मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३३ - ४ व ५

वेदस्तुति - श्लोक ३३ - ४ व ५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥संमति: ॥
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थमनोगतान् ॥
आत्मन्येवात्मना तुष्ट: स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥४॥
आपूर्यमाणमचकप्रतिष्ठं समुद्रमाप: प्रविशंति यद्वत् ।
तद्वत्कामयि प्रविशंति सर्वे स शांतिमान्पोति न कामकामी ॥५॥

॥ टीका ॥
ऎसीं स्मॄतीचीं निश्र्चयवचनें ॥
हाचि श्रुत्यर्थ ही जाणणें ॥
कैवल्य निष्काम कर्माचरणें ॥
लाहिजे म्हणे श्रुति निकर ॥८१॥
ह्नदयामाजी वसे काम ॥
ती त्यागिजे तैं निष्काम ॥
होतां लाहिजे कैवल्य धाम ॥
ऎसा नियम निगमान्तीं ॥८२॥
तस्मात् कर्माचरणें मोक्ष ॥
न लाहिजे हे जाणोनि दक्ष ॥
उभयभोगीं मग अनपेक्ष ॥
होय साक्षेप गुरुभजनीं ॥८३॥
पूर्वीं व्यसनशतान्वित ॥
तैं तो तेथूनि होय विरक्त ॥
स्वदेह दारा सुह्नद सुत ॥
गॄह धन आप्त न रुचती तैं ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP