मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक २८

वेदस्तुति - श्लोक २८

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


त्वमकरण: खराडखिलकारकशक्तिधरस्तव बलीमुद्रहंति समदंत्यजयाऽऽनिमिषा: ॥
वर्षभुजोऽखिलक्षितिपतेरिव विश्चसृजो विदधति यत्र ये त्वधिकॄता भवतश्चकिता: ॥२८॥ (१५)
॥ टीका ॥
इन्दियसंबंधरहित असतां ॥
सकळ इन्द्रियांचा शक्तिधर्ता ॥
इन्द्रियशक्ति प्रवर्तविता ॥
स्वर्यें स्वसत्ता अतीन्द्रियें ॥८९॥
यदर्थी दृष्टान्त बदला शुक ॥
श्रोतीं परिसजे तो सम्यक ॥
जेणें संशय नुधवी मुख ॥
उमजे विवेक साकल्यें ॥९०॥
स्वप्रकाशें देदीप्यमान ॥
यालागीं स्वराट् तुझें अभिधान ॥
अतिन्द्रिय तुझें ज्ञान ॥
नोहे कारण सापेक्ष ॥९१॥
ऎसा समर्थ जाणोनि तुज ॥
पूजा अर्पीं देवतपुत्र्ज ॥
अविद्या संवृत्त असतां सहज ॥
भजती भोज नाचोनी ॥९२॥
अनिमिष म्हणिजे इन्द्रादि देव ॥
तुज भजती हें न अपूर्व ॥
त्यांसी ही पूज्य जे ब्रह्यादि शर्व ॥
ते भजती सर्व सभ्दाबें ॥९३॥
जैसे नॄपाचे किड्कर ॥
स्त्रियांसहित सेवनपर ॥
तैसे अविद्यासंवृत ही सुरवर ॥
भजती किंकर होत्साते ॥९४॥
ऎसी पुराणान्तरींची बोली ॥
येथ श्रोतयां जाणविली ॥
यावरी सुरांची भजनचाली ॥
ते ही कथिली जात असे ॥९५॥
मनुष्यें अर्पिती हव्यकव्य ॥
देवपितरें तें भक्षिती सर्व ॥
जैसे वर्षपति पार्थिव ॥
प्रजागौरब स्वीकारिती ॥९६॥
भरतवर्षादिवर्षति ॥
ते मग सेविती चत्र्कवर्ती ॥
स्वप्रजादत्त ज्या संपत्ति ॥
त्या त्या अर्पिती तच्चरणीं ॥९७॥
आणि जे जे कार्थी जे नियुक्त ॥
ते ते करिती अतंद्रित ॥
अंभग आज्ञा पाळिती नित्य ॥
पूजा समस्त हे त्यांची ॥९८॥
कां पां आज्ञा धरिती शिरीं ॥
ऎसें परिसा म्हणसी जरी ॥
तरी चकित म्हणिजे भय अन्तरीं ॥
तुझे निर्धारीं बागविती ॥९९॥
यदर्थी ऎका श्रुतिसंकेत ॥
भयें परिमित वाहे वात ॥
भयें सूर्य उदया येत ॥
अति नियमस्थ ॠतुमानें ॥६००॥
भयें नियमित पावक जाळीं ॥
वडवाग्नी बसे सिन्धुजळीं ॥
भयें इन्द्र यथाकाळीं ॥
वर्षे भूतळी परिमित पैं ॥१॥
भयें मॄत्यु भूतग्रासा ॥
करी नियमित आज्ञेसरिसा ॥
एवं तव आज्ञा परेशा ॥
वाहती शिरसा अमराद्य ॥२॥
तस्मात् करणप्रवर्तक तूं ईश्वर ॥
करणपरतंत्र प्राकृत नर ॥
म्हणोनि तुज भजती सादर ॥
हा निर्धार श्रुत्युक्त ॥३॥
इतुकेंचि भजनासी कारण ॥
केवळ नव्हे श्रुतिप्रमाण ॥
तुजचि पासूनि उत्पन्न ॥
तव तंत्र जाण यास्तव ही ॥४॥
जैसे अग्नीचे स्फ़ुलिंग ॥
उर्ध्व उसळती लघु सवेग ॥
त्यांसी अग्नीचा वियोग ॥
म्हणणें चांग न भसे हें ॥५॥
जरी अंशत्वें वेगळे झाले ॥
तरी अग्नीत्वा न मुकलें ॥
अग्नितेजें तेजाथिलें ॥
म्हणोनि बोलिले तत्तंत्र ॥६॥
तैसे तुज आत्मायापासून ॥
विस्तारती अनेक प्राण ॥
ते सर्वहि तदंश जाण ॥
भासतां भिन्न तव तंत्र ॥७॥
सर्व लोक सर्व देव ॥
सर्व भूतें सर्व जीव ॥
आत्मयापासूनि यां उद्धव ॥
तस्मात् सर्व तव तंत्र ॥८॥
मजपासूनि कैं यां जन्म ॥
कैं लाधलें रुपनाम ॥
म्हणसी तरी तो अनुक्रम ॥
ऐकें निजात्मवत्सला ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP