स्फ़ुट पदें व अभंग - ३६ ते ४०
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
३६ श्लोक (द्रुतविलंबित)
दिसत साच नवाच विलास रे । बधुधनें बहु लांचविलास रे भ्रमसि तों तुज अंतक आपटी । म्हणुनि कॄष्णदयार्णव थापटी ॥
आचरसी जन चोरुनि पातकां । मग घडे तुजलागि निपात कां ॥
करिल अंतक ते समयीं पटी । म्हणुनि०॥
दिननिशीं करिसी न उसंत रे । न भजसी सुर सज्जन संत, रे ॥
अचुक भोग घडे लिहिला पटीं । म्हणुनि०॥
दिवस दोन धनें जरि मातसि । परि पुढें न घडे गरिमा तसीए ॥
मग मुखावरि खासिल चापटि । म्हणुनि०॥
वय सरे पसरे बहु पाप रे । सुगम साधन लोटुनि पांपरे ॥
भ्रमासि तूं परि अंतक धोपटी । म्हणुनि०॥
हरि मुरारि मुकुंद जनार्दना । नरहरी मधुकैटभमर्दना ॥
करिं असा सुरसीं जप वाक्पटीं । म्हणुनि०॥
न करितां करितां त्र्कियमाण रे । घडत भोग तयाचि समान रे ॥
मग घडे पडणें भवदुर्घटीं । म्हणुनि०॥
जरि कराल विचार निका मनीं । तरि त्यजा भजता धन-कामिनी ॥
मग दयार्णव तारिल दुर्घटीं । म्हणुनि०॥
३७ श्लोक (द्रुतविलंबित)
बहुत सार तुझें वय जातसे । घडि घडी तुजला यम खातसे । परि उगाचि कसा भुलसि जना । त्यजुनि मोह अधीं भज सज्जना ॥
संकळ शाश्वत मानुनि वैभवा । त्यजुनी सौख्य अधीं रतसी भवा । विषयतस्कर देहसमागमीं । त्यजुनियां, स्वसुखा सुगमा गमीं ॥
सुह्नत जोंवरि हें बपु सावध् । गतवयीं न मनीं सहसा वधू । इतर विन्मुख बांधव सोयरे । म्हणुनियां धरिं माधव सोय रे ॥
पळपळावरि वेंचत आवधी । अवचिता तुजला यम हा वधी । उबगती अवघींच तुझीं तुला । त्वरित सांडिं जढा भ्रमहेतुला ॥
गळ गिळूनि मिना निमणेंच कीं । विषयसंगम साच तसाच कीं । दिपकळे जळताति पंतर रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग रे ॥
श्रवण देऊनि नादसुखावरी । रिपुभयासि मनांत न सांवरी । धरुनि गारुडि नेति भुजंग रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग रे ॥
निरखितांच चणे भ्रम मर्कटा । घडत मुष्टि भरी न सुटे कटा । विषय केवळ मोहतरंग रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग०॥
जळत गेह कसें वसवीतसां । त्यजुनि अमृत कां विष घेतसां । तरुण देह करी देह करी तुज दंग रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग०॥ जरि दयार्णव सेवि न भूलला । तरि तया न कळे चवि भूलला । म्हणुनि सज्जनसंगति रंग रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग रे ॥
३८ श्लोक ( शार्दलविक्रीडित)
कौडिण्यप्रभु भीमकोत्तम मनीं चिंती जगत्पाळणा । जेव्हां रुविमाणि नाम ठेउनि सुता घालि वधू पाळणां ॥
तीचीं लक्षित लोचनीं अनुदिनीं आलौकिक त्र्कीडणें । छंदें कॄष्णदयार्णव प्रगटवी शार्दूकविक्रीडणें ॥१॥
लक्ष्मीकांत गदा सचत्र्क ह्नदयीं श्रीवत्स माळा गळां । हस्तीं पंकज पांचजन्य धरिला चंद्रद्युतीआगळा ॥
कासे कांचनपट्ट सोज्वळ हरी विद्युल्लतेची कळा । साक्षाद्विष्णु वधूवरासि वर दे कुर्यात्सदा मंगलम् ॥२॥
नाहीं रुक्मिणितुल्य ये त्रिभुवनीं कॄष्णाविणें नोवरा । साक्षाद्रुक्मिणि रुक्मकांति सहसा नीलाकॄति श्रीवरा । ऐसा हा घटितार्थ भीमक मनीं इच्छीतसे सर्वदा । तैसा कॄष्णदयार्णव प्रगटतां कुर्यात्सदा मंगलम् ॥३॥
शंभू षण्मुख विघ्ननाशक उमा गंगा फ़णी कंठिंचे । नंदी चंडिश भॄंगिरीट गण जे कैलासवैकुंठिंचे । ज्ञानी योगसमाधिवैभवबळें कैवल्य जे पावले । ते कल्याण दयार्णव प्रतिदिनीं कुर्यात्सदा मंगलम् ॥४॥
वैकुंठप्रभु सेंदिरा करतळीं पंचायुधें जो धरी ॥
नाना-चित्रचरित्र-कीर्तनमिसें नाना जनां उध्दरी ॥
क्षीराब्धी-जठरीं द्विज-ध्वज हरी शैय्यालु शेषावरी ॥
साक्षात्कॄष्णदयार्णव प्रतिदिनीं कुर्याच्छुभं मंगलम् ॥५॥
तीर्थें आणि तपेंव्रतें हरिकथा दानें समाराधना ॥
शास्त्रें धर्मविचारणा विनयिता यज्ञादि आराधना ॥
योग-ध्यान-समाधिसाधनसुखें विच्छेदकें बंधना ॥
ऐसी बोधकता दयार्णव सदा कुर्याच्छुंभ मंगलम् ॥६॥
३९ श्लोक (इंद्रवज्रा)
राजेश्रि ती शब्द विशाळ केले ॥
त्या संभ्रमा मूढ मनीं भुकेले ॥
वृध्द वॄषाच्या वृषणार्थ कोल्हें ॥
देखोनि जैसें भ्रमतांचि मेलें ॥१॥
विलासिनी-नेत्रकटाक्ष-बाणें । मूर्खा मनीं मन्मथ हांव बाणे ॥ वॄध्द वृ०॥२॥
वनस्पतीसारज हाटकाची । स्पृहा धरी मूढ महा ठकांची ॥ वृध्दवृषा०॥३॥
संपादुनी शाबरमंत्रसिध्दी । इच्छी करुं सर्वजन प्रसिध्दी ॥ वृध्दवृ०॥४॥
संमोहना जारणमारणातें । साधूनि वांछी धनकारणातें ॥ वृध्दवृ०॥५॥
पायाळ नेत्रांजनसाधनासी । साधूं म्हणे मूढ महा धनासी ॥ वृध्दवृ०॥६॥
पंचाक्षरी द्यूत भिषकचिकित्सा । मूढा मनीं तद्रतलाभ इच्छा ॥ वृध्दवृ०॥७॥
सन्मार्ग सांडूनि कुमार्ग रानीं । कां हो भरावें चतुरां नरानीं ॥८॥
श्रीकातसभ्दक्ति-सुवर्ण वाचा । इत्यर्थ हा कॄष्णदयार्णवाचा ॥९॥
४० श्लोक (इंद्रवज्रा)
संसारिचें वैभव तों न राहे । दुर्वासना नाडितसे नरा हे ॥
यालागिं हा मायिक भाव जावा । गोविंदजी प्रेमरसें भजावा ॥१॥
जो दुर्जनु राघवतात साधी । जो अर्जुना दुर्धर मानसाधि ॥
तो मोह अंत:करणें त्यजावा । गोविंद०॥२॥
जो दुस्तरापासुनि सोडवीता । जो ऊर्ध्वमूळाप्रति तोडवीता ॥
तो सद्गुरु ह्नत्कमळें पुजावा । गोविंद०॥३॥
व्यापार जो जो निपजे स्वभावें । नैमित्य-नित्यादिक भिन्न भावें ॥
ब्रह्यार्पणें तो स्वरुपीं यजावा । गोविंद०॥४॥
नामामृतें अंतर रंगवावें । सच्चित्सुखें दुस्तर भंगवावें ॥
दयार्णवी वेध निका न जावा । गोविंद०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP