मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ११

वेदस्तुति - श्लोक ११

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


तुल्यश्रुततप: शीलास्तुल्यस्वीयारिमध्यमा: ॥
अपि चक्रु: प्रवचनमेकं शुश्रूषवोऽपरे ॥११॥

॥ टीका ॥ श्रुताध्ययनतप: शील ॥ इत्यादि साधनें सर्वां तुल्य ॥
शत्रुमित्र आप्तकौल्य ॥ समान साफल्य आचरणी ॥५९॥
ऐशिया माजी कोण वक्ता ॥ म्हणसी कोण प्रश्नकर्ता ॥
तरी त्या सर्वां सम योग्यता ॥ जेंवि अमृतासम गोडी ॥६०॥
समस्त ब्राह्मण वेदाध्यायी ॥ परंतु मखक्रियेच्या ठायीं ॥
जो जो क्षण घॆतला जिहीं ॥ ते ते समयीं मंत्र पढती ॥६१॥
तैसे मुनिवर ब्रह्मनिष्ठा ॥ एक वक्ता करुनि स्पष्ट ॥
अपर प्राश्निक श्रवणाविष्ट ॥ करिती अभीष्ट ब्रह्ममख ॥६२॥
तेथ सनंदन नामा मुनि ॥ वक्तृत्वाचा क्षण देऊनी ॥
बैसविला तो तत्कृत प्रश्नीं ॥ श्रुतिव्याख्यानीं  प्रवर्तला ॥६३॥
सनंदनाप्रति प्रथम प्रश्न ॥ म्हणसी मुनींही केला कोण ॥
तरी जो राया मज लागून ॥ विस्मयापन्न त्वां केला ॥६४॥
निर्गुणीं सगुणा श्रुतींची गति ॥ केवळ ब्रह्मीं केंवि चरति ॥
हेचि नारायणाप्रति ॥ नारदें प्रश्नोक्ति पूसिली ॥ ।६५॥
नारायणें ब्रह्मसुता ॥ ब्रह्मसत्रींची कथिली गाथा ॥
तेथें स्वायंभुवीं सनंदन वक्ता ॥ करुनि वार्ता हेचि पुशिली ॥६६॥
जे निर्गुणब्रह्मीं सगुणा श्रुति ॥कैशा कोण्या प्रकारें चरति ॥
यदर्थीं सनंदन मुनि भारती ॥ प्राश्निकां प्रति बोलतसे ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP