मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ४४

वेदस्तुति - श्लोक ४४

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


त्वं चैतह्रह्यदायाद श्रध्दयाऽऽत्मानुशासनम ॥
धारयंश्चर गां कामं कामानां भर्जनं नॄणाम् ॥४४॥

॥ टीका ॥
तूं ही हें रहस्य देवर्षि ॥
सारवाड्‍मयीं अशेषीं ॥
विभागापरि ह्नर्न्मजूषी ॥
ठेवीं कीं होसी तद्‍बंधु ॥७०॥
केवळ ब्रह्यचि दाया परी ॥
अप्रयत्नलब्ध या प्रकारीं ॥
सेवीं अनुभवें अंतरीं ॥
जैसें निर्धारीं सनकादिक ॥७१॥
यास्तव नारदा नारायण ॥
ब्रह्यदायाद संबोधन ॥
बोलिला अथवा साधारण ॥
अर्थविवरण दूसरें ॥७२॥
कीं अगा ये ब्रह्यनंदना ॥
श्रध्देकरुन या अनुग्रहणा ॥
ऎकिल्या आत्मानुशासना ॥
सदूगतिकारणा निश्चयेम ॥७३॥
धरित होत्साता अंतरीं ॥
स्वेच्छा विचरें अवनीवरी ॥
प्रबोधें जडजीवां उध्दरीं ॥
कीं कामासि संहरी रहस्य हें ॥७४॥
जेंवि दृक्तिमिरा चंडप्रभ ॥
एनसभारा जाह्नवी अंभ ॥
तेंवि ह्नद्रत नरांचे कामकोंभ ॥
जाळी स्वयंभ अवगमतां ॥७५॥
शुक म्हणे गा परीक्षिती ॥
सार्वभौम तूं श्रवणक्षिती ॥
ऎसा शब्दीं सुशिक्षितीं ॥
बोलिला ज्याप्रति नारायण ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP