मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ३१ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ३१ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ३१ Translation - भाषांतर न घटत उभ्दव: प्रकॄतिपूरुषयोरजयोरुभययुजा भवंत्यसुभॄतो जलबुदबुदवत् ॥त्वयि त इमे ततो विविधनामगुणै: परमे सरित इवार्णवे मधुनि लिल्युरशेरसा: ॥३१॥ (१८)॥ टीका ॥पूर्वपक्ष इयें ठायीं ॥विधिनंदनीं केला पाहीं ॥स्वत: जीवांसी जन्म नाहीं ॥तरी घडे दोहीं पासाव ॥८३॥तेथ प्रकॄति जीवरुपें होय ॥अथवा पुरुष होतसे काय ॥किंवा प्रकॄतिपुरुष हें उभय ॥जीवरुपें होतसे ॥८४॥प्रकॄतीच होती ऎसें म्हणतां ॥तैं जीवास येतसे जडता ॥पुरुष ऎसें म्हणों जातां ॥सविकारता पुरुषा ये ॥८५॥दोही मिळोनि जीव होय ॥तैं लागती दोषद्वय ॥यास्तव न घडे हा निश्चय ॥वक्ता श्रुत्यर्थ प्रतिपादी ॥८६॥तरी जीवांचा संभव कैसा ॥वास्तव कथितो सावध परिसा ॥प्रकृतिपुरुषांचिया अध्यासा- ॥माजी जीवदशा उभारे ॥८७॥वास्तव जन्मातीत ईश ॥आज अनंत जो अविनाश ॥जन्म मिय्यात्वें प्रकॄतीस ॥न घडे म्हणोनि अजा म्हणिजे ॥८८॥उभतांच्या अजत्वास्तवही ॥जीवांसि उध्दव घडत नाहीं ॥श्रुतीनें हाचि अर्थ पाहीं ॥निर्धारिला म्हणे वक्ता ॥८९॥जे मिथ्यात्वें नामें अजा ॥श्वेतरक्तकॄष्णा सहजा ॥त्रिगुणात्मक बहु ते प्रजा ॥प्रसवे आपणासारखिया ॥९०॥अजा म्हणिजे शेळियेप्रति ॥दोघे अज तयेचे पति ॥एक जीव तो तत्सगती ॥भोगी आसक्ति सुखदु:खें ॥९१॥दुजा तो ईश भोगूनि भोगा ॥असंग करी इचियाअ त्यागा ॥तस्मात् प्रकृतिपुरुषयोगा- ॥पासूनि होती जीव कोटी ॥९२॥न घडत दोहींचा संयोग ॥परस्परें अध्यासयोग ॥तेणें होती जीव अनेग ॥असुभॄत म्हणिजे सप्रमाण ॥९३॥प्राणादि सोपाधिक जीव ॥जलबुद्बुद्वत् होती सर्व ॥तो उभय योगभिप्राय ॥दृष्टान्तद्वारा अवगमिजे ॥९४॥बुद्बुद न होती केवळ जळें ॥अथवा न होती केवळ अनिळें ॥जळाअनिळांच्या संयोगमेळें ॥बुद्बुद मोकळे उभ्दबती ॥९५॥तेथ जेंवि निभ्रेत्त पवन ॥जलबुद्बुदां उपादान ॥तैसेंचि दार्ष्टान्तींहि जाण ॥पुरुष उपादान येर प्रकृति ॥९६॥तया अथवा ययास्तव ॥होय गगनांचा संभव ॥एवं भूतें भौतिकें सर्व ॥पुरुषा पासाव श्रुति वदती ॥९७॥बहुत व्हावें ऎसा काय ॥कामिता झाला पूर्ण काम ॥अग्निपासोनि स्फ़ुलिंगोद्रम ॥स्थिर जंगम तेंवि स्वयें ॥९८॥तस्मात् परमात्मयापासून ॥सर्व लोक सर्व प्राण ॥भूतां देवतादिकांचे गण ॥होती उत्पन्न स्फ़लिंगवत् ॥९९॥ब्रह्यापासूनि चराचर ॥तें ब्रह्यत्वाहूनि नोहे अपर ॥सुवर्णाचे अलंकार ॥ते कार्तस्वर कीं भिन्न ॥७००॥तेंवि परमात्मा उपादान ॥स्थिरचरप्रपंचा लागून ॥ऎसिया श्रुति-वाक्यावरुन ॥विकारस्पर्शन नव्हे ईशा ॥१॥परिणामाच्या अनंगीकारें ॥उपादानत्व ईशा खरें ॥विवर्तवादें श्रुतिनिर्धरें ॥प्रतिपाद्य ऎसें म्हणे वक्ता ॥२॥अद्वैतवादी कोणी एक ॥परिणामी अंगीकारुनि सम्यक ॥आत्मयास विकारताकलंक ॥झणें स्पर्शेल म्हणोनियां ॥३॥निमित्तोपादानाच्या ठायीं ॥विपरीत भावबोधें पाहीं ॥प्रकृतिपुरुषैक्यें सर्व ही ॥जीव उभ्दवती हें सिध्द ॥४॥निमित्तकारण पुरुष म्हणतां ॥सहसा न शिवें विकारता ॥प्रकृत्युपादानें जडता ॥आरोप मिथ्या जीवांसी ॥५॥येचि अर्थी श्रुति ॥एकचि अद्वय ब्रह्य म्हणति ॥अजा एका मायेप्रति ॥प्रतिपादिती गुणमयी हे ॥६॥अरे आत्मा हा अविनशी ॥बहुधा श्रुती इथे विषीं ॥उपपादिती आणि जीवांसी ॥उत्पत्ति कैसी ते ऎका ॥७॥उपाधिमात्र जन्म पावे ॥चैतन्य व्यापक तेथें स्वभावें ॥जन्म तिये उपाधि सवें ॥स्वत:न पवे जन्म कहीं ॥८॥पुढती उपाधि विलयें करुन ॥परमात्मस्वरुपीं जीव लीन ॥इत्यादि श्रुति वाक्यांचें श्रवण ॥वास्तव जनन निरसी पैं ॥९॥त्वयि म्हणिजे तुझ्या ठायीं ॥कारणात्मकें स्वरुपीं पाहीं ॥ते हे चराचर जीव सर्व ही ॥उपाधि उदयीं उभ्दवती ॥१०॥तस्मात् वास्तव जन्म नसे ॥उपाधिस्तव मात्र दिसे ॥अनेकनामगुण भेदा सरिसे ॥लीन होती तुजमाजी ॥११॥अनेक कार्योपाधींसहित ॥विविध नामगुणां समवेत ॥तुजमाजी पुढती लीन होत ॥हा सिध्दान्त श्रुतींचा ॥१२॥तया लीन होतियां परी ॥द्विविध वदली श्रुति वैखरी ॥दृष्टान्तद्वारां तें अवधारीं ॥म्हणें उत्तरीं शुकराया ॥१३॥सुषुप्ति आणि प्रळयसमयीं ॥प्रपंचा विलय होतसे पाहीं ॥कैसे कोण कोणाच्या ठायीं ॥लीन होती नामरुपें ॥१४॥मधूमाजी अशेष रस ॥लय पावोनि करिती वास ॥सुषुप्ति सरिसे न नि:शेष ॥कारण नाश न होता ॥१५॥कारण विद्यमान असे ॥म्हणोनि जीव श्वासोच्छवासें ॥जाणों येती रसही तैसे ॥अनोळखपणें रुचि देती ॥१६॥कोणी मी ऎसा न स्फ़रे जेंवि ॥श्वासोच्छ्वास स्वभाव दावी ॥द्रमकुसुमादि मधु न सुचवी ॥परी भेषजीं चवी प्रकटितसे ॥१७॥एवं सुषुप्ति मधु दृष्टान्तीं ॥उपपादिली ऎसिये रीती ॥आतां ऎका कैवल्यमुक्ति ॥सिन्धू मिळती जेंवि सरिता ॥१८॥वर्षाक्षोमें जेंवि सिन्धु जळा ॥प्राशुनि नेती मेघमाळा ॥ते उतरतां भमंडळा ॥प्रवाहशीळा नद्या होती ॥१९॥त्या समस्ता सिन्धुमिळणीं ॥यथापूर्व होती पाणी ॥स्वादें बोधें अथवा गुणीं ॥पुन्हा निवडणी न घडे त्यां ॥२०॥परमे म्हणिजे परात्परपुरुषीं ॥जीवा अमॄतत्व समरसीं ॥पुढती निवडणियाची पुसी ॥न उरे ऎसी श्रुतिवाणी ॥२१॥एवं परमेश्वरापासून ॥जीव होताती उत्पन्न ॥तद्वश करिती कर्माचरण ॥पुढती लीन तेथ होती ॥२२॥संसारचत्र्कीं भ्रमण ऎसें ॥जीवांलागृनि बोलिलें असे ॥तेथूनि मुक्त होती कैसे ॥तेंही ईशें दर्शविलें ॥२३॥तें ईशाचें अभिप्रेत ॥श्रुति बोलिली विधीसंमत ॥तदनुसार जे वर्तत ॥ते निर्मुक्त भवचक्रीं ॥२४॥पूर्वी समष्टिजीव झाला ॥व्यष्टिजीवसृष्टि तो व्याला ॥भवचत्र्काचे भवंडी भ्याला ॥निजसुटिकेला अवलोकी ॥२५॥भूतें भौतिकें अवलोकिलीं ॥लोकलोकन्तरें पाहिलीं ॥द्विशाप्रदिशांची घेतली ॥शुध्दि साकल्यें सर्वही ॥२६॥तेथ सुटिकेची न दिसे वाट ॥मग होवोनि अंतरनिष्ठ ॥उपस्थान केलें स्पष्ट ॥नित्य निघोंट वस्तूचें ॥२७॥ऋतसत्य जें नामें ब्रह्य ॥तेथ चित्कळा झाली प्रथम ॥तयेच्या स्तव नें वास्तव धाम ॥होऊनि निर्भ्रम स्वयें झाला ॥२८॥श्रुतीनें तो मार्ग पुढें अबळां ॥प्रकट दाखविला प्रात्र्जळा ॥आर्षश्रुति ते कौरवपाळा ॥वदता झाला योगीन्द्र ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP