वेदस्तुति - श्लोक २७
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
तव परि ये चरंत्यखिलसत्वनिकेततया त उत पदात्र्कमंत्यविगणय्य शिरो निऋते: ॥
परिवयसे पशूनिवगिरा बिबुधानपि तांस्त्वयि कॄतसौह्यदा: खलु पुनंति न ये विमुखा: ॥२७॥ (१४)
॥ टीका ॥
तरी सर्वभूत निवासी जो तूं ॥
त्या तव परिचर्येचा तंतु ॥
रक्षृनि उपासिती संततु ॥
तेचि हा मॄत्यु निस्तरती ॥६७॥
निॠति ऎसें मॄत्युसि नाम ॥
स्थाचा करुनि अतित्र्कम ॥
सुखें पावती कैवल्यधाम ॥
निष्काम काम होत्साते ॥६८॥
अतिक्रम कैसा म्हणाल जरी ॥
तरी पाय ठेवूनि मृत्युशिरीं ॥
सुखें तरती भवसागरीं ॥
एवढी थोरी भक्तीची ॥६९॥
आणि जे अभक्त भजनविमुख ॥
ते होत कां विपश्चित प्रमुख ॥
त्यांतें बांधिसी पशुसम देख ॥
मग भोगिती दु:ख तापत्रयें ॥७०॥
त्यांसी वाचेचिये दावणीं ॥
नामरुपाच्या गळबंधनीं ॥
बांधून घालिसी तैं त्यां स्वन्पीं ॥
सुटिका दुर्लभ जगदीशा ॥७१॥
यास्तव तुजशीं सोहार्द केलें ॥
तेचि सप्रेमळ दादुले ॥
आपण पवित्र होवूनि भले ॥
पवित्र केलें त्रिजग तिहीं ॥७२॥
परंतु ज्ञानी विपश्चित ॥
ज्ञानसाधक परी अभक्त ॥
ते न निस्तरती मृत्युपथ ॥
इत्त्थंभूत निश्चय हा ॥७३॥
जरी वस्तु अपरोक्ष नित्य ॥
वास्तव ज्ञान ही अपरोक्ष सत्य ॥
तथापि असंभावना-तिरस्कॄत ॥
परोक्षवत अवगमतें ॥७४॥
असंभावना विपरीत भावना ॥
तिहीं भ्रमाक्त केलिया मना ॥
तैं अपरोक्षचि परोक्षपणाअ ॥
अनुसरोनि भव दावी ॥७५॥
नाहीं झाली चित्तशुध्दि ॥
तव जे साधिली ज्ञानसिद्धी ॥
परि ते संसारद्रुम न छेदी ॥
भवभ्रमवॄध्दिकर होय ॥७६॥
ऎसे नोहेंचि उपासकां ॥
सप्रेम-परिचर्यासाधकां ॥
भजनें चित्तशुध्दि देखा ॥
होतां विवेका उदय घडे ॥७७॥
भगवत्प्रसादें अपरोक्ष ज्ञान ॥
प्राप्त होतां अयत्नेंकरुन ॥
करतळामळकवत् करुनि निर्वाण ॥
लाहती संपूर्ण भ्रमनाशें ॥७८॥
भगवभ्दजनें चित्तशुध्दि ॥
झालिया अपरोक्षज्ञानवृध्दि ॥
पावोनि भवभ्रम समूळ छेदी ॥
हा निरवधि सिध्दान्त ॥७९॥
सप्रेम भावें उपास्य भजन ॥
तैसेंचि अभेद गुरुसेवन ॥
येथ कांही न होतां न्युन ॥
अपरोक्ष ज्ञान उदया ये ॥८०॥
श्रुति शंका करिती येथ ॥
सकळसत्वनिवासीनाथ ॥
त्या भगवंता तुजला भक्त ॥
सेविती संतत सप्रेमें ॥८१॥
सकळसत्वनिवासी यासी ॥
सेव्यत्व बोलिलें ऎसें म्हणसी ॥
तैं सत्वकारणत्वें निश्चयेसीं ॥
कर्तृत्व भोक्तृत्व तुजही ये ॥८२॥
म्हणसी वस्तुता अलिप्त जरी मी असें ॥
तरी जीवासि ही लिप्तता नसे ॥
उभयां तुल्यत्व असतां कैसें ॥
तारतम्य भजनाचें ॥८३॥
ईश्वर सेव्य कैसेनि म्हणिजे ॥
जीवां सेवकत्व केंवि साजे ॥
ये शंकेच्या निरसनकाजें ॥
श्रुत्यर्थ ओजें अवघास ॥८४॥
अपाणि अपाद अचक्षु ईश ॥
अकर्ण अघ्राण अजिह्न अरस ॥
परित्यागादानगतिप्रकाश ॥
द्रष्टा परेश सर्वाचा ॥८५॥
श्रवणेंवीण सर्व ऎके ॥
रसनेवीण सर्व चाखे ॥
घ्राणेंबीण गंध असिके ॥
तो जाणतसे अतीन्र्दिय ॥८६॥
सर्व वेद्यांचा जो वेता ॥
तयास कैंचा आन जाणता ॥
तया आदिपुरुषा महंता ॥
श्रुति अनंता स्तविताती ॥८७॥
तोचि अर्थ शुकाचार्य ॥
कुरुवर्यातें कथिता होय ॥
सनंदनगिरा आर्षश्रुतिमय ॥
उपनिषत्प्राय अवधारा ॥८८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP