मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक २२

वेदस्तुति - श्लोक २२

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


त्वदनुपथं कुलायमिदमात्मसुहृत्प्रियवच्चरति तथोन्मुखे त्वयि हिते प्रिय आत्मनि च ॥
न बत रमंत्यहो असदुपासनयाऽऽत्महनो यदनुशया भ्रमंत्युरुभये कुशरीरभृत: ॥२२॥ (९)

॥ टीका ॥ भो भगवंता तुझिये भजनीं ॥
अनुकूल नरतनु सर्वांहूनी ॥
कुलायशब्दें वैय्याकरणीं ॥
जिथे लागून म्हणताती ॥१८॥
कु हें पृथ्वीचें अभिधान ॥
तीमाजी अंती होतसे लीन ॥
यालागीं कुलाय म्हणती जाण ॥
देहालागून विपश्चित ॥१९॥
ते नरतनु भजनानुकूळ ॥
आज्ञेसरिसी वर्तनशीळ ॥
आमतुल्य प्रिय केवळ ॥
लाहोनि विकळ भजनीं जो ॥२०॥
तथापि सर्वज्ञ तूं परमात्मा ॥
भावें भजती त्यांचा प्रेमा ॥
जाणोनि पुरविसी त्यांच्या कामा ॥
विश्रामधामा विश्र्वेशा ॥२१॥
अमरतरुच्या तळवटीं ॥
न लाविताहि कुसुमादिवाटी ॥
फ़ळ पुण्यांच्या विविधकोटी ॥
इच्छितां पोटीं उपलब्ध ॥२२॥
तैसा भक्तभावानें सरिसा ॥
तूं सम्मुखची श्रीपरेशा ॥
प्रियतम हितकर तुज ऎसा ॥
आन आपैसा नसतांहि ॥२३॥
ऎसा सुखेच्यहि तूं असतां ॥
तुझ्या ठायीं प्रेमा चित्ता ॥
सख्यादि भजनें नादरितां ॥
भजती विवर्ता आत्मघ्न ॥२४॥
असत्पदार्थोपासना ॥
अवलंबूनि विपरीत ज्ञानाअ ॥
भजती ऎसिया आत्मघ्नां ॥
दीर्घस्वन्पा वरपढणें ॥२५॥
म्हणती वडील दरिद्री होते ॥
आपण झालों उद्योगकर्ते ॥
नाना व्यवसायी धनातें ॥
संपादिलें बहुयत्नीं ॥२६॥
धनवर्धना विश्वासुक ॥
पाहोनि योजिले सेवक ॥
तथापि त्यांचा प्रातिमासिक ॥
पाहणें लेख लागतसे ॥२७॥
नामांकतांसी तनुसंबंध ॥
केले उत्साह अगाध ॥
वनितारत्नें शुध्द ॥
भाग्यें प्रसिध्द लाधलीं ॥२८॥
रुपलावण्याच्या खाणी ॥
मनोनुकूला गॄहवर्तिनी ॥
सालंकृता वसनाभरणी ॥
तरुणी तरणि ते जाढ्या ॥२९॥
तयांचे पोटीं झाले कुमर ॥
प्रज्ञावंत परम चतुर ॥
तिहीं घेतला कुटुंबभार ॥
धाष्णर्ये धुरंधर निवडिले  ॥३०॥
निष्कापासूनि कोटिमान ॥
यत्नें संग्रहिलें कांचन ॥
आयव्ययाचें परज्ञान ॥
अति सज्ञान प्रबोधनीं ॥३१॥
अनेक वस्तूंचे संग्रह ॥
अष्टादशधान्यसमूह ॥
उभराभरी करितां पहा हो ॥
अवकाश लाहों न पवती ॥३२॥
विश्चास न वाटेचि कोणाचा ॥
धोका द्रव्यरक्षणाचा ॥
निगूढ ठाव निक्षेपाचा ॥
युक्ति-प्रयुक्ति निर्मिती ॥३३॥
ऎसें चित्त ठाय़ीं ठायीं ॥
सर्वदा गुंतोनि गेलें पाहीं ॥
तथापि देखोवेखीं काहीं ॥
सुकॄतप्रवाहीं भरताती ॥३४॥
कार्तिकमाघवैशाखस्नानीं ॥
जाऊनि बैसती पुराणीं ॥
धन वेंचितां मानिती हानी ॥
ह्यणती आह्यां हें कोठूनि आठबलें ॥३५॥
एक ह्यणती नायकों आतां
तुम्ही साधावें परमार्था ॥
सांडुनि प्रंपचाची चिंता ॥
स्वस्थ एकान्ता सेवावें ॥३६॥
येरु ह्यणे बायको भोळी ॥
रक्षूं न शके लुगडें चोळी ॥
ते केंवि धनसदना सांभाळी ॥
आह्यांवेगळीं अतिदीन ॥३७॥
लेकुरें नेणतीं आह्यांविणे ॥
किविलवाणें दिसती दीनें ॥
प्रस्तुत नातोंडांचीं लग्नें ॥
करणें लागती आवश्यकें ॥३८॥
नामा-रुपा-सारिखे देख ॥
गृहस्थ पाहूनि आवश्यक ॥
यांसी करणें सोयरिक ॥
दीर्घ विवेक करुनियां ॥३९॥
असत्पदार्थोपासना ॥
सप्रेमभावें ऎसी मना ॥
रुचलिया मग वैराग्य कोणा ॥
भावें आत्मघ्ना उपजेल ॥४०॥
समयीं आलिया याचकासी ॥
मुष्टी पिष्ट देतां त्यांसी ॥
वदान्य मानी आपणासी ॥
सुकॄतराशी म्हणे घडल्या ॥४१॥
सहस्त्रभोजनें सांवत्सरिकें ॥
कीं श्राद्वपक्षादि वार्षिकें ॥
ग्रहणें व्यतिपातपार्विकें ॥
साधी सम्यकें सुवृतार्थ ॥४२॥
व्रतें उपवास पारणीं ॥
तीर्थयात्रांची धांवणी ॥
म्हणे मजहूनि दुसरा कोणी ॥
देवीं ब्राह्यणीं न भजेची ॥४३॥
लोकीं माझी गॄहस्थिति ॥
स्त्रीपुत्रादि धनसंपत्ति ॥
मजहुनि सुखी नाहीं क्षिति ॥
म्हणोनि चित्तीं श्र्लाघेजे ॥४४॥
तंव पूर्वील जे कां विश्वासुक ॥
ठेविले होते जे हस्तक ॥
तेचि होती खग्रासक ॥
पाहतां लेख साकल्यें ॥४५॥
त्यांसी बोलतां निष्ठुरपणें ॥
तेही बोलती पुरें उणें ॥
पांचांमाजी लाजिरवाणें ॥
घेऊनि भांडणें वाढविती ॥४६॥
तयांसी होती अन्नान्नगति ॥
सभाग्य केले ते स्वसंगति ॥
कृतघ्न फ़िरुनि पडिले अंतीं ॥
म्हाणोनि खंती बहु वाटे ॥४७॥
ऎकतां त्यांच्या विषम गोठी ॥
त्र्कोधें भडका उठे पोटीं ॥
बळें झोंबूनियां कंठीं ॥
वाटे घांटी फ़ोडावी ॥४८॥
ऎसा प्रचंड्द क्रोध वाढे ॥
तैं शान्ति क्षमा कोणीकडे ॥
घातपातावरी वावडे ॥
वेंचूनि कवडे नृपसदनीं ॥४९॥
ऎसे व्यवसाय अनेक ॥
असदाराधनीं मानिती सुख ॥
तेणे प्रबळे शत्रुषट्क ॥
मग भोगिती नरक बहु योनी ॥५०॥
रांड मेलिया दु:खें रडे ॥
पोर मेलिया शोर्के वरडे ॥
विश्रान्ति न वटे चहुंकडे ॥
वर्णितां तोंढें गुण त्यांचे ॥५१॥
असो वैराग्य नुपजे देहीं ॥
तंववरी सहसा सुटका नाहीं ॥
आत्महंते मोहप्रवाहीं ॥
ऎसेचि पाहीं निमज्जती ॥५२॥
नरदेह अनुकूल नवविधभजना ॥
तो मग लावी तदुणकथना ॥
दु:खें व्याप्त अंत:करणा- ॥
माजी वेदना भोगीतसे ॥५३॥
हरिगुणश्रवणा पटतर श्रोत्र ॥
हरिकीर्तना अनुकूल वक्त्र ॥
हरिपरिचर्यें लागीं कर ॥
नरशरीर ऎसें जें ॥५४॥
असदुपासनेचे राहटी ॥
तें वेचिती विषयासाठीं ॥
मग भोगिती दु:खकोटी ॥
देतां घरटी भवचत्र्कीं ॥५५॥
जेथ जेथ वासना गुंते ॥
तेथ जन्म घेऊनि कुंथे ॥
पावे अनेक दुर्योनींते ॥
भवभ्रमपथें परिभ्रमतां ॥५६॥
मर्कट होवोनि कैकाडियाचें ॥
दारोदारीं तत्तंत्र नाचे ॥
कीं सर्प होवोनि गारुडियाचे ॥
कुटुंब त्याचें मग पोषी ॥५७॥
रीस व्याघ्र उक्ष वृश्र्चिक ॥
श्वान वानर माजोर भूषक ॥
रासभ सूकर मृग नंबुक ॥
धरी अनेक कुशरीरें ॥५८॥
चौर्‍यांशीं लक्ष संख्या योनी- ॥
माजी नरतनु अनुकूल भजनीं ॥
केवळ आत्मप्राप्ती लागोनी ॥
देवें निर्मूनि ठेविली ॥५९॥
चौर्‍यांशी लक्ष योनी भ्रमतां ॥
केवळ विषयभोगीं रमतां ॥
दुर्लभ नरदेह हा अवचितां ॥
लाहिजे तत्वता बहुभाग्यें ॥६०॥
दुर्लभ नरदेह लाभल्यावरी ॥
अन्य योनोंचिया परी ॥
विषयासक्त होइजे नरीं ॥
तरी मग थोरी काय याची ॥६१॥
लाहोनि नरदेह निधान ॥
संपादूनि आत्मज्ञान ॥
ब्रह्यनिष्ठ होईजे पूर्ण ॥
मिथ्या भवभाव विसरुनि ॥६२॥
आत्मा देखावा ऎकावा ॥
आत्मा मननीं मंतव्यावा ॥
निदिध्यासें अनुभवावा ॥
ध्यावा गावा श्रुति म्हणती ॥६३॥
श्रुतींचा मुख्य अभिप्राय ॥
भ्रांत जीवांचा समुदाय ॥
तयांसी लाधलिया नरदेह ॥
परमार्थसोय साधावी ॥६४॥
असन्मॄगम्बुपानें सुख ॥
मानितां तेथें पावलें दु:ख ॥
सन्मात्र चिदंबु सम्यक ॥
सेवितां तोख सर्वत्र ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP