मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ३७ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ३७ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ३७ Translation - भाषांतर न यदिदमग्र आस न भविष्यदतो निधनादनुमितमंतरा त्वयि विभाति मॄषैकरसे ॥अत उपमीयते द्रविणजाति विकल्पपथैर्वितथमनोविलास मॄतमित्यवयंत्यबुधा: ॥३७॥ (२४)॥ टीका ॥ज्या कारणास्तव हें विश्व ॥सृष्टिहूनि पूर्वीं सर्व ॥नव्हते हा अभिप्राव ॥तथ्य स्वयमेव सुविचारें ॥३१॥तैं हें सदचि केवळ ॥आत्मा अद्वितीय निर्मळ ॥असतें झालें अचंचळ ॥सौम्या प्रात्र्जळ श्रुति वदती ॥३२॥आणि हें प्रळ्यानंतर ॥होणार नाहीं हा निर्धार ॥ब्रह्य सदोदित अविकार ॥तैं सदसत्पर सन्मात्र ॥३३॥असत् म्हणिजे कारणमाया ॥कार्य जाणिजे भूतमाया ॥त्यांच्या अभावें अद्वया ॥सहज आत्मया अजस्त्रता ॥३४॥एवं सॄष्टिपूर्वीं नव्हतें ॥न होय निश्चयें प्रळयापरतें ॥या कारणास्तव मृषा भासतें ॥स्थितिकाळीं ही तवरुपों ॥३५॥तूं जो आत्मा परात्पर ॥केवळ चिद्रस अविकार ॥मध्यें तुजमाजि विश्वाकार ॥मिथ्या गोचर होत असे ॥३६॥पूर्वीं नव्हतें शेवटीं नाहीं ॥मध्यें ही तें मिथ्याचि पाहीं ॥ऎसें अवगमिलें कॄतनिश्चयीं ॥सुज्ञां ह्नदयीं विचारितां ॥३७॥म्हणोनि या प्रकारें मिथ्याभूत ॥विश्व जाणिजे सुनिश्चित ॥जे द्रविणजाति विकल्प पथ ॥उपमिजेत तिहींसीं ॥३८॥द्रविण म्हणिजे पदार्थमात्र ॥मॄल्लोह हेमरुप स्वतंत्र ॥तयांचे बहुधा भेद विचित्र ॥घटमठाकारकुडलादि ॥३९॥घटमठ शरावपिण्डाकारें ॥अवघी मॄत्तिकाचि अवतरे ॥कीं मणिकुण्डलकटप्रकारें ॥कार्तस्वरें अनुरिजे ॥४०॥पास फ़ारोळे शूळ परिघ ॥आयस तद्रुपें अव्यंग ॥बुद्बुद कल्लोळतरंग ॥उदक साड्र अवघे तें ॥४१॥नानभिघानीं अंबरजाती ॥सुज्ञ तंतु चि जाणती ॥एवं कारणत्वस्थिती ॥कार्यें भासती अनेकधा ॥४२॥तेथ विकारां नाममात्रता ॥जरी त्या बहधा साकारता ॥कारण मॄत्तिकादि तत्वता ॥सत्य सर्वदा अभेदें ॥४३॥तेंवि आकाशादि महाभूतें ॥कीं भौतिकें मनुजादि समस्तें ॥यांसी नाममात्रता पॄथक वर्ते ॥ब्रह्यचि सत्य वास्तव ॥४४॥श्रुति प्रतिपाद्य हेचि सधर ॥कीं नामधेय जो विकार ॥तें वाचारंभण मात्र ॥कारण स्वतंत्र सत्यत्वें ॥४५॥जैसा एक मॄत्पिण्ड ओळखिला ॥मॄत्तिकामयचि अवगमिला ॥तैसा जो जो मॄद्विकार देखिला ॥तो जाणिजेला तद्रूप ॥४६॥कीं एक सूवर्णाचा मणि ॥बोधे सूवर्णचि म्हणोनि ॥तरी सर्वहि अलंकारभरणीं ॥तन्मय मनीं जाणीं ये ॥४७॥जैं एक नखनिकॄंतन ॥लोखंड ऎसें कळलें पूर्ण ॥तैं शस्त्रादि विकार-भरण ॥आयस कारण ओळखिजे ॥४८॥नामरुपातीत ज्ञानी ॥आपणा ब्रह्यरुप मानी ॥तरी आत्मवत्सर्वभूतानि ॥अंत:करंणीं जांणतसे ॥४९॥एवं अनेक उदाहरणी ॥सत्यत्व निश्चयें कारर्ण ॥नामधेय कार्यालागूनी ॥पृथक् सत्तत्व असे ना ॥५०॥तैसें विश्व हें नाममात्र ॥वाचारंभण भ्रमाचें पात्र ॥एक ब्रह्यचि सत् स्वतंत्र ॥निरंतर अविनाश ॥५१॥तस्मात् विश्वसत्वीं प्रामाणाभाव ॥आणि मिथ्यात्वीं प्रमाणसंभव ।वितथमनोविलासभव ॥सत्यत्वगौरव या नाहीं ॥५२॥वितथ म्हणिजे लटिका फ़ोस ॥मन:कल्पिन जगदाभास ॥येथ जे धरिती सत्तात्वास ॥ते मूर्ख भ्रमास वरपडती ॥५३॥बंध्यापुत्राचिया घरा ॥इच्छूनि अंतरी स्नेहादरा ॥बागुल पाहुणा आला खरा ॥गंधर्वनगराहूनियां ॥५४॥येरें आदर केला थोर ॥बैसों घातलें अंबर ॥कांहींबाहीं बोलूनि सत्वर ॥श्रमपरिहार मांडिला ॥५५॥वाळुकास्नेहें अभ्यंगिला ॥ऊष्ण मॄगजळें म्हाणिला ॥दिग्दुकूळें परिवेष्टिला ॥बैसविला शून्यासनीं ॥५६॥बायु उगाळूनि पुष्कळ ॥गंधें चर्चिला निर्मळ ॥खपुष्पांची गळां माळ ॥घालूनि केवळ तोषविला ॥५७॥वोडंबरीचे अलंकार ॥आगीं लेबविले सुदंर यावरी भोजनाचा प्रकार ॥पंक्तिकारसमवेत ॥५८॥छायापुरुषादि आपुले सखे ॥बैसवृनि अस्यंत:हरिखें ॥धूमद्रुमपत्रें सुरेखें ॥वीस्तीर्ण पॄथकें मांडिलीं ॥५९॥नेत्रींची बाहुली सुवेषा ॥जे चतुर देखणीं पुरुषां ॥ते वाढी पदार्थविशेषा ॥चमत्कारें अति शीघ्र ॥६०॥जाई जुई शेवंतिका ॥यांच्या फ़ळांच्या पृथक् शाका ॥स्वन्पींच्या पक्कान्नां साजुकां ॥परिबेषी कां औदार्यें ॥६१॥त्यावरी कासवीघृत सद्यस्तप्त ॥पुष्कळ वाढिलें यावतॄप्त ॥तंव तेथें अतिथि अकस्मात् ॥दैवें निश्चित मी गेलों ॥६२॥तये पंक्तिसि जेविलों ॥जेऊनियां अत्यंत धालों ॥सांगावयासि तुम्हांसि आलों ॥म्हणे इतरां अन्नार्थियां ॥६३॥ऎसिया अनॄत भाषणा ॥मॄर्खा वांचूनि विश्वासेना ॥तद्वप्रपंचविकत्त्थनाअ ॥वाचारंभणा जाणिजे ॥६४॥ऎसा बितथ मन:कल्पित ॥बाचरंभणमात्र विवर्त ॥प्रपंच सत्य म्हणती संतत ॥ते अज्ञान अत्यंत तमग्रस्त ॥६५॥एथ ऎसा असे प्रयोग ॥विवादाध्यासित असन्मोघ ॥आदिअंतीं न दिसे साड्र ॥विश्वबोध म्हणोनियां ॥६६॥विवादाध्यासित म्हणिजे काय ॥तरी याचा ऎसा अभिप्राय ॥दों प्रकारींचा अन्वय ॥समासें होय तो ऎका ॥६७॥प्राड्रणीं चोर देखिला ॥द्रष्टे म्हणति कैसा आला ॥तेथ बहुतीं वितर्क केला ॥बहुतापरीचा बहुतेक ॥६८॥माळवदाची जे कां वाट ॥तिकडूनि आला म्हणती स्पष्ट ॥एक म्हणति भिन्तचि नीट ॥चढूनि चोखट उतरिला ॥६९॥द्वारपिधाना आधींच आला ॥ऎसाच एकीं तर्क केला ॥शेखीं पाषाणें ताडिला ॥तंव प्रत्यय बाणला छाया हे ॥७०॥तेंवि विवाद म्हणिजे विशेष वाद ॥ज्यास्तव करि ती शास्त्रविद ॥एक म्हणति अनादिसिध्द ॥उत्पन्न होत एक म्हणती ॥७१॥एक म्हणती संकल्पकर्ता ॥एक म्हणती ईश्वरसत्ता ॥एक जीवचि समस्ता ॥कर्में तत्वता हेतु वदती ॥७२॥एक प्रकृतिचि कर्ती म्हणती ॥एक काळचि सहसा मानिती ॥ऎसे बहुप्रकारें वदती ॥विवादती परस्परें ॥७३॥षड्दर्शनांचे विशेष वाद ॥ज्यावरीं तें हें विश्व विशद ॥अध्यस्त मिथ्या प्रसिध्द ॥द्वितीयार्थ तो ऎका ॥७४॥विपरीत वादें अनुसंधित ॥तेचि विवादाध्यसित ॥हेचि स्पष्ट अभीष्ट अभिप्रेत ॥परिसूनि दृष्टान्त विचारा ॥७५॥रज्जु असूनि म्हणिजे सर्प ॥कीं स्थाणु असूनि पुरुषकल्प ॥कीं शिंपीवरी रौप्यारोप ॥अवघा जल्प विपरीत ॥७६॥विपरीत बोधें अवगमिलें ॥तें विपरीत वादा पात्र झालें ॥जेव्हां वास्तव प्रत्यया आलें ॥तेव्हांचि कळलें मिथ्यासें ॥७७॥भ्रमाहूनि पूर्वीं आरोप ॥नामरुपात्मक हा अल्प ॥नव्हता चि कीं सविक्षेप ॥न दिसे स्वयंभ भ्रमान्तीं ॥७८॥आदिअंतीं अविद्यमान ॥चित्स्वरुपीं विश्व जाण ॥आकाशादि नामें भिन्न ॥तें विपरीत भाषण भ्रमास्तव ॥७९॥ऎसे विवादें अध्यस्त ॥देवतिर्यग्मनुजवत ॥तें निश्चयें नव्हे सत ॥हा सिध्दान्त श्रुतिगादित ॥८०॥अविद्यमान आदिअंतीं ॥दॄश्य विकारीं निश्चिती ॥शुक्तिरजतादिकांची स्थिति ॥मिथ्या ते रीती प्रपंच हा ॥८१॥आणि मिथ्या जें जें नाहीं ॥तें दॄश्य विकारीं नव्हे कहीं ॥जैसा आत्मा निरंतर पाहीं ॥कालत्रयीं सद्रुप ॥८२॥आत्मा सर्वदा विद्यमान ॥सन्मात्रत्वें विकारहीन ॥निर्गुणत्व अदृश्य पूर्ण ॥विश्वलक्षण तेंवि नसे ॥८३॥विश्व मिथ्या अविद्यमान ॥दृश्य विकारी म्हणोन ॥केवळ अज्ञानकारण ॥द्विलक्षण अनुमानें ॥८४॥जेथ ज्या सत्यत्वबुध्दि ॥ते वारा मोटें बांधिती ॥गगन प्राशिती तॄड्हरणा ॥८५॥ते खपुष्प माथां तुरंबिती ॥मॄगजळीं नौके बैसती ॥बाऊ देखोनि कांपती ॥भिऊनि चढती स्वस्कंधीं ॥८६॥असो त्या मूर्खाची कथा ॥प्रपंच नाहींच सर्वथा ॥आत्मा अद्वितीय तत्वता ॥सनंदन वक्ता बोलतसे ॥८७॥हें ऎकुनि प्राश्निक मुनि ॥आशंकोनी आपुले मनीं ॥म्हणती प्रपंच निपटूनी ॥नाहींच निर्गुणीं परब्रह्यीं ॥८८॥जरी प्रपंचसंबंधाचा गंध ॥चैतन्यीं अस्पॄष्ट प्रसिध्द ॥तरी जावें काय केला अपराध ॥संसृतिबंध तो पावे ॥८९॥किवां असे कांही अगण्य ॥ईश्वरासी बहुतेक पुण्य ॥ज्यास्तव संसारवैगुण्य ॥न पवोनि दैग्य नित्यमुक्त ॥९०॥केवळ संसार मिथ्या वदतां ॥कैंचि पापपुण्याची वार्ता ॥तेव्हां मॄषा बंधमुक्तता ॥साध्यसाधकता कायसी ॥९१॥तरी कर्मकांड हा विषय ॥किन्निमित्तक कैसा काय ॥ज्याचा वेदीं बहु अन्वय ॥साधनमय प्रशंसिला ॥९२॥ये उत्प्रेक्षेच्या ठायीं ॥जीवेश्वर विशेष कायी ॥तो विदित होय श्रुत्यन्वयीं ॥रुपकें कांहीं जो ग्रथिला ॥९३॥दोनी पक्षीं जीव ईश्वर ॥परम जिवलग अत्यंत मित्र ॥निकटवर्ती जे एकत्र ॥एक देहतरुवर आश्रयिती ॥९४॥प्रवृत्तिनिवृत्यात्मक जया ॥पक्ष असती पक्षीद्वया ॥पावे क्षणक्षणा वॄद्विक्षया ॥म्हणोनि देहा वॄक्षत्व ॥९५॥विषयसुखात्मक फ़ळीं ॥जो पिकला असे सर्वकाळीं ॥तया देहवृत्ति स्नेहशाळी ॥पक्षीयुगलीं वसिजेते ॥९६॥एकावांचूनिया एक ॥क्षणभरी नसती हें कौतुक ॥ऎसे अनादि हे जिवलग ॥परी वृत्तिविवेक भिन्न यां ॥९७॥आसक्त होऊनि जीव पक्षी ॥विषयसुखात्मक फ़ळ ये वृक्षीं ॥परम रुचि कर मानूनि भक्षी ॥शिव अनुलक्षी साक्षित्वें ॥९८॥तया फ़ळाचिया उन्मादें ॥रमे गुणवतीसीं विनोदें ॥मग ते लोहित शुक्ल कॄष्ण तच्छंदें ॥बहुतां प्रजतें प्रसवली ॥९९॥असो इत्यादि अनेक श्रुति ॥जीवेश्वर विशेष वदती ॥तेचि सनंदन भारती ॥वदे ते श्रोतीं परिसिजे ॥११००॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP