्त होय क्रियानुसार ॥
निर्विकार झालिया ॥२२॥
म्हणोनि जीवांचिये करुणेस्तव ॥
ऎसें अवलोकी प्रभु वास्तव ॥
कीं जीव असमर्थ अविद्येस्तव ॥
विसरले गौरव आपुलें ॥२३॥
त्यांसी हें त्रिविधसष्टयादिक ॥
चतुर्विधपुरुषार्थप्रापक ॥
प्रापणीयचि आवश्यक ॥
ऎसाअ आलोचक विश्वाचा ॥२४॥
निमित्तकारणत्व जगाचें ॥
येणें ईशासि बोलिलें साचें ॥
ऎसें अवलोकितांची अभांड रचे ॥
अष्टधा प्रकॄतीचे संकल्पें ॥२५॥
तेथ होऊनि तत्तदाकार ॥
व्यष्टिसमष्टिरुप अविकार ॥
आदिमध्यनिधनीं निरंतर ॥
वर्ते प्रभुवर विश्वाचा ॥२६॥
आदिशब्दें बोलिजे जन्म ॥
मध्य तें पालन चि परम ॥
निधनें केवळ अंतनाम ॥
जी जे सुगम पयीयें ॥२७॥
विद्यमानत्वें इतुक्या कर्मीं ॥
जो वर्ततसे पूर्णत्वधर्मीं ॥
जया न स्पर्शे विकारोर्मी ॥
त्रिविधानुत्र्कमीं असतां ही ॥२८॥
जेंवि सुवर्ण अलंकारीं ॥
कीं मॄत्तिका कुंड्यादिविकारीं ॥
विद्यमानत्वें वर्तती पुरी ॥
घडतां राहतां मोडतां ॥२९॥
येणें उपादानत्वही बोलिलें ॥
परमात्मया ऎसिया बोलें ॥
येथ वितर्के म्हणाल हें कथिलें ॥
कैसें घडेल विचारितां ॥३०॥
प्रकति आणि पुरुषाकारणें ॥
उभयकारणत्व जाणणें ॥
ऎसें प्रसिध्द असतां वोलणें ॥
हें प्रतिपादणें कैसेनी ॥३१॥
तरी सत्यचि वितर्क ऎसा ॥
परंतु येथील अर्थ परिसा ॥
तयांचें मूळकारण हा आपैसा ॥
यां उत्पत्ति सहसा ज्यास्तव ॥३२॥
हेचि अव्यक्त जीवेश्वर ॥
या पदें व्यास ऋषीश्वर ॥
प्रत्यक्ष बोलिला तो विचार ॥
जाणती चतुर विपश्चिता ॥३३॥
अव्यक्त म्हणिजे गुणमयी माया ॥
जीवशब्दें विराट काया ॥
धर्ता समष्ठभूतया ॥
हीं कारणें जगा या उभयता ॥३४॥
याचा ही जो ईश्वर मुख्य ॥
अनंतब्रह्याण्नायक ॥
आदिकारण जगव्द्यापक ॥
सर्वात्मक परमात्मा ॥३५॥
जयाचें ईशनसत्ता बळ ॥
लाहोनि प्रकॄतपुरुषयुगल ॥
सॄजी विश्व हें सकळ ॥
तो कारण केवळ मुख्यत्वें ॥३६॥
आतां तयाचें प्रवेशनियमन ॥
विश्वीं कैसें तें निरुपण ॥
नॄपा दर्शवी शुकभगवान ॥
तें श्रोते सुजन परिसोत ॥३७॥
पूर्वोक्त प्रकारें हें विश्व ॥
प्रकॄत्तिविकॄतिरुप सर्व ॥
निर्माण करोन्मि स्वयमेव ॥
मग कलें ज्यास्तव तो ऋषि ॥३८॥
प्रकृति म्हणिजे अष्टधा पृथक ॥
भूजळ पावक समीरख ॥
अहं महत् अव्यक्त प्रमुख ॥
विकॄति साड्‌ग अवधारा ॥३९॥
वॄत्तिप्रपंचात्मक एक मन ॥
क्रियाकारक पंचप्राण ॥
ज्ञानकर्म दशधा करण ॥
ऎशा षोडश जाण विकॄति या ॥४०॥
कोणी पंचवीस ही म्हणती ॥
ज्ञेय पंच विषय मेळविती ॥
अंत:करणादि पृथग्गणिती ॥
एवं लिगंदेह वदंती या साची ॥४१॥
पंचभूतें तद्रणाविषय ॥
शब्दादिकां संज्ञा होय ॥
हें जडत्व भोग्य काय ॥
सुखदु:ख होय यांचेनी ॥४२॥
बुध्दयादिकां कर्तुभोक्तॄसंज्ञा ॥
आणि दशेन्द्रियांसहित प्राणां ॥
भोग-कर्म-करण-सूचना ॥
या केलें सॄजना जीवार्थ ॥४३॥
ऋषि ऎसें नाम जीवा ॥
कीं मी ऎसिया अहंभावा ॥
जाणे म्हणोनि ज्ञानविभागा ॥
पात्र परिभावना विपरीत ॥४४॥
असो जीवा ॠषिसंकेत ॥
ज्यास्तव सृजिलें हें त्यासहित ॥
विद्यमानत्वें आपण निश्चित ॥
अनुप्रविष्ट होत लिंगदेहीं ॥४५॥
जेंवि अनुलक्षें संप्राप्तवत ॥
घटमठादिकी गगन होत ॥
पूर्वविद्यामानत्वें यथास्थित ॥
परंतु भासत प्रविष्टा परी ॥४६॥
ऎसा जीवें सहित अनुप्रवेश ॥
सूक्ष्म देहीं करुनि ईश ॥
मग तयासि भोगायतनें दॄश्य ॥
करी प्रत्यक्ष स्थूळ तनु ॥४७॥
मग त्या वपु:त्र्कियानियमें ॥
नियमिता होय संभ्रमें ॥
पृथगिन्द्रियां ज्ञानोद्रमें ॥
तत्तद्वर्में शासित ॥४८॥
एवं स्थूळलिंग देहद्रय ॥
जीवासि हरि प्रकटिता होय ॥
मग अंतर्यामित्वें शासनकार्य ॥
करुनि अनपाय प्रतिपाळी ॥४९॥
यथात्र्कम देऊनि भोग ॥
रक्षित होत्साता साड्‍ग ॥
समत्वें पाळी त्या अभंग ॥
परंतु दैवयोग अनारिसे ॥५०॥
अनेकबीजां एकचि जळ ॥
समत्वें करी प्रतिपाळ ॥
पंरतु रसोत्पत्ति केवळ ॥
विविधा फ़ळदळपुष्पादि ॥५१॥
तेंवि पूर्वसंस्कारानुसार ॥
शुभाशुभप्रवृत्ति सधर ॥
जीवासि होती कर्मतंत्र ॥
इहामुत्रफ़ळभोगा ॥५२॥
तें स्यांचिया दॄढसंकल्पें ॥
फ़ळ देतसे कर्मानुकल्पें ॥
आणि आत्मोपासकां कैवल्यरुपें ॥
होय साक्षेपें तयाच्या ॥५३॥
आतां हेंचि निरुपण ॥
स्वभक्तां सद्रतिकारण ॥
होय परमपुरुष पूर्ण ॥
करी नृपा कथन शुकमुनि ॥५४॥
अनशयी जो पूर्णशरण ॥
पूर्वसाधनसिध्द जाण ॥
घडिघडी दण्डवच्चरण ॥
अभिवंदी आपण तो जीव ॥५५॥
ज्यातें पूर्णावबोधें ॥
अभेद साक्षात्त्कारानुबधें ॥
द्वैतभावना निरोधें ॥
अजा स्वच्छंदें सांडीत ॥५६॥
अजा म्हणिजे अविद्या ॥
कार्यकारणरुपसद्या ॥
जे गवसणी स्वबोधा आद्या ॥
तेचि द्विविधा अवधारा ॥५७॥
कारणरुपा तमात्मका ॥
केवळ संज्ञका* ॥
तत्कार्यरज:सत्वद्योतका ॥
विपरीत ज्ञानें अभिव्यक्त ॥५८॥
होतां आत्मात्वाचा गाढ विसर ॥
जागृतिस्वप्रात्मक वॄत्तिप्रसर ॥
देहाध्यासें सविस्तर ॥
सगुण विकार रुपा ये ॥५९॥
ऎशी हे अविद्या केवळ ॥
जयाचें स्वरुप अति निर्मळ ॥
आत्मत्वें पावूनि टाकी सकळ ॥
जीव प्रेमळ अभ्दक ॥६०॥
जरी म्हणसी हें कैसें घडे ॥
ब्रह्यसंपन्न ही निवाडें ॥
अविद्यासंबंध दिसे कोडें ॥
जोंवरीं जीवित मांडे यथास्थित ॥६१॥
जागॄतिस्वन्पसुषुप्ति ॥
तिहीं अवस्थांची प्रतीति ॥
काय ज्ञातया नव्हे निश्चिती ॥
कीं न सेवी कधीं शब्दादिक ॥६२॥
ज्ञानी निद्रा करी हरिखें ॥
निद्रेमाजीं स्वन्पही देखे ॥
जागॄति लाहूनि ओळखे ॥
गॄहादि आसिकें आपुलें ॥६३॥
यथायक्त गोष्टी बोले ॥
इतरीं बोलता ऎके वहिलें ॥
क्षुधा लागतां चांगलें ॥
अन्न निफ़जलें भक्षित ॥६४॥
तॄषाहरणां जळही सेबी ॥
शीतोष्णहरणा वस्त्रें भावी ॥
एवं इत्यादि अविद्या गौरवीं ॥
असतां त्यजिली केवी मानावी ॥६५॥
तरी येविषयीं उदाहरण ॥
बोलिला ऋषि द्वैपायन ॥
तें परिसतांचि संपूर्ण ॥
शंका निवारण होईल ॥६६॥
जयापरी निद्रित पुरुष ॥
शरीर सांडिद्त नि:शेष ॥
येथील भाव जो प्रत्यक्ष ॥
विचार सापेक्ष तो ऎका ॥६७॥
निद्रित असतां शरीरवंत ॥
ऎसे इतर पाहती जागॄत ॥
परी तो आपण न पहात ॥
निमग्न निश्चित आनंदीं ॥६८॥
तेंवि जीवन्मुक्ता अविद्यावत ॥
इतर पाहती ज्ञान अभ्रान्त ॥
तो कांहीं न पाहे स्वरुपस्थित ॥
जो ब्रह्या नंदमय झाला ॥६९॥
जयाची दष्टी वेधली कवळें ॥
तो चंद्रमंडळ म्हणे पिवळें ॥
ऎसें आपणावरुनि अबळें ॥
देहिक बळें त्या लाविते ॥७०॥
परंतु वस्तुज्ञानी निर्विकार ॥
सबाह्य केवळ आत्माकार ॥
अकर्तात्मकबोधें आत्मप्रचर ॥
अनुभवें संसार न दिसे त्या ॥७१॥
तो सर्व बोलोनि अबोलणा ॥
सर्व भोगूनि अभोक्ता जाणा ॥
करुनि अकर्ता योगिराणा ॥
मूर्खा कळेना रहस्य हें ॥७२॥
विश्व देखोनि अदेखणा ॥
द्वैत नि:शेष स्मरेना ॥
अनुभवी जाणे या लक्षणा ॥
गुरुगम्य खुणा गुरुभक्त ॥७३॥
असो ऎसी अविद्या सर्व ॥
जयाच्या स्वरुपप्राप्तिस्तव ॥
अनुशयी अनन्यभक्त जीव ॥
टाकूनि होय निर्मुक्त ॥७४॥
तया हरीतें निरंतर ॥
ध्यावें अंतरीं सादर ॥
जन्ममरणादि भय अपार ॥
निवारी समग्र परमात्मा ॥७५॥
म्हणसि कोठूनि सामर्य्थ ऎसें ॥
श्रीहरीतें परिपूर्ण असे ॥
तरी अच्युतस्वरुपस्थितिवेशें ॥
मायानिरासें नित्यबोधें ॥७६॥
मूळ कारण माया जेणें ॥
त्यागिली पूर्णात्मस्थितीनें ॥
म्हणोनि निर्भयता तच्चिन्तनें ॥
ऎसें नॄपाकारणें शुक बोधी ॥७७॥
ऋषिशापास्तव दुर्मरण ॥
सर्षदंशें होणार म्हणोन ॥
परीक्षिति भयभीत आपण ॥
त्यासि निर्भय संपूर्ण हें कथिलें ॥७८॥
शुध्दपरमात्मस्वरुपबोधें ॥
अभेद आत्मत्वें वृत्ति वेधे ॥
तेव्हां सद्रति स्वयेंचि प्रवृत्तिरोधें ॥
होइजे शुध्दें निज ऎक्य ॥७९॥
मग देह असतांचि देहातीत ॥
केवळ सन्मयप्रत्ययवंत ॥
होतां मरणवार्ता तेथ ॥
नाहींच निश्चत प्राप्तांसी ॥८०॥
जेव्हां मरणासीच ठाव नाहीं ॥
तेव्हां दुर्गति कैसी काथी ॥
म्हणोनि ऎसा बोध सुनिश्चयीं ॥
अखंड ह्नदयीं धरावा ॥८१॥
समस्त वेदस्तुतीचा इत्यर्थ ॥
या एका श्र्लोंकें इत्यंभूत ॥
परीक्षितीतें शुध्द परमार्थ ॥
कथिला येथ मुनीन्द्रें ॥८२॥
इतुकेन हा अध्याय परम ॥
समाप्त सप्ताशीतितम ॥
साधकीं विवरुनि उत्तम ॥
स्वहित सुगम स्वीकारिजे ॥८३॥
ये वेदस्तुतीचा अर्थगहन ॥
व्याख्यान करितां गुंतती सुज्ञ ॥
त्र्कान्तदशीं शास्त्रप्रवीण ॥
मां पाड कोणा इतरांचा ॥८४॥
शास्त्रप्रवीण आणि गुरुभक्त ॥
वेदन्तविचारें आत्मरत ॥
त्यांसीच उमजे इत्थंभूत ॥
राहती प्राकृत भावार्थीं ॥८५॥
वेदस्तुत्यर्थ परमामृत ॥
गीर्वाणभाषाकूपीं स्थित ॥
व्युत्पत्तिसूत्रें प्रयत्नकॄत ॥
लाहती पंडित धीपात्रें ॥८६॥
ज्यांसिम शास्त्रब्युत्पत्तिसूत्र ॥
नाहीं ते राहते आस्थातंत्र ॥
म्हणोनि गुरुवरें हें विचित्र ॥
सुगम स्वतंत्र कॄपाळुवें ॥८७॥
देशभाषा पर्याय शब्दें ॥
सुगम भाष्य ओंवीप्रबंधें ॥
सोपान रचिलें जेणें लाघे ॥
प्रमेय समुदें सकळांसि ॥८८॥
येथे जे:जे मुमुक्षु तॄषार्त ॥
आबाल सुबोध समस्त ॥
आस्थाचरणें विक्रमवंत ॥
उतरोनि स्वस्थ अनायासें ॥८९॥
श्रध्दात्र्जळीनें बुध्दिमुखीं ॥
ओपोनि घोंटिती एकाकी ॥
ते विश्रान्ति पावती सच्चित्सुखीं ॥
भवभयओळखी मग न उरे ॥९०॥
ऎसा जडमूढां उपकार ॥
सद्रुरुनाथें अपार ॥
ग्रंथरुप केला सविस्तर ॥
सुखकर संपूर्ण दयेनें ॥९१॥
आदिनाथ दयेचा ओघ ॥
विरंचिपात्रें भरला साड्र ॥
तो नार दा लाभतां अव्यंग ॥
तेणें दत्तात्रेयीं मग सांठविला ॥९२॥
त्यावरी तो अवधूत दयाळ ॥
जाणोनि संतप्त कळिकाळ ॥
जनार्दनीं वर्षला पुष्कळ ॥
तोचि  प्रात्र्जळ एकनाथीं ॥९३॥
तेथूनि चिदानंदें प्रवाहत ॥
स्वानंदासी जाहला प्राप्त ॥
गोविन्दें वळोनि यथार्थ ॥
स्थिराविला श्रीमद्दयार्णवीं ॥९४॥
तये पूर्णदयेनें उचबंळोन ॥
थोरसानें कडसणी न करुन ॥
समत्वें प्रबोधामृतप्राशन ॥
करविलें येणें सदुपायें ॥९५॥
आधींच श्रध्दागवत ॥
अठरा सहस्त्र परिमित ॥
प्रबोधक्षिराब्धि निश्चित ॥
त्यामाजीं मथित दशम हा ॥९६॥
इयेही दशमस्कंधामृतीं ॥
साय परमामॄत वेदस्तुति ॥
प्राप्य केली सर्वाप्रति ॥
हे अपार्र उपकृति सद्रुरुची ॥९७॥
पदापदाचा देऊनि झाडा ॥
अक्षरशा अर्थ रोकडा ॥
शास्त्रपरिभाषा निवाडा ॥
केला उघडा श्रीधरोक्त ॥९८॥
तत्वार्थ प्रतिपादितां शुध्द ॥
नानाप्रकारचे शास्त्रवाद ॥
मतान्तरें सिध्दान्तविरुध्द ॥
पावलीं विशद ये ठायीं ॥९९॥
तयांचे करुनियां खंडन ॥
केलें वेदान्तप्रतिपादन ॥
मोक्षद् निश्चयें भगवभ्दजन ॥
ऎसें निरुपण येथींचें ॥१५००॥
हें श्रध्दापूर्वक निष्ठावंत ॥
श्रवणें मननें प्रेमभरित ॥
सेविती ते केवळ अच्यत ॥
होती निभ्रान्त पूर्णत्वें ॥१॥
येथ भगबत्तत्वज्ञान ॥
करतळा-मळकवत् कथिलें पूर्ण ॥
तें जाणोनि विवेक्कसंपन्न ॥
निदिध्यासें आपण अनुभविती ॥२॥
तयां अपरोक्षप्रमेयवंतां ॥
स्वन्पीं न स्मरे भवभयवार्ता ॥
अवस्थामात्रीं तन्मयता ॥
शुध्दसमता बाणेल ॥३॥
आतां पुढिलिये अध्यायीं ॥
ऎसी निरुपणाची नवायी ॥
कीं विष्णुभक्त केवळ निश्चयीं ॥
पावती अद्वयीं समरसतां ॥४॥
त्याहूनि इतर देवांचे भक्त ॥
भोग्यवैभवचि नाशवंत ॥
या पावती त्यासी सायुज्य नित्य ॥
कैवल्य निश्चित दुर्लभ ॥५॥
परीक्षितीच्या प्रश्नास्तव ॥
शुकें हें निरुपिलें वास्तव ॥
सहसा न केला विष्णुस्तव्व ॥
यथार्थ भाव निरुपिला ॥६॥
ते कथेच्या श्रवणाप्रति ॥
सावध असावें मुमुक्षु श्रोतीं ॥
जेणें भज्यभजनफ़लावाप्ती ॥
उमजे चित्तीं पृथक्त्वें ॥७॥
हा नि:संशय विविच्य भाव ॥
पारमार्थिक अन्वय सर्व ॥
वक्ता श्रीकॄष्णदयार्णव ॥
वदेल अनुभवगौरवें ॥८॥
सकळ मंगलांची जननी ॥
ज्ञानाद्यभ्युदकारिणी ॥
ते संपादिजे साधकीं जनीं ॥
हरिभक्ति सज्जनीं सुसेव्य ॥९॥
श्रीमभ्दागवत दशमस्कंध ॥
टीका हरिवरद अगाध ॥
दयार्णवकॄत परम विशुध्द ॥
अध्याय प्रसिध्द सत्यायशीवा ॥१०॥

॥ इति श्रीमभ्दागवते महापुराणेऽष्टादशसाहस्त्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंचे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां वेदस्तुतिनिरुपणं नाम सप्ताशीतितमोऽध्याय: ॥८७॥  
श्रीकॄष्णार्पणमस्तु ॥
श्लोक ॥ ५०॥
टीका ॥ १५१०॥
एवं ॥ १५६०॥
संपूर्णमस्तु


N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP