वेदस्तुति - मंगलाचरण
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीजगद्रुरवे नम: ॥
ऊँ नमो जी श्रीगोविन्दा ॥ प्रणवास्मका प्रणतवरदा ॥
प्रभवावनप्रलयधंदा ॥ तदपवादा प्रबोधका ॥१॥
प्रबोधक तूं श्रीगोविन्द ॥ गोशब्दात्मक केवल वेद ॥
तेव्देत्ता तूं वेदविद ॥ वदवीं विशद वेदस्तुति ॥२॥
तूं वाग्देवी वदविता ॥ लक्ष्मीसंपन्न तुझिया सत्ता ॥
विश्व प्रकाशी तुझेनि सविता ॥ चंद्रीं अमृता पुरक तूं ॥३॥
तो तूं माझिये हृदयकमळीं ॥ सर्व वससी प्रबोधशाळी ॥
उत्साह संविन्मय कल्लोळीं ॥ तोचि हेलावे दयार्णवीं ॥४॥
संपतां षडशीतितमाध्यायीं ॥ शुकें नृपाच्या श्रवणालयीं ॥
गोष्टी वदला जे शेषशायी ॥ कथिलीं पाहीं ते अवघी ॥५॥
सन्मार्ग बोधूनि उभयभक्तां ॥ कृष्ण झाल व्दारके जाता ॥
परिसोन ऐसिया वृत्तान्ता ॥ कौरवनाथा स्मय गमला ॥६॥
सताम् मार्ग तो सन्मार्ग ॥ स्वत: प्रमाणभूत चांग ॥
परत: प्रमाणाचें आंग ॥ न करी लाग जयाचा ॥७॥
प्रमाण नोहे हें अप्रमाण ॥ ऐसिया वयुनाचें कारण ॥
तो जेथें संशय न वसे पूर्ण ॥ ते वेद जाण सच्छब्दें ॥८॥
तया सन्मार्गे ब्रह्मोपलब्धी ॥ बोधुनि श्रीकृष्ण कृपानिधि ॥
व्दारके गेला ऐसी शाब्दी ॥ शुक प्रतिपादी परि न घडे ॥९॥
ऐसी अघटमान शुकोक्ति ॥ हृदयीं मानूनि परीक्षिती ॥
पुसता झाला सप्तशीति ॥ तमाध्यायीं तें ऐका ॥१०॥
तया प्रश्नाचें उत्तर ॥ देईल श्रीशुकयोगीश्वर ॥
तो इतिहास वेदान्तपर ॥ नारदनारायद्णयोगें ॥११॥
तो रायाचा कैसा प्रश्न ॥ सज्जनीं परिसिजे सावधान ॥
मूळ श्लोकोक्त पद्यावरुन ॥ भाषाव्याख्यान हरिवरद ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : December 21, 2017
TOP