मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३५

वेदस्तुति - श्लोक ३५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


भुवि पुरुपुण्यसदनान्यृषयो विमदास्त उत भवत्पदांबुजह्नदोऽघभिदंघ्रिजला: ॥
दघति सकृन्मनस्त्वयि य आत्मनि नित्यसुखे न पुनरुपासते पुरुषसारहरावसथान् ॥३५॥ (२२)

॥ टीका ॥
पूर्वोक्त साधनसंपन्न ॥
मननशील जे मुनिजन ॥
विमद म्हणिजे निरभिमान ॥
जाले श्रीचरण उपासितां ॥९९॥
तुझें श्रीपद ह्नद्‍यीं ज्यांचे ॥
रंगलें यास्तव पदजल त्यांचें ॥
अघौघनाशक जालें साचें ॥
म्हणोनि वाचे श्रुति वदती ॥९००॥
ऎसे ही जे प्राप्तपुरुष ॥
तीर्थक्षेत्रोपासनासोस ॥
करिती लक्षूनि लाभ विशेष ॥
महत्संगाचा ते ठायीं ॥१॥
तीर्थसदनीं महत्संग ॥
होतों निश्र्चयात्मक अव्यंग ॥
तल्लाभास्तव सेविती साड्र ॥
तीर्थीं क्षेत्रें ऋषिवर्य ॥२॥
अथवा पुरु म्हणिजे अधिकतर ॥
भगवद्‍भक्तजन पुण्यसार्र ॥
संग्रहाहूनि जे नरवर ॥
तीर्थनिकरमय झाले ॥३॥
तेचि महंत गुरुवरश्रेष्ठ ॥
जेथ वसताती पैं संतुष्ट ॥
सकळ तीर्थांचें मूळपीठ ॥
आश्रेम अभीष्ट पैं त्यांचे ॥४॥
त्यांचीं सदनें चि तीर्थें क्षेत्रें ॥
तिहीं सेविलीं जळें पवित्र ॥
ब्रह्यादि सुरवर त्यांचिये यात्रे ॥
अहोरात्रें करिताती ॥५॥
भगवद्‍भक्तजनाचीं भाजनें ॥
सुरवरमुकुटीं नीरांजनें ॥
त्यांचिया पादपीठाकारणें ॥
करिती कल्याणें वात्र्छुनि ॥६॥
तस्मात् सद्‍गुरु जेथ वसती ॥
तीर्थं क्षेत्रां सेव्य ती क्षिति ॥
जाणोनि मुनिवर तेथेंचि रमती ॥
पुन्हा न रमती भवगेहों ॥७॥
पुरुषसारहरनिवास ॥
तेथ ते मुनिवर न करिती वास ॥
न संडिती गुरुसदनास ॥
मराळ मानस जया परी ॥८॥
पुरुषसारहर म्हणिजे काय ॥
क्षमा शान्ति विवेक धैर्य ॥
यांचें हरण जेथें होय ॥
तन्नामनिलयें तीं होती ॥९॥
धैर्य क्षमा शान्ति विवेक ॥
हेचि पुरुषामाजी सम्यक ॥
सार जाणोनियां निष्टंक ॥
सेविती लोक चतुर्दश ॥१०॥
यांचें हरण कोणे ठायीं ॥
तरी स्त्रीपुत्रादि धनधान्यें विषयीं ॥
मोह प्रलोभ संवचोर पाहीं ॥
करिती निश्चयीं भवदसनीं ॥११॥
ऎसिया सदनीं ती मुनिवर ॥
सहसा पुनरपि न होती स्थिर ॥
आश्चर्य न म्हणावें हें थोर ॥
अमॄतसार सेविलिया ॥१२॥
आत्मा जो तूं नित्य सुख ॥
जिंहीं सेविला ते मग पुरुष ॥
पुरुषसारहरवसतीस ॥
होती उदास हें कें नवल ॥१३॥
एकवार ही तुझ्या चरणीं ॥
ज्यांचें मानस जडलें ध्यानीं ॥
तेही स्त्रीपुत्रादि सदनों ॥
आसक्त होऊनि न रमती ॥१४॥
मॄगजळपाना जो तान्हेला ॥
तेणें अमॄतह्नद देखिला ॥
तो मग न भूले मॄग तॄष्णेला ॥
राहे खुंतला सुधाह्नदीं ॥१५॥
तेंवि एकवार ही तव पदरति ॥
सेवनि पावले विश्रान्ति ॥
ते मग धनसुतवनितासक्ति ॥
सदनों वसती किमुत पै ॥१६॥
एकवार ही श्रीपदप्रेमा ॥
फ़ावल्या त्यजिती वधूसुतधामा ॥
मां पूर्वोक्ता मुनिनिष्कामा ॥
भवभ्रमधामा रुचि कैंची ॥१७॥
हें ऎकोनि मीमांसक ॥
म्हणती पूर्वपक्ष एक ॥
यदर्थी स्फ़ुरला जो नावेक ॥
तो ही सम्यक अवधारा ॥१८॥
मननशीळ होऊनि मुनी ॥
प्रपंच सांडोनि तीर्थसदनीं ॥
महंतापासूनि श्रवणीं मननीं ॥
रमती म्हणोनि जें बदलां ॥१९॥
गॄहस्थाश्रमात्मक ज्या वसती ॥
पुरुष सारहर तय़ांप्रति ॥
जाणोनि सहसा मग न रमती ॥
ऎसें वेदान्तीं प्रतिपाद्य ॥२०॥
वेदाज्ञेचें लंघन न घडे ॥
लंघितां वेदबाह्यता आंगीं जडे ॥
ऎसें उभयत्र सांकडें ॥
तें ही निवाडें अवधारा ॥२१॥
आन्नाय म्हणिजे वेदां प्रति ॥
क्रियारुप चित्तप्रवृत्ति ॥
यज्ञाचरणें इहामुत्रार्थीं ॥
भजिजे ऎसा सिध्दान्त ॥२२॥
यज्ञत्र्कियापर आन्नाय ॥
तढ्‍व्यतिरिक्त जो श्रुतिसमुदाय ॥
उपनिषभ्दाग जे होय ॥
अनर्थप्राय तो अवघा ॥२३॥
रुखा वरी कां वरुख ॥
तन्मूळरसें वाढला देख ॥
तथापि पत्रपुष्पफ़ळादिक ॥
तेथ सम्यक नुपलभे कौं ॥२४॥
तैशा क्रियाविमुख ज्या वेदोक्ति ॥
अनर्थक्यता तयांप्रति ॥
झणें येईल म्हणोनि सुमति ॥
त्या ही योजिती क्रियाड्रगत्वें ॥२५॥
जेथ जेथ अतदर्थ वाक्यें ॥
उपनिषभ्दागीं जीं सम्यकें ॥
जैमिनिप्रमुखीं तीं सार्थकें ॥
केलीं क्रियाड्रगें योजूनि ॥२६॥
जैसे तंत्रवार्तिककार ॥
अतदर्थ उपनिषद्वाक्यें प्रचुर ॥
बोलिला कर्तॄस्तवनपर ॥
योजनि सधर क्रत्वंगीं ॥२७॥
क्रतूचा कर्ता जो कां जीव ॥
यजमान ऐसें तयासि नांव ॥
उपनिषद्वाक्यें तयाचा स्तव ॥
केला म्हणतां सार्थकता ॥२८॥
इतुकेन त्र्कत्वंग अर्थाकांक्षा ॥
वरिली प्रकटूनि निराकांक्षा ॥
ऎसिया मीमांसकांच्या पक्षा ॥
उत्तर बोले वेदान्ती ॥२९॥
कृष्ण केश करणपटु ॥
सकामें इहामुत्रीं विनटु ॥
त्र्कत्वंग कर्ता तोचि स्पष्टु ॥
बोलिला श्रेष्ठ स्मॄतिकारीं ॥३०॥
उपनिषद्वाक्यें त्याचा स्तव ॥
सहसा न करितीच वास्तव ॥
अपरोक्षबोधें ब्रह्यानुभव ॥
तद्विरोघें प्रबोधिती ॥३१॥
एकचि अद्वितीय केवळ ब्रह्य ॥
विज्ञानानंदमय निजधाम ॥
अचक्षु अश्रोत्र जें अवर्ष्म ॥
विपरीत कर्मकर्तृत्वा ॥३२॥
अद्वितीय परमानंदरुप ॥
आत्मा जो कां नित्य निर्लेप ॥
तया कर्तॄत्वादि संकल्प ॥
योजिती अल्प मतिमंद ॥३२॥
तंत्रवार्तिककॄत जें मते ॥
तुम्हीं मानिलें दॄढ संमत ॥
तयाचें ही वाक्य येथ ॥
अननुमत तें ऎका ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP