मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३४

वेदस्तुति - श्लोक ३४

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


स्वजनसुतात्मदारधनधामधरासुरथैस्त्वयि सति किं नृणां श्रयत आत्मनि सर्वरसे ॥
इति सदजानतां मिथुनतो रतये चरतां सुखयति कोन्विह स्वविहते स्वनिरस्तभगे ॥३४॥ (२१)

॥ टीका ॥
अश्व पदाति रथ कुत्र्जर ॥
देश दुर्गें कोश भाण्डार ॥
मंत्री प्रजा स्वप्राण निकर ॥
न वटे रुचिर विरक्तां ॥८५॥
पूर्वीं रुचिरकर कां न रुचे ॥
म्हणाल तरी हें ऎका साचें ॥
निजसार तूं सर्व रसांचें ॥
असतां कैंचें मग दु:ख ॥८६॥
तव चरणांचा आश्रय जिहीं ॥
केला असतां तुझे ठायीं ॥
सर्व रसांचें निजसार तिहीं ॥
भोगिजतसे अनायासें ॥८७॥
सर्व रसांचें जें निजसार ॥ ।
तो आत्म निर्विकार ॥
असतां कां पां नर पामर ॥
धनसुत दार आश्रयिती ॥८८॥
आत्मा केवळ स्वानंदधाम ॥
ऎसें नेणोनि पामर अधम ॥
स्त्रीसंगमीं अति सकाम ॥
धरिती प्रेम धनधामीं ॥८९॥
कोण ते मायिकरससेवनों ॥
प्राणी निवती विष सेवूनी ॥
स्वयेंचि नश्वर जो प्रतिक्षणीं ॥
नि: सारपणीं स्वत:सिध्द ॥९०॥
शिम्बि धान्याचीं टरफ़लें ॥
सकण भासती परंतु फ़ोलेम ॥
तेंवि नि:सार नश्वर असतां अबळें ॥
संसारसोहळें वात्र्छिती ॥९१॥
तस्मात् अपरोक्षज्ञानेंविण ॥
श्रमें करुनि शास्त्रपठन ॥
सज्ञाम म्हणविती ते अज्ञान ॥
विषयास्वादन न सुटतां ॥९२॥
एवं श्रोत्रिय ब्रह्यनिष्ठ ॥
ईश्वरानुग्रहें सद्‍गुरु श्रेष्ठ ॥
तत्प्रसादें आत्माभीष्ट ॥
अपरोक्ष ज्ञान अवगमूनी ॥९३॥
सारासार विवेकेंकरुन ॥
सार सन्मात्र निर्धारुन ॥
असार मायामय जाणोन ॥
ईश्वराभिमानपर्यत ॥९४॥
अनित्य असारीं न रमे मति ॥
तेणें सर्व भोगीं विरक्ति ॥
उपजे ब्रह्यादिस्थावरान्तीं ॥
महत्संगति प्रियवाटे ॥९५॥
सद्‍गुरुबोधें परमतत्व ॥
अपरोक्ष अवगमलें आत्मत्व ॥
यक्तिश्रुतिबळें वास्तव ॥
श्रवणें मननें दृढीकरणा ॥९६॥
महत्संतें तें श्रवण करणें ॥
इतुकियाचिया लाभा कारणें ॥
तीर्थें क्षेत्रें पर्यटनें ॥
ऎसी मानणें मुनियात्रा ॥९७॥
येचि अर्थीं आर्षश्रुति ॥
वदली सनंदनभारती ॥
नॄपा सांगे श्रीशुक सुमति ॥
ते हे श्रोतीं परिसावी ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP